Submitted by गजानन on 1 September, 2012 - 15:38
मराठीतले वाक्प्रचार लिहिण्यासाठी हा धागा.
जुन्या हितगुजावरचा दुवा : www.maayboli.com/hitguj/messages/103385/91815.html
.
आता दहा शब्द हवेतच म्हणून हा धागा 'खनपटीलाच बसलाय'.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अलीकडे काही दिवसांपूर्वी मी
अलीकडे काही दिवसांपूर्वी मी 'रावस दिसणे' असा वाक्प्रचार वाचला. रावस हा मासा असतो हे तर माहित होतेच. पण 'रावस दिसणे' हे ऐकले नव्हते. माझ्या अंदाजानुसार सुंदर/गोंडस/देखणे दिसणे अशा अर्थाने ते असावे. महाराष्ट्रातील कोणत्या भागात हा वाक्प्रचार वापरला जातो ते सुद्धा माहिती नाही.
खनपटीस बसणे म्हणजे बहुतेक
खनपटीस बसणे म्हणजे बहुतेक कानपट्टीलगत (कानफटाशी) बसून त्याच त्याच गोष्टी सांगून पटवत बसणे. आपले म्हणणे पटवत बसणे,
असे असावे.
<<मराठीत काय म्हणतो आपण यू आर
<<मराठीत काय म्हणतो आपण यू आर वेलकम साठी?>>
तुमचे स्वागत आहे.
पण उगाच असले इंग्रजीतल्या गोष्टींचे मराठीकरण करू नका - नाहीतर पु. ल. देशपांड्यांच्या एका पुस्तकात लिहिल्याप्रमाणे सॉसेज ऐवजी डुकराच्या मासाचे तुकडे असे म्हणाल तर मराठी माणसाला खाववणार नाही.
त्या ऐवजी मराठी गोष्टींना इंग्रजी शब्द शोधा जसे केळवण - आमच्या मुलीचे बनाना फॉरेस्ट आहे.
अँट्स हॅव कम तो फूट.
माय आय हॅज कम.
बरोबर. थँक्यू म्हटल्यावर
बरोबर. थँक्यू म्हटल्यावर मराठीत 'यू आर वेलकम' नसतं म्हणायचं. मराठीत म्हणतात - 'हॅ! थँक्यू काय त्यात!'
गुजरातीत केळवणी म्हणजे
गुजरातीत केळवणी म्हणजे संस्कार, कौन्सिलिंग, शिकवण.
लग्नाच्या आधी मुलांना चार गोष्टी सांगायच्या, कसं वागावं ते शिकवायचं म्हणून वडीलधारे लोक अशा सौभाग्यकांक्षी मुलांना घरी बोलावून घेत. मराठीतही हा शब्द ह्या अर्थाने वापरलेला जुन्या पुस्तकांत एखाददुसऱ्या वेळी कुठेतरी पाहिला आहे.
>> मराठीत म्हणतात - 'हॅ!
>> मराठीत म्हणतात - 'हॅ! थँक्यू काय त्यात!'
किंवा "तुम्ही कसलं थॅंक्यू आम्हीच थॅंक्यू"
चांगला धागा, बरेच वाक्प्रचार
चांगला धागा, बरेच वाक्प्रचार माहिती नव्हते.
हपा, शिकुया मराठी नावाखाली तुमची कोटी व्हॉट्सऍपवर व्हायरल करतोय, बघा तुमच्या पर्यंत पोचते का.
नक्कीच, मानव.
नक्कीच, मानव.
रावस माल हा आगरी भाषेत ऐकलाय.
रावस माल हा आगरी भाषेत ऐकलाय.
केळवण म्हणजे काळजी घेणे असा कुठेतरी वाचलय. यालाच काही भागात गडगनेर म्हणतात.
राजा पासून राजस, तसे राव
राजा पासून राजस, तसे राव पासून रावस असे असेल का?
Pages