मी तयार केलेली साडी

Submitted by विनार्च on 31 August, 2012 - 23:24

फावल्या वेळात केलेला हा उद्योग आहे पण करताना खूप मजा आली म्हणुन इथे शेयर करते आहे. माझी बहिण फॅशनडिझायनर आहे तिच्या बरोबर तिच्या एका सप्लायरकडे गेले होते, तिचं काम संपेपर्यंत मी सहज त्याच्या दुकानात चक्कर मारली. तिथे बर्‍याच लेसेस होत्या त्यातली एक मला खूप आवडली म्हणुन मी चौकशी केली तर कळलं की ती साडीसाठी वापरतात. तसा माझा व साड्यांचा संबध जवळ जवळ नाहीच पण हे काम इंट्रेस्टींग वाटल आणि वेळच वेळ होता म्हणुन त्या लेसेस बघायला सुरवात केली आणि बाहेर पडताना बर्‍याच लेसेस घेउनच बाहेर पडले. आता घेतल्या आहेत तर फुकट घालवायच्या नाहीत या हिशोबाने साडीसाठी लागणार्‍या इतरही गोष्टींचा शोध घेतला आणि केली एकदाची साडी पुर्ण.
खाली फोटो देते आहे, कशी वाटली ते नक्की सांगा. साधारण काय किंमत असेल तिची बाजारात तेही सांगा. (माझी शेवटची साडी खरेदी लेकीच्या बारश्याला आठ वर्षांपूर्वी त्यामुळे किंमतीचा काहीच अंदाज नाही)

साडीचा पदर
2012-07-20 15.58.50.jpg2012-07-20 15.59.21.jpg

मधल्या भागात टाकलेले बूंदे (मी टिकल्या म्हटलं तर बहिणीने माझ्याकडे तुक टाकत म्हटलं "त्याला बूंदे म्हणतात" Proud )

2012-07-20 16.05.06.jpg2012-07-20 16.05.59.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण साडीला खर्च केवढा आला. म्हणजे नेट कापडाचा खर्च, लेस, साडिवर लावलेले पॅचीस, साडी बनवायला लागलेला वेळ ई

खुप मस्त साडी!!! एकदम झकास....

मी अत्ताच घेतली अशीच... साधारण किंमत ३००० ते ३३०० मला सेल मधे २५०० ला पडली ( म्हणुन तर घेतली!!!) नाहीतर मी साडीत गुंतवणुक करतच नाही!!!!!

एकदम खास साडी! आवडली.
पण साडीला खर्च केवढा आला. म्हणजे नेट कापडाचा खर्च, लेस, साडिवर लावलेले पॅचीस, साडी बनवायला लागलेला वेळ ई>>>+१

_/\_

Pages