गटगचे आवताण स्वीकारू नये

Submitted by A M I T on 16 August, 2012 - 07:02

वैभवरावांचं स्वप्नभोळं मन दूपारल्यानंतर आम्हांला सुचलेलं काही...

नाही मिळाले मटण म्हणून
डाळ खावून कधी ढेकरू नये

काल पुण्यातल्या एके दुकानी
वाचले, 'येथे पत्ता विचारू नये'

जिस्म-२ पाहून उगाच वाटते
आयुष्यात कधीच सुधारू नये

गप्पांच्या धाग्यावर डू आयडीने
गटगचे आवताण स्वीकारू नये

दोन - चार कथा काय लिहल्या !
लेखक म्हणून कुणी शेफारू नये

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users