'कहाणी- गणपतीची'

Submitted by संयोजक on 27 August, 2012 - 17:53

मूळ कहाणी :-

कहाण्यांच्या पुस्तकात अगदी सुरवातीला गणपतीची कहाणी अशी एक कहाणी आहे. ती गणपतीची कहाणी नसून गणेश व्रताची कहाणी आहे. ती अशी--

ऐका गणेशा तुमची कहाणी.
निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेला वृक्ष सुवर्णाची कमळे.
विनायकाची देवळे, रावळे.
मनचा गणेश मनी वसावा.
हा वसा कधी घ्यावा?
श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा.
संपूर्णाला काय करावे?
पशा पायलीचे पीठ कांडावे. अठरा लाडू करावेत.
सहा देवाला, सहा ब्राम्हणाला, सहाचं सहकुटूंब भोजन करावे.
अल्प दान, महा पुण्य
असा गणराज मनी ध्याइजे, मनी पाविजे, चिंतीले लाभिजे.
ही पांचा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

श्रावणात शुक्रवारी जिवतीची पूजा असते तेव्हा दर शुक्रवारी वाचली जातेच.
शिवाय मंगळागौरीच्या पूजेला ही झाली वाचून. बर्‍याच जणींची पाठही असते.

ही पांचा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

<<
एक शंका,
हे 'साठा उत्तरांची कहाणी' असं असतं नं नेहेमी?

इब्लिस आपली शंका योग्य आहे. पण कहाणीच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत खालीलप्रमाणे लिहिले आहे.

".... आपले सर्व पौराणिक वाङ्मय हे उत्तरांच्या स्वरूपात लिहीले गेले आहे. म्हणजे कुणीतरी प्रश्न विचारल्यावर त्याचे उत्तर म्हणून या हकीकती सांगितल्या आहेत. अशा या कथा संक्षिप्त करून पाच उत्तरात आणलेल्या आहेत. असा हा 'साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण' या वाक्याचा अर्थ आहे. म्हणूनच, गणपतीची कहाणी संक्षिप्त केली नसल्याकारणाने त्याचा पाठ ' पाचा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण' असाच , पूर्वीचा पाठ आहे."

अरे वा!
मला जशी ही नवी माहिती कळली, तशी माझ्या इब्लिस शंकेमुळे इतरांनाही कळो, तितकीच गणेशसेवा घडली असे म्हणतो.

(अवांतर : लहानपणी घरात आजीची एक छोटी पिशवी असे. त्यात हरिविजय, पांडवप्रताप, शिवलीलामृत अन कहाण्यांचं पुस्तक असा खजिना होता. तो संपूर्ण वाचून काढला होता, पण प्रस्तावना वाचायचं ते वय नव्हतं. यानिमित्ताने आज्जीचीही आठवण आली..)

धन्यवाद!