वाक्प्रचार

Submitted by गजानन on 1 September, 2012 - 15:38

मराठीतले वाक्प्रचार लिहिण्यासाठी हा धागा.
जुन्या हितगुजावरचा दुवा : www.maayboli.com/hitguj/messages/103385/91815.html

.
आता दहा शब्द हवेतच म्हणून हा धागा 'खनपटीलाच बसलाय'.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अडीच कांड्यावर येणे : निष्कारण वादावर येणे.
कातीला येणे : मार खायची लक्षणं दाखवणं. Biggrin (अनेकदा सांगूनही काही फरक पडला नाही तर म्हणतात, तू आता आलंयस कातीला. कात = सापाची कात)

काट्यावर येणे - हातघाईवर येणे

आपल्या नेहमीच्या वापरातले लिहायचेत की आठवतील तसे? जुन्या धाग्यात शब्दांचे अर्थही दिसतायत, फक्त वाक्प्रचार नाही आणि तू पण वरती जरा वेगळे वाक्प्रचार लिहिलेयस म्हणून विचारलं.

जुन्या धाग्यावर बुगडीची चर्चा दिसली.
बुगडी ही कानातल्या कुडीसारखी वस्तू आहे.
(दक्षिणाताईंनी माबोवरच दिलेले हे चित्रः पण त्यातले झुबुकबाळयाचे कानाच्या पाळीतले जे आहे त्याला बुगडि म्हणत असावेत.)
सोन्याच्या बारीक तारेत मोती ओवून कुडी बनवलेली असते.
खापरे.ऑर्ग वर हा अर्थ दिसतो -> "स्त्रियांचें एक कर्णभूषण . बुगड्या झुबुकबाळ्याच्या जोडें । लेणें कानाचें । - देवदास , भामावर्णन ४ . "

बुगडी माझी सांडली ग, जाता सातार्‍याला.
कोणी नका सांगू ग हिच्या म्हातार्‍याला.

('त्या'च्याबरोबर) सातार्‍याला जाताना प्रवासात (लाडिक धसमुसळेपणात) ती तार तुटून मोती सांडले आहेत. अन याची बातमी हिच्या 'म्हातार्‍याला' म्हणजे तीर्थरूपांना कुणी सांगू नका, अशी ती लावणी आहे.

बुगडी सांडली, म्हणजे हरवली असा अर्थ नसावा. Wink

सई, फार काळाने दिसली मायबोलीवर. Happy

नेहमीच्या वापरातले, आठवतील तसे, सगळे लिहावेत अशी अपेक्षा आहे. फारसे वापरात नसलेले वाक्प्रचार आले तर फारच छान. (हे जरासे व्यक्तिसापेक्ष म्हणता येईल. मला वेगळा वाटलेला वाक्प्रचार एखाद्याच्या घरात नेहमीच वापरात असेल.)

इब्लिस,
थोडं अवांतर:
कोणी नका सांगू ग हिच्या म्हातार्‍याला << हे चुगली नका सांगू गं..... असं आहे.

हे जरासे व्यक्तिसापेक्ष म्हणता येईल. मला वेगळा वाटलेला वाक्प्रचार एखाद्याच्या घरात नेहमीच वापरात असेल.)
<+१.

चांगला बीबी गजानन. Happy स्कॉलरशिपच्या परीक्षांची आठवण आली.

हो गजानन Happy कसा आहेस?
खनपटीला बसणे - हेका न सोडणे - एखादा विषय / गोष्ट लावून धरणे Happy बरोबर आहे का?

इब्लिस, झुबुकबाळी हा शब्द आज पहिल्यांदाच कळला... मजेशीर आहे एकदम. कानात घालायच्या झुब्यांशी संबंधीत असावा का?

खनपटीला बसणे - हेका न सोडणे - एखादा विषय / गोष्ट लावून धरणे स्मित बरोबर आहे का?
<<< हो.

जुन्या मायबोलीच्या लिंकवर कागदावर बसणे याचा एक अनिखा अर्थ मिळाला.

Ajay
Friday, March 24, 2006 - 12:59 am:

कागदावर बसणे
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी हळुहळु आपली शिक्षणपद्धती आणली. तेंव्हा पहिली ते चौथी फक्त पाटी वापरत असत. वह्या-पुस्तके पाचव्या इयत्तेपासून सुरु होत. तेंव्हा मुलगा "कागदावर बसायला" लागला असा वाक्प्रचार वापरात आला.
उदा. औंधचे राजपुत्र विजयसिंहराजे यावर्षीपासून कागदावर बसायला लागले.

स्वातंत्र्योत्तर काळात काही वर्तमानपत्रे वाचनापेक्षा वैयक्तिक स्वच्छतेसाठी उपयोगी पडू लागली आणि कागदावर बसणे याला वेगळाच अर्थ प्राप्त झाला Happy आता कुठले राजे कागदावर बसलेही असतील आणि त्यांचे त्याबद्दल कौतुकही झाले असेल, पण ते सोडा.

