विषय क्र. १ येशुदास

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 28 August, 2012 - 05:22

दिल के टुकडे टुकडे करते .... हे गाण एकताना किंवा मग चांद जैसे मुखडे पे बिंदीया से तारा एकताना आवाज जरी थोडा घोगरा असला तरी मन वेगळाच ठेका घेते. आणि मग उलगड्त जातात त्या येशुदास या स्वर्गीय गंधर्व म्हणुन नावाजलेल्या गायकाच्या आठवणी.कट्टासेरी जोसेफ येशुदास, जन्माने ख्रिश्चन. भारतिय वेगवेगळ्या भाषात गायन केलेला हा गायक जाने. १९४० ला जन्माला आल्या नंतर वडिलांच्या शास्त्रीय संगीताचा वारसा चालवत चालवत बॉलीवुड मधे दाखल झाले . संगीतात स्नातक उपाधी प्राप्त केल्या नंतर श्रीनीवास अय्यर यांचेकडे प्रशिक्षण घेतले . सर्वच धर्माच्या सोहळ्यात ते आनंदाने आपली कला सादर करीत असत. तामीळ, मल्याळम भाषेत त्यानी जास्त गाणी, भजन गायलेली आहे. प्रथम १९७० मध्ये जयजवान जय किसान मधे गाऊन आपल्या हिंदी गाण्याला सुरुवात केली. मग चित्तचोर मधे गायीलेली सर्वच लोकप्रिय झालीत.
ते जन्माने जरी ख्रिश्चन असले तरी त्यांच्यावर हिंदु धर्माचा प्रभाव होता. शांती के लिए संगीत हे त्यांचे वाक्य होते. भारत पाकिस्तान युध्दाचे वेळी निधी गोळा करण्यात त्यांनी बराच पुढाकार घेतला. त्यांना रशियाच्या सरकानेही आमंत्रित केले होते. व सिनेट सदस्य बनवुन त्यांचा सम्नान केला.
त्यांच्या पत्नीचे नांव प्रभा होते, त्यांना ३ मुले होती विनोद, विजय व विशाल. येशुदास यांनी ५०००० हुन अधिक गाणी गायलेली आहेत. पद्म, पद्मभुष्न तसेच ७ राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालीत.

त्यानी गायलेल्या काही निवडक अजरामर गिताचा आढावा

१* कहा से आये बदरा ---------- चष्मे बहाद्दुर
२* आजसे पहेले ----------- चित्तचोर
३* माना तुम हो बडी हसीन----- टुटे खिलोने
४* का करु सजनि आये ना बालम--- स्वामी
५* गोरी तेरा गांव बडा प्यारा--- चित्तचोर
६* मधुबन खुशबु देता है------ साजन बिन सुहागन
७* दिल के टुकडे ---- दादा
८* चांद जैसे मुखडे पे ----- सावन को आने दो
अशी एकापेक्षा एक सरस गिते होती . हेमलता सोबत त्यांची चांगली जोडी जमली होती. त्यांनी जोडीने कित्येक अजरामर गिते गायली आहेत. एक धिर गंभीर शास्त्रीय गायक म्हणून मला ते निश्चीतच आवडतात. फार जास्त माहीती नसल्याने थोडक्यात घेतलेले हा आढावा येथेच संपवितो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त....................\.
.
.
यात अजुन भर टाका............
.
.हवे तर अजुन दोन तीन गायक गायिकांचा समावेश करावा.........

येसुदास माझ्याही आवडत्या गायकांपैकी एक Happy

माझी आवडती गाणी:
जिद ना करो अब तो रूको ये रात नही आयेगी (लहू के दो रंग)
आपकी महकी हुई जुल्फ को कहते है कंवल (त्रिशूल, सोबत लता मंगेशकर)
अब चरागोंका कोई काम नही तेरे चेहरेसे रोशनी सी है (बावरी, सोबत लता मंगेशकर)
तेरी भोली मुस्कानो ने मुझे बाबुल बना दिया (बाबूल)
मधूबन खुशबू देता है (साजन बिना सुहागन)
दिल के टुकडे टुकडे करके (दादा)
मोहब्बत बडे काम की चीज है (त्रिशूल, सोबत किशोर, लता)

अजुनही बरीच आहे. आठवेल तशी अपडेट करतो. Happy

अहाहा...
मस्त विषय निवडला आहेस भाऊ. पण खुप थोडक्यात संपवलास. येसुदास माझाही आवडता गायक. स्वामी मधलं ’का करु सजनी....’ मस्तच म्हटलय त्याने.
पण मला येसुदासची आवडणारी गाणी म्हणजे...

१. कोई गाता मै सो जाता : ’आलाप’ चित्रपटातलं हे गीत हरिवंशराय बच्चन यांनी लिहीलं होतं आणि ’जयदेव’ यांनी संगीतबद्ध केलं होतं.

२. सुरमई अँखियों में नन्हा-मुन्ना एक सपना दे जा रे : ’सदमा’ या चित्रपटातलं हे गीत लिहीलं होतं गुलजारसाहेबांनी आणि इलैया राजांनी संगीतबद्ध केलं होतं. या गाण्यात प्रत्येक कडव्यानंतर एक ओळ आहे "रारी रारी ओ रारी रुम" , ही ओळ आणि त्याबरोबर नाजुकपणे येणारा 'टिंग' चा नाद सॉलीड मजा देतो यार.

आवडेश एकदम. अजुन वेळ आहे, अपडेट करता आला अजुन तर बघा आणि शुभेच्छा Happy

छोटीसी बात या चित्रपटात ते अमोल पालेकरांचा आवाज झाले होते. पालेकरांना हा आवाज प्रचंड suit झाला होता. आशा बरोबर गायलेले 'जानेमन जानेमन तेरे दो नयन' अतिशय सुंदर आहे.

