अंडं, मँगो पल्प, बेकिंग पावडर, वेलची पूड (असल्यास), गव्हाचं पीठ, तूप, साखर आणि मायक्रोवेव्ह
१ अंड फोडून काचेच्या भांड्यात फेटून घ्या
त्यात १ अंड्या एवढाचं मँगो पल्प घाला
त्यात २ ते ३ चिमूट बेकिंग पावडर घालून हे मिश्रण चांगलं घोटून घ्या.
त्यात २ चमचे गव्हाचं पीठ घालून पुन्हा घोटून घ्या. (हातावर काढायच्या मेंदीच्या कन्सिस्टन्सीचं मिश्रण तयार होईल. इतपत गव्हाचं पीठ)
मिश्रणाची चव बघून हवी असल्यास साखर घाला, वेलची पावडर घाला, एक ते दीड चमचा तूप घाला.
मिश्रण चांगलं घोटून ते काचेचं भांडं मायक्रोवेव्ह मधे ठेवा. २.५ मिनिट्स हाय वरती आच द्या
ह्या सगळ्या प्रकारात अंदाजे पाच मिनिट्स निघून जातील
आता ३-४ मिनिटस नुसतीच वाट बघा.. किंवा आणखीन थोडा पल्प वापरून आयसिंग तयार करा
टॅडा.... मँगो केक तयार!
- माझा मायक्रोवेव्ह बर्यापैकी पॉवरफुल आहे.. तुमच्या मायक्रोवेव्हच्या ताकदीवर वेळ जरासा अॅड्जस्ट करा
- मी थोडेसे बदामाचे काप घातलेले, भारी लागले..
- आता ह्यात वेगवेगळी फळं घालून प्रयोग करण्यात येतील..
- टूटी फ्रुटी घालावी का?
- गव्हाचं पीठ - मैदा नाही म्हणजे (त्यातल्या त्यात) हेल्दी.
- अगदीच झटपट झाला.. मूड आल्यापासून दहा मिनिटात केक तयार...
- तुम्ही तयारीचे असाल तर मूड आल्यापासून दहा मिनिटात केक फस्तही करु शकता!
- केक चांगला स्पॉजी झालेला.. गरम भारी लागला.. गारही भारीच लागला!
मस्त सोप्पी आहे रेसिपी. नक्की
मस्त सोप्पी आहे रेसिपी. नक्की करुन पाहणार.
>आता ३-४ मिनिटस नुसतीच वाट
>आता ३-४ मिनिटस नुसतीच वाट बघा.. >>
टॅडा.... मँगो केक तयार! >>>
टॅडा.... मँगो केक तयार! >>> असा आवाज येतो का केक तयार होताना

सॉरी हं मला केक पेक्षा त्यातले विनोद जास्त आवडले
आवडायला तू केक खाल्लास कुठे
आवडायला तू केक खाल्लास कुठे श्री!
भारीच आयडिया स्ट्रॉबेरी पल्प
भारीच आयडिया
स्ट्रॉबेरी पल्प आहेच घरात. करुन बघेन
टॅडा.... मँगो केक तयार! >>>>
टॅडा.... मँगो केक तयार! >>>> म स्त ....
छान केक. मावेचे सेटींग लिहिले
छान केक.
मावेचे सेटींग लिहिले तर बरं होईल !
मस्त केक पण नानबा अंड न
मस्त केक
पण नानबा अंड न चालणार्यांसाठी पण काहीतरी सांग ना ....
छान रेसेपी, पण बेकिंग पावडर
छान रेसेपी, पण बेकिंग पावडर सर्वात नंतर टाकली तर जास्त स्पॉन्जी होईल ना
असू शकेल प्रसिक.. पण नंतर
असू शकेल प्रसिक.. पण नंतर घातली बेपा तर मिक्स होईल का नीट?
बेंकिंग एक्स्पर्ट लाजो सांगू शकेल..
( हा केक मस्त स्पाँजी झालेला पण)
अनु, बिन अंड्याच्या रेसिपीसाठी साक्षीची रेसिपी आहे ना
दिनेशदा.. मी मायक्रोवेव्ह वापरलेला(ओवन नाही) - त्यामुळे सेंटिंग काहीच नाही केलं.. हाय आणि २- २.५ मिनिट्स, बस!
मस्त .. वेळ कमी लागतो हे
मस्त .. वेळ कमी लागतो हे सग्ळ्यात भारी. आता माऊला करुन घालेन. धन्स हो नानबा..