इब्लिस, ते खापरेंनाच माहित Wink
तसंही खापरे मधली सग्ळी माहिती, विशेषतः शब्दार्थ विश्वसनीय नसतात. तुम्ही आपले मोल्सवर्थच बघा. डिजिटल डिक्शनरीज ऑफ साउथ एशिया या वेबपेजवर मिळेल

नंदिनी, 'कागदावर बसणे'चा उगम गंमतीदार आहे Happy
एकही वेगळा वाक्प्रचार आठवत नाहीये मला सध्या! दिवसभरात किमान पाच तरी सहज वापरले असतीलच...

>> घुगर्‍या घशात अडकणे
हे प्रथमच ऐकलं. 'घुगर्‍या जेवलेल्या असणे' हे 'बारसं जेवलेलं असणे' म्हणजे चांगलं ओळखून असणे या अर्थी ऐकलं आहे. आणि घुगर्‍या म्हणजे चण्याची डाळ नव्हे तर (भिजवलेले) हरभरे. बारशाच्या वेळी पाळण्याच्या चारही पायांशी ठेवतात घुगर्‍या आणि मग आलेल्या सर्वांना देतात.

एक नविन वाक्प्रचार वाचनात आला.

सोयर्‍यात साडू, हत्यारात माडू आणि भोजनात लाडू -
अर्थ साधारण असा आहे की सोयर्‍यात साडू हा सर्वात उत्तम असतो म्हणे कारण तो अगदी सख्ख्यातला नातलग नसतो आणि मित्रात गणता येतो.
माडू ह्या हत्याराला दोन्ही बाजूला टोक असते त्यामुळे शत्रू मागून येवो वा पुढून त्याचा मुकाबला कुठूनही करता येतो. आणि जेवणात लाडू उत्तम कारण आकार आटोपशिर शिवाय चविला रूचकर.

दक्षिणा, माडू नावाचे हत्यार असते का? माहीत नव्हते.

मला आधी वाटले ते झाडू असेल आणि तुझा टायपो झालाय. Proud

बाय दी वे, ही म्हण आहे ना?

कंठ फुटणे
प्राण कंठाशी येणे
कपाळ टेकणे
कंबर कसणे
कानउघाडणी करणे
कान फुंकणे
काखा वर करणे
केसाने गळा कापणे
गळ्याखाली घास न उतरणे
गळ्यापर्यंत येणे
दगडाखाली हात येणे
सालं काढणे
दिवे ओवाळणे
पाणी जोखणे
पाणी फिरवणे
हरभर्‍याच्या झाडावर चढवणे
हाल कुत्रा खाईना

'सुपारी घेणे' चा अर्थ 'खुनाची सुपारी' असा माहित होता. अजून एक अर्थ ऐकण्यात आला. मझा एक मित्र म्हणाला,'' आम्ही ढोल वाजवण्यासठी एका मंडळाची सुपारी घेतो''.
या 'सुपार्यांची' व्युत्पत्ती कोणी सान्गेल का?

सुपारी म्हणजे कोणतंही मोबदली काम करण्यासाठी दिलेलं आमंत्रण. पैसे काम झाल्यावर द्यायचे असले तरी कदाचित करायचं नक्की झाल्यावर सुपारी द्यायची पद्धत असेल पूर्वी.

'विडा उचलला' हाही असाच वाक्प्रचार त्यावरून आठवला.

सुपारी हि कोणतेशी काम करण्याची घेतात वा देतात. ईट इस अ बाईंडींङ कॉण्ट्रॅक्ट.
गावात तमाशा आणायचा असेल तर गावचा मुख्य त्या तमाशाला सुपारी देत असे.
एकदा सुपारी घेतली की ते काम केलच पाहीजे असा दंडक आहे. Happy

वरती खनपटीला बसणे असा एक वाक्प्रचार आला आहे. कानफटात/कानफटीत मारणे असाही वाक्प्रचार आपण वापरतो. कानफटी/कानपट्टी म्हणजे अर्थातच कानशील, कान आणि गाल यांच्यामधली सपाट जागा. एखादी गोष्ट सतत कानावर पडेल अशा रीतीने सांगत राहाणे, पाठपुरावा करणे म्हणजे खनपटीला बसणे असा कदाचित उगम असू शकेल.

अ: थँक्यू!
बः यू आर वेलकम!

अ: धन्यवाद!
बः ??

मराठीत काय म्हणतो आपण यू आर वेलकम साठी? माझ्याकडील इंग्रजी--> मराठी शब्दकोशात 'आभार मानल्यावर द्यावयाचा विनम्र प्रतिसाद' असं दिलंय. पण म्हणजे नक्की काय म्हणतात ते दिलंच नाहीये Happy

मी 'असू दे गं/रे/हो, त्यात काय!' असं म्हणते. Happy

Pages