'का करू सजनी'ची ओळख स्वामीतल्या गाण्याने झाली. ही भैरवीतली चिज आहे, बडे गुलाम अली सारख्या दिग्गजांनी गायलेली आहे ही माहिती कालौघात मिळत गेली. पण माझ्याकरता 'का करू सजनी = येसुदास' असेच समिकरण आहे.

एका सुरेल गायाकाची आठवण करुन दिलीत ...धन्स... तशी मी रोजच त्याला ऐकते. त्याच्या आवाजातलं अतिषय अप्रतिम आणि सुरेल "गणेश स्तोत्र" मी रोज सकाळी ऐकते. खुपच भाविक आणि प्रसन्न आवाज.

सदमा मधली लोरी असो की चितचोर मधली सगळी गाणी असो. स्वामी मधली भैरवी असो की दादा नावाच्या टुकार सिनेमातलं दिल के टुकडे टुकडे... असो .. सगळी गाणी त्याच तन्मयतेने त्यांनी म्हंटली.

स्वतः एक ख्रिश्चन कुटुंबातुन येउनही उर्वरित जीवन फक्त हिंदु देवतांची गाणी त्यांनी गायली. आणि फक्त अशीच गाणी गाणार हे जाहीरही केले. पुर्ण जीवन एक हिंदु म्हणुनच घालवायचे ठरवले. त्यांची उडुपीतल्या कोल्लुर च्या देवळातली दर वर्षीची फेरी गेली ३० वर्ष चुकलेली नाही ( हे माझ्या सासर्‍यांचं मुळ गाव, म्हणुन मला माहित !!!) त्यांच्या आवाजातली सरस्वती वंदना ऐकताना खुप छान वाटतं.

एका सुरेल आवाजा बद्दल लेख लिहिलात... धन्यवाद!!!!

@मुक्तेश्वर कुळकर्णी
अजून लिहा. फार गुणी गायक निवदलाय तुम्ही. काय आवाज आहे त्यांचा आणी ते तन्मयतेने गाणे!
त्यांनी गायलेला 'हंसध्वनि' आणि सिनेसंगीत लाजवाब.

किताबो मे छपते है, चाहत के किस्से,
हकिकत की दुनिया मे चाहत नही है|
जमाने के बाजार मे ये वो शेइ है,
के जिसकी किसिको जरूरत नही है|
ये बेकार बेदाम की चीझ है| .. नाम की चीझ है| मुहब्बत बडे काम की चीझ है!!

खूप मोठा गायक!

मुकु, लेख फारच आटोपलात. (लेख लिहिताना त्यात येशूदासबाबत तुम्हाला काय काय वाटते तेही समाविष्ट करू शकाल की?) Happy कृपया गैरसमज नसावा

पण उत्तम गायकाच्या कारकीर्दीचा थोडक्यात पण उत्तम आढावा घेतलात. धन्यवाद, माहितीही मिळाली यासाठी.

शुभेच्छा

अभार सर्वांचे !
@ बेफी - खरच जेवढे लिहीणे शक्य होते तेवढे लिहीले. ते आवडात हे ही एका ओळीत संपविले आहे.
आता अजुन काय अपेक्षा ठेवणार. बस गात रहावे.
शिवाय नव्या लोकांना, नव्या संगीतकारांनाही नवे गायक हवे असतात. त्यामूळे जुने गायक केवळ विविध कार्यक्रमातुन आपली कला पेश करतात.
असो पुन्हा धन्यवाद !

मुक्तेश्वर छानच लिहीलत. एक वेगळा चिरतरुण आवाज, सहज हलकासा पण हृदयाला भिडणारा हा दैवी स्वर आहे.

धीरे धीरे सुबह हुई जाग उठी जिंदगी हे पण जितेंद्रला दिलेले जबरदस्त हीट गाणे हैसीयत सिनेमातील होते. काय गाजलयं ते गाणे.

येसुदासांची ईच्छा होती की केरळमधील गुरुवायूर ( बहुतेक, नक्की हेच की दुसरे मंदीर ?) मंदिरात देवासमोर कला सादर करावी, पण तिथल्या पुजार्‍यांनी ती पण ईच्छा नाकारली कारण का तर ते म्हणे दुसर्‍या धर्माचे आहेत. काय दुर्दैव ! देवाने कधी जात धर्म नाही पाहिला, पण त्यानेच घडवलेला ( की बिघडवलेला ?? ) माणूस अजूनही या कुचकामी कल्पनेतुन बाहेर येत नाहीये.:अरेरे:

धीरे धीरे सुबह हुई जाग उठी जिंदगी हे पण जितेंद्रला दिलेले जबरदस्त हीट गाणे हैसीयत सिनेमातील होते. काय गाजलयं ते गाणे + १ .... टुन टुन खरेच ह्या गाण्याची आठव्ण करुन दिल्या बद्दल धन्यावाद.... खरेच खुप दिवस झाले हे गाणे ऐकले नाही.

सुरमई अँखियों में नन्हा-मुन्ना एक सपना दे जा रे : ’सदमा’ या चित्रपटातलं हे गीत लिहीलं होतं गुलजारसाहेबांनी आणि इलैया राजांनी संगीतबद्ध केलं होतं. या गाण्यात प्रत्येक कडव्यानंतर एक ओळ आहे "रारी रारी ओ रारी रुम" , ही ओळ आणि त्याबरोबर नाजुकपणे येणारा 'टिंग' चा नाद सॉलीड मजा देतो यार. >>>>>> खरच अगदी मनातल बोललात विशालभाऊ