फावल्या वेळात केलेला हा उद्योग आहे पण करताना खूप मजा आली म्हणुन इथे शेयर करते आहे. माझी बहिण फॅशनडिझायनर आहे तिच्या बरोबर तिच्या एका सप्लायरकडे गेले होते, तिचं काम संपेपर्यंत मी सहज त्याच्या दुकानात चक्कर मारली. तिथे बर्याच लेसेस होत्या त्यातली एक मला खूप आवडली म्हणुन मी चौकशी केली तर कळलं की ती साडीसाठी वापरतात. तसा माझा व साड्यांचा संबध जवळ जवळ नाहीच पण हे काम इंट्रेस्टींग वाटल आणि वेळच वेळ होता म्हणुन त्या लेसेस बघायला सुरवात केली आणि बाहेर पडताना बर्याच लेसेस घेउनच बाहेर पडले. आता घेतल्या आहेत तर फुकट घालवायच्या नाहीत या हिशोबाने साडीसाठी लागणार्या इतरही गोष्टींचा शोध घेतला आणि केली एकदाची साडी पुर्ण.
खाली फोटो देते आहे, कशी वाटली ते नक्की सांगा. साधारण काय किंमत असेल तिची बाजारात तेही सांगा. (माझी शेवटची साडी खरेदी लेकीच्या बारश्याला आठ वर्षांपूर्वी त्यामुळे किंमतीचा काहीच अंदाज नाही)
साडीचा पदर

मधल्या भागात टाकलेले बूंदे (मी टिकल्या म्हटलं तर बहिणीने माझ्याकडे तुक टाकत म्हटलं "त्याला बूंदे म्हणतात"
)


छान आहे.
छान आहे.
मस्तच !
मस्तच !
छान!
छान!
काय मस्तं रंगसंगती आहे.
काय मस्तं रंगसंगती आहे. बाजारात कमीत कमी ४०००/- तरी असेल किंमत आणी डिझाईनर असेल तर १०,००० - १५,००० च्या दरम्यान
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
सुंदर ! __/\__
सुंदर ! __/\__
खुप सुरेख ! विनार्च, प्रचंड
खुप सुरेख ! विनार्च, प्रचंड पेशन्स आहे तुझ्याकडे.. नुसत्या माचिंग लेसेस आणि बाकी समान( बूंद/बुट्टी) घेण्यातच मी कंटाळले होते.
मस्त दिसतेय साडी. पहिलाच
मस्त दिसतेय साडी. पहिलाच पदराचा फोटोही भारी आहे. मधल्या लाल, हिरव्या रंगामुळे आणि लेसच्या डिझाईनमुळे थोडा ट्रॅडिशनल लुकही आलाय. साडीकरता काय मटेरियल घेतलंत?
सुंदर दिसते आहे साडी
सुंदर दिसते आहे साडी
खुपच सुंदर झाली आहे साडी.
खुपच सुंदर झाली आहे साडी. वेगवेगळ्या लेसेस जोडुन केलीस यातुन तुझे पेशन्स तर दिसुन येतातच्.रंग संगती ही मस्त जमली आहे.
वॉवच एकदम. कॉम्बिनेशन अतिशय
वॉवच एकदम. कॉम्बिनेशन अतिशय खास.
मस्त.
मस्त.
खूपच सुरेख. रंगसंगती तर फारच
खूपच सुरेख. रंगसंगती तर फारच आवडली. अतिशय किचकट आणि चिकाटीचे काम आहे. एकदम सुपर्ब.
छान झालीय साडि
छान झालीय साडि
मस्तच. खूप आवडली
मस्तच. खूप आवडली
व्हाट अ कलाकारी ! मस्त !
व्हाट अ कलाकारी ! मस्त !
take a bow ___/\____
take a bow ___/\____
साडीची किंमत मटेरीयल
साडीची किंमत मटेरीयल नुसार(शिफॉन ) दिसतेय म्हणून ४ ते ४.५ हजार पर्यंत ठिक आहे.
(बहिणीला ज्यास्त नीट सांगता येइलच साडी किंमत... ह्याच संदर्भात काम करते म्हणून)
WOW !
WOW !
सुपर्ब!!! मस्तच झालिये
सुपर्ब!!!
मस्तच झालिये साडी, रंग, लेसेस, कलाकारी सगळच सुंदर!
साधारण काय किंमत असेल तिची बाजारात तेही सांगा.<<<<<
आपल्या हाताने केलेली साडी, त्याची किंमत कशी ठरवणार??? ती तर प्राईसलेस / अनमोल
लाजो, +1
लाजो, +1
मस्त दिसतीय!!
मस्त दिसतीय!!
सुंदर!
सुंदर!
सगळ्यांचे कौतुकाबद्द्ल खूप
सगळ्यांचे कौतुकाबद्द्ल खूप खूप आभार _/\_

आपल्या हाताने केलेली साडी, त्याची किंमत कशी ठरवणार??? ती तर प्राईसलेस / अनमोल >>> अगदी पटलं
झंपी साडीसाठी शिफॉन नाही नेट मटेरीयल वापरलं आहे.
अवल अगदी बरोबर, चार लेसेस आहेत. बाहेरची किनार, मधला पट्टा, त्यावरची सोनेरी आणि सगळ्यात वरची हिरवी. (मानलं बाई तुझ्या निरिक्षणशक्तीला)
वॉव विनार्च, सही पार्टीवेअर
वॉव विनार्च, सही पार्टीवेअर झाली आहे. कॉम्बीनेशन, फिनिशिंग सगळंच लाजवाब. इथे पुण्यात क्लोवर सेंटरमधे असा डिझायनर कपड्यांचा स्ट्युडिओ आहे. कोणत्याही स्पे. ऑकेजनसाठी तुम्हाला काय छान दिसेल किंवा तुमच्याकडे अलरेडी मटेरिअल किंवा साडी असेल तर त्याला तुम्ही डिझायनर लुक कसा देवु शकता याचं कन्सल्टिंग, डिझायनिंग आणि स्टिचिंग (बहुदा) होतं. अगदी छोट्या दुकानात मस्त चालतो हा व्यवसाय. तुला यातली जाण असेल ( आहेच) आणि आवड असेल तर असा व्यवसाय चालु करु शकतेस.
स्वराली, अशा लेसेस, बुंदे आणिही ड्रेसेस्/सारीजला डिझायनर बनवण्यासाठी लागणार्या गोष्टींची दुकानं क्लोवर सेंटरमधे खुप आहेत. ग्राउंड लेवल आणि बेसमेंटला फिरलीस तर प्रचंड वरायटी पहायला मिळेल. शिवाय वंडरलँडमधेही एक फक्त लेसेसचं दुकान आहे.
विनार्च...... एकदम सुंदर साडी
विनार्च...... एकदम सुंदर साडी तयार केली आहेस..... खुप आवडली
मनिमाऊ मस्त आयडिया दिलीस....
मनिमाऊ मस्त आयडिया दिलीस.... यावर विचार करायला काहीच हरकत नाही
सुरेख!
सुरेख!
पुण्यात हे साहित्य मिळण्याची
पुण्यात हे साहित्य मिळण्याची उत्तम दुकाने रविवार पेठ मनिष मार्केट इथे आहेत.. रास्त दरात साहित्य हवे असेल तर तिथेच.. नाहीतर तशी बरीच दुकानं आहेत...
विनार्च, टू गूड,
विनार्च, टू गूड, इंप्रेसिव्ह!
पेशन्सला सलाम
Pages