मायबोली दिवाळी अंक २०१२ संपादक मंडळ

Submitted by रूनी पॉटर on 16 August, 2012 - 21:59

मायबोली दिवाळी अंक २०१२ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दोन-अडीच महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्‍या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
तसेच संपादक मंडळात सहभागी झाल्यावर सगळ्या संपादकांनी इथे नियमित हजेरी लावणे (काही कारणास्तव गैरहजर रहाणार असल्यास मुख्य संपादकांना तसे आधी कळवणे), चर्चांमध्ये सक्रीय सहभागी होणे, अधुन मधुन होणार्‍या स्काइप मिटींगांना हजेरी लावणे, मुख्य संपादकांनी दिलेल्या जबाबदार्‍या वेळेवर पार पाडणे अपेक्षित आहे.
दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते, खालील पैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कळवा. प्रत्येक विभागात काय काम करणे अपेक्षित आहे हे थोडक्यात दिले आहे.

१. दिवाळी अंक संपादन
दिवाळी अंकासाठी एखादी संकल्पना, मुखपृष्ठ निवडण्यापासून ते आलेल्या साहित्यातून अंकासाठी योग्य साहित्य निवडणे, गरज पडेल तसे त्यावर संस्कार करणे, तसेच इतर टीम्स (रेखाटन, सजावट, मुद्रितशोधन, टेम्प्लेट इ.) सोबत लागेल तसे काम करुन शेवटी दिवाळी अंक पूर्ण करणे व वेळेत प्रकाशित करणे.

२. दिवाळी अंक रेखाटन
दिवाळी अंकासाठी निवड केलेल्या साहित्याला साजेशी रेखाचित्रे (वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून) काढणे.

३. दिवाळी अंक साचा (Template)
One should have experience in designing website templates/themes in Drupal. Good graphic skills and imagination are must. Enough patience to accept constructive criticism and negotiate final template with Diwali ank team is a plus.

४.दिवाळी अंक सजावट (Page layout)
Webpage design and page layout skills using HTML and good graphic skills are necessary. Page layout includes color scheme, page making, fonts, presentation, background images for diwali ank template.

Page layout team and template team would be working together.

५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)
दिवाळी अंकासाठी निवड केलेल्या साहित्याचे मुद्रितशोधन वेळेत करून संपादक मंडळाकडे सुपुर्द करणे.

६. दृक श्राव्य विभाग (Audio/Video editing)
Improving clarity of the audio recordings through reducing noise and other techniques, editing videos to remove redundant content.

==================================
मायबोली दिवाळी अंक २०१२चे संपादक मंडळ तयार झाले आहे.
संपादक मंडळ : रार (मुख्य संपादक), प्रिया, शैलजा, बिल्वा, नंद्या, मवा.
अजूनही मंडळात काही जागा भरायच्या आहेत. गरज पडेल त्याप्रमाणे इतर सदस्यांशी संपर्क साधला जाईल.
दिवाळी अंकाचे काम जसे जसे पुढे जाईल त्याप्रमाणे इतर ग्रूप (टेम्प्लेट, सजावट, रेखाटन, मुद्रितशोधन, दृक श्राव्य) तयार केले जातील व या ग्रूपमध्ये काम करण्यासाठी ज्या ज्या सदस्यांनी नावे दिली आहेत त्यांच्याशी संपादक मंडळ संपर्क साधेल.
मंडळाचे अभिनंदन आणि अंकाच्या कामासाठी शुभेच्छा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा!! गणपती उत्सवाच्या मागोमाग दिवाळीची तयारी Happy

संयोजनात भाग घेणे यंदा शक्य नाही पण काहि मदत लागल्यास जरुर सांगा Happy

भरपुर शुभेच्छा!!!

वर दिलेल्या कुठल्याही विभागात काम करायचे असल्यास त्याचा पूर्वानुभव आवश्यक आहे का ? specially , १ व ५ मधे ?

तसेच ह्या मीटिंग्स कुठे व कधी असतील ?

मला ह्या सगळ्या विभागात काम करायचा अनुभव आहे.
मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी संपादन, दृक्श्राव्य माध्यम या विभागात काम करायची खूप इच्छा आहे.
इच्छेचा विचार व्हावा ही विनंती Happy

चैत्राली
३, ४ आणि ६ साठी कामाचा थोडाफार अनुभव असणे गरजेचे आहे, कारण त्याशिवाय ही कामे कोणाला करायला जमणार नाहीत.
इतर विभागांसाठी अनुभव नसला तरी चालू शकेल.
तुम्ही मिटींगच्या आधीचा "स्काइप" शब्द बहुतेक गाळलेला दिसतोय वाचतांना. सगळ्या मिटींग ऑनलाइन होतात (स्काइप्/जी टॉक इ). दिवाळी अंकाचे काम सुरु झाले की मग दर आठवड्याला एक याप्रमाणे मिटींग होतात. मिटींगची वेळ शक्यतो विकेन्डला सगळ्यांना सोईची पडेल अशीच ठरवल्या जाते.

मला क्र.२ साठी काम करायला आवडेल.दिवाळी अंकामध्ये ह्या कामाचा अनुभव नाही पण ड्रॉईंगच्या परीक्षा दिल्या आहेत.

वर दर आठवड्याला होणार्‍या स्काइप मिटींग बद्दलच्या मजकुरात थोडा बदल केला आहे. स्काइप मिटींग लागेल तश्या वेळी वेळी ठेवल्या जातात तेव्हा फक्त या मिटींगला येणे जमणार नाही म्हणून इथे कामासाठी नाव द्यायचे नाही असे शक्यतो कोणी करु नका.

नमस्कार,
मला १,२ आणि ५ यासाठी काम करायला आवडेल.
मिटींग्स बद्दल आधी सांगितले जाते का?
त्याप्रमाणे काही वैयक्तिक कार्यक्रम असल्यास तो ठरवणे सोपे जाईल यासाठी...

रूनी, तुमच्या मेलला उत्तर पाठवले आहे. मिळाले का? कारण, तुमच्या नावावर टिचकी मारली 'विचारपूस' मध्ये लिहीण्यासाठी तर पान सापडत नसल्याचे दिसते.

यावर्षी दिवाळी अंकासाठी काम करायचेच असे ठरवले होते. पण नेमकी त्याचवेळी दुसरी कामं आली आहेत. बिझी असणार आहे. आता पुढच्या वर्षी जमवायला हव.

Pages