सीरिअल किलर

Submitted by मुरारी on 27 August, 2012 - 07:19

"एका लग्नाची दुसरी गोष्ट" या मालिकेवर माबोच्या सभासदांनी केलेली समीक्षा पाहून
आज या धाग्याचे उद्घाटन करताना उर भरून आलेला आहे .
ए ल दु गो संपल्याने तसेच तो धागा दुधडी भरून वाहू लागल्याने , हे नवीन धागारुपी धरण बांधण्यात आलेले आहे
माबोचे स्टार समीक्षक स्वप्ना राज , भुंगा, रिया, अश्विनिमामी , मामी , साधना, उदयन,मैना आणि इतर टीम (मी धरून Wink )
या धाग्यावर ,सध्या धुमाकूळ घालणाऱ्या मालिकांची समीक्षा (?) {बाजार उठला रे } तसेच बर्यापैकी बघितल्या जाणार्या मालिकांचे गुणविशेष वर लिहिलेल्या पॅनल द्वारे नोंदवले जातील
माबोचे सभासद उत्स्फूर्त पणे यात भाग घेतील हि अपेक्षा .

मराठी च्यानल वालो बचके रेहना
आरेले हे "सीरिअल किलर" Proud

सध्याचे हॉट टॉपिक
१. अजुनी चादरात आहे
२. मला सासू हवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा 'संथ चालती ह्या मालिका'चा रिपिट टेलिकास्ट झालाय!

सहमत. सगळ्यांनी तिकडे जा आणि हा धागा बंद करा. उगीच एका विषयावर दोन दोन धागे कशाला?

असले धागे वाहते राहिलेलेच बरे..... Happy

Sad

आले admin च्या मना
रच्याकने त्या मसाह चे नक्की kathanak काय आहे?
कशाला तिला सासू हवीये म्हणे?
अभ्यंकर सासरा दाखवलाय असे वाटते

रच्याकने त्या मसाह चे नक्की kathanak काय आहे?>> स्वप्नाने कालच 'संथ चालती..' वर तपशीलात लिहीले आहे ह्यावर. एकच धागा चालवूया खरंच.

ओके . खरय.. हा धागा सरा च्या पुढच्या शिरेल साठी राखीव ठेवून देऊ मग
हाकानाका..

संथ चालती अल्रेडी सुरु असले तर उगाच डबल धमाका नको Happy
बाय द वे मला तो धागा दिसत नाहीये

अभ्यंकर सासरा दाखवलाय असे वाटते> हो
अभ्यंकर सासरा बिझनेस मधुन रीटायर होणार म्हणुन त्याचे मुलगे हिस्सा वाटण्यांबद्दल बोलतात. मग तो बाय्कोच्या फोटोसमोर ' आज ही असती तर अशी वेळ आली नसती' लगेच नयिका- त्याची धाकटी सुन म्हणते "मग नवीन सासुबाई आणुया?' अगदी १ ल्याच भागत पर्दाफाश केलाय. आणि सासु पण कोण आसावरी जोशी. तिची पण भयानक एंट्री Uhoh

बाय्कोच्या फोटोसमोर ' आज ही असती तर अशी वेळ आली नसती' लगेच नयिका- त्याची धाकटी सुन म्हणते "मग नवीन सासुबाई आणुया?' >>> अजुन एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. एलदुगोमधे पोरांनी केले, ह्या शिरेलीत आईवडील. Lol