विषय क्र. १- स्वप्नातला 'राज'कुमार

Submitted by Manaskanya on 26 August, 2012 - 19:10

शाहरुख हा माझा आवडता हिरो. अगदी 'फौजी' ह्या TV सीरिअल पासून. तेव्हा फक्त दूरदर्शन हे एकाच channel होत. आम्ही त्या अभिमन्युसाठी अगदी डोळ्यात प्राण आणून वाट बघत असायचो. तो केव्हा सिनेमात येतो अस झाल होत ते सीरिअल बघून. 'दिवाना' हा त्याचा पहिला सिनेमा. पण मध्यंतरापर्यंत शाहरुख ची एन्ट्रीच झाली नाही. त्या रोल मध्ये तो फारसा आवडला नाही. मग आला 'बाजीगर'. शाहरुख भावला पण ते कॅरक्टर मात्र आवडल नाही. नंतर १९९५ मध्ये आला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' आणि शाहरुखचा 'राज' खूप खूप आवडला. अजूनही तितकाच आवडतो. एक तर मला यश चोप्रा/ आदित्य चोप्रा चे सिनेमे खूप आवडतात. 'चांदनी', 'लम्हे' हे सिनेमे अगदी एखाद्या सुंदर कवितेसारखे वाटतात. कथानक अलगद उलगडत जात. पण 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ह्या सगळ्यापेक्षा वेगळा आहे.

कथानक सुरु होत तेच मूळी NRI भारातियाच्या मनातली घालमेल दाखवून जात. ही वस्तुस्थिती आहे, खूप आठवतो भारत परदेशात आणि 'सारे जहान से अच्छा' वाटतो. ऱाजची एन्ट्री एकदम मस्त. grauation fail झाला तरीही युरोप trip मागून घेतो. शाहरुखने मस्तीखोर नायक छान रंगवला आहे. धावत पळत रेल्वे स्टेशनला येणारा बिनधास्त राज.गाडी सुरु होण्याची वेळ झाल्यावर तो platform कडे बघतो आणि गडबडीत येणारी काजोल दिसते. हात पुढे करून तिला चढायला मदत करणारा राज नंतर कुठल्याही flirt मुलाप्रमाणे तिच्याशी बोलायाल सुरुवात करतो. खुन्नस सुरु होते तिथूनच. मग ती त्याला paris मध्ये पियानो वाजवण्यासाठी अडकवते. त्या वेळी प्रथम येत नसल्याचा बहाणा करून नंतर अप्रतिम पियानो वाजवणारा राज बघितला. एकदम पटल, असाच असत खऱ्या आयुष्यात. नंतर हळू हळू फुलणार प्रेम दोघानाही जाणवतं. पण तीच लग्न ठरलं आहे हे माहित असल्याने तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणारा राज. वेळोवेळी तिला हिंट्स देत असतो, ती मात्र कळून न कळल्या सारख दाखवते. स्वीत्झेर्लंड मध्ये ट्रेन चुकल्यावर गाडी रेंट करून तिला साथ देणारा राज, काजोलला पोलिसापासून वाचवताना मिठी मारतो आणि ती चिडल्यावर जोरात ओरडतो 'ए इसको लेके जो रे'. खूप हसू आल होत तो प्रसंग बघताना.

