समाज सेवा

Submitted by प्रकाश कर्णिक on 16 August, 2012 - 02:06

देवाचिये दारी पसरुनी पदर जरी
करुनिया वारी काही लाभ होईना.
केले उपास तापास केला खूप दानधर्म
आणि मनन चिंतन
फळ छोटेसे पण लाभेना
पठण करुनिया केली व्रतवैकल्य
हाती मृदुंग टाळ
पण स्वार्थ काही साधेना

दिवसा मागून दिवस गेले
आणि गेले पावसाळे
तरीही धन काही प्राप्त होईना
करावे तसे भरावे असे म्हणतात खरे
आम्हा त्याचा प्रत्यय काही येईना
वेड पांघरले आणि पेडगावला गेले
तरी रूप आमचे काही झाकले जाईना
आचरणाने स्वच्छ घालून पितांबर
मुखी राम नाम तरी तारू किनारी लागेना
सर्व व्यर्थ आहे हे कळायला वेळ गेला खूप
म्हणून जीव झाला कासावीस. तरीही काही सुधारेना

कोणी सांगितला मंत्र राजकारणात जावे
म्हणालो प्रयत्न पाहावा करून मनोभावे
केले धेंड गोळा आणि डंका वाजवला
सर्व विद्रूप भुतावळ उभी राहिली साजाला
आता खरे वाटले आले हत्तीचे बळ
कशाला हवा तो देव भोळा अन खुळा

झालो मंत्री आता, केली लुटालूट
फसवले भाबड्या जनतेला
करावा लागतो भ्रष्टाचार जर भल्याचाच विचार
असेल मनामध्ये लोकांचा
कोणीतरी श्रीमंत झाल्यावाचून का काही
होईल उद्धार या मातृभूमीचा ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरी आहे ...............
गुड !

शुभेच्छा
----------------------------------
कवितेत तीन ते चार जागा गॅप सोडता येइल अशा आहेत..जेणे करून तीन ते चार कडवी होतात
प्रत्येक कडव्यात विषयाला कलाटणी मिळत जाते

देवाचिये दारी पसरुनी पदर जरी........................पण स्वार्थ काही साधेना

दिवसा मागून दिवस गेले................म्हणून जीव झाला कासावीस. तरीही काही सुधारेना

कोणी सांगितला मंत्र राजकारणात जावे....................फसवले भाबड्या जनतेला

करावा लागतो भ्रष्टाचार जर भल्याचाच विचार..................होईल उद्धार या मातृभूमीचा ?

वैयक्तिक मत!!
सूचना /विनन्ती /आग्रह काहीही नाही बरका!!
गैरसमज नसावा .