माझा ह्या सिनेमातला सगळ्यात आवडता प्रसंग म्हणजे 'न जाने मेरे दिल को क्या हो गया' हे गाण. दोघानाही एकमेकावरच्या प्रेमाची जाणीव झालेली असते. पण दुसऱ्याच्या भावना माहित नसतात. हे गाण खूप सुंदर आहे. अव्यक्त भावना थेट काळजाला हात घालतात. तिच लग्न ठरलं आहे हाच अडसर ठरतो. आता पुढे काय होणार अस वाटत राहत. काजोल हि अभिनायासाम्राज्ञी ते गाण अगदी जिवंत करते. तिला घराच्या वाटेवर सतत दिसणारा राज, घरी गेल्यावर दार बंद करताना तिला bye करणारा राज. काळ्जाच पाणी होत तो प्रसंग बघताना. वाटत आता पुढे काय. कसे भेटणार हे दोघे एकमेकांना? काजोल आणि फरीदा जलाल ह्याचं नात खूप सुंदर दाखवलं आहे. घरी गेल्यावर ती आपल मन आईकडे मोकळ करते. हे सुंदर प्रेम अस अव्यक्त राहणार का असा प्रश्न पडतो. राज चंद्राकडे बघत गिटार वाजवत असतो आणि येतात त्याचे कुल dad . ते म्हणतात 'मैने तुझे तुन्तुना बजाने के लिये पैदा नही किया हैं' . मग राज आपल्या प्रेयसीचा माग काढत भारतात येतो आणि तीच काळजाला भिडणारी गिटारीची धून वाजवतो. काजोल पळत येते आणि तिला हिंट मिळते 'तिच ती स्वीत्झेर्लंडची cow bell'. त्या पिवळ्याधम्म शेतात राजच्या मिठीत सामावलेली काजोल. प्रेम म्हणतात ते हेच हि खात्री पटते.

त्या काळात आणि कदाचित आजही हाच आणि असाच प्रियकर प्रत्येक मुलीला हवा असतो. तिच्या भावना जाणणारा, तिच्यासाठी सगळ्या जगाशी लढणारा. तिच्या घराच्या लोकांच्या मनात आपल स्थान मिळविणारा. 'राज' ची सर दुसऱ्या कुणालाही आली नाही. Hats off to Raj and Shahrukh.

ह्या सिनेमात आणखी आवडलेला प्रसंग म्हणजे ' घर आ जा परदेसी' हे गाण. डोळ्यात पाणी येत. आजही भारताची भूमी दिसली की विमान टेकायाच्या आधीच गहिवरून येतो. तो मुंबई विमानतळाचा वास घरी आल्याची जाणीव करून देतो. मला हे गाण सदैव प्रिय असेल. माझ्या काही अमेरिकन मैत्रीणीना मी DDLJ suggest केला. त्यांना खूप आवडला. इथे लोकांना हिंदी सिनेमे आवडतात आणि त्यांचे आवडते हिरोज आहेत 'अमिताभ बच्चन' आणि 'शाहरुख खान' (please don't start on the airport fiasco on SRK, that immigration and airport safety matter is very sensitive in USA).

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए इसको लेके जाव रे...

+ ७८६

आपला पण आवडता डायलॉग. Happy

छान लिहिलेय.. आपल्या पिढीतील सार्‍यांच्याच स्वप्नातील राज"कुमार हाच असाच होता..

एक तर मला यश चोप्रा/ आदित्य चोप्रा चे सिनेमे खूप आवडतात. 'चांदनी', 'लम्हे' हे सिनेमे अगदी एखाद्या सुंदर कवितेसारखे वाटतात. >>>>>

ह्या पॅटर्न ची सुरुवात झाली ती सिलसिला पासुन. हे वातावरण निर्मिती चे काम सिलसिला ने केले. तुम्ही फ्रेम बाय फ्रेम ताडुन बघा, तेच आढळेल....

राज चंद्राकडे बघत गिटार वाजवत असतो आणि येतात त्याचे कुल dad . ते म्हणतात 'मैने तुझे तुन्तुना बाजाने के लिये पैदा नाही किया हैं' .<<<

Lol

भारी लिहिलंय

धन्यवाद.
माझे आवडते लेखक बेफिकिर ह्यानी लेख वाचला, आन्नद झाला. शुध्दलेखनाची चुक दुरुस्त केली आहे. अभिशेक आणि मोहन की मीरा- धन्यवाद. मला तुमच्या कथा/लेखन खुप आवडत.