Submitted by mansmi18 on 14 August, 2012 - 11:09
नमस्कार,
नुकताच खय्याम यांच्या गाण्यांवर आधारीत "एसेन्स ऑफ गंधार" हा कार्यक्रम पाहिला. त्यात "दिखाई दिये यु, के बेखुद किया.." हे बाजार चित्रपटातील लताचे गाणे ऐकले. या गाण्याचा अर्थ लिहाल का?
मी नेटवर शोधले त्यात काहीनी अर्थ लिहिला आहे..पण इथल्या "दर्दी" लोकांकडुन ऐकायला आवडेल.
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेफिकिर!!! किती पेशंस ठेवून
बेफिकिर!!! किती पेशंस ठेवून खूप खूप छानच समजावून दिली की गज़ल!!!
मीर, गालिब् ,मोमिन,फ़ैज अहमद फ़ैज ... यांच्याबद्दल बोलणं, ऐकणं ,' कयामत के दिन ' तक कायमच राहणारे..
अतिशय सुंदर बाफ. बेफिकीर
अतिशय सुंदर बाफ. बेफिकीर धन्यवाद .अतिशय सुंदर रीतींनी समजावून दिल्याबद्दल
इतक्या सुंदर चर्चेबद्दल
इतक्या सुंदर चर्चेबद्दल तुम्हा सगळ्याना एक भेट
http://www.youtube.com/watch?v=ThRTQ6DCcIs&feature=related
http://www.youtube.com/watch?v=eH-0P8hP3dc&feature=relmfu
बहुत आरझू थी गली की तेरी सो
बहुत आरझू थी गली की तेरी
सो याँसे लहूमे नहाकर चले
>>>>>>>>> माझे दोन पैसे. माझ्यामते हा शेर शब्दशः नाही.
(प्रेयसीची प्राप्ती झालेली नाही.) त्यामुळे प्रेयसी मिळावी अशी जी आशा होती (बहुत आरझू थी गली की तेरी. म्हणूनच या ओळीत भूतकाळाचा उपयोग आहे. 'आरजू थी') ती पूर्ण न झाल्याने (अंतःकरण) उदास आणि विध्द (आणि त्यामुळे रक्तबंबाळ) झालं आहे.
अॅक्चुअली मामी तुम्ही जो
अॅक्चुअली मामी तुम्ही जो अर्थ नोंदवला आहेत तोच शब्दशः होत आहे ना?
नाही बेफी, गली म्हणजे
नाही बेफी,
गली म्हणजे प्रेयसीची गल्ली असा शब्दशः अर्थ नव्हे. तर तिची प्राप्ती.
म्हणून मी शब्दशः नाही असं म्हटलं.
उर्दू गझलेमध्ये प्रेयसीची
उर्दू गझलेमध्ये प्रेयसीची गली, कूंचा यासंदर्भात एक संकेत आहे. तो असा की निष्ठूर प्रेयसीच्या निव्वळ दर्शनासाठी तिच्या मुहल्ल्यात, तिच्या घरासमोर गर्दी जमलेली आहे. तिच्या प्रेमाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी अहमहमिका जोरात आहे. लोकांमध्ये भांडणे, मारामार्या होत आहेत. ते तिच्या उंबर्यावर डोके घासून आपला आदर व याचना व्यक्त करत आहेत. पण ती दुर्लक्ष करत आहे. हाकलून देत आहे. अपमान करत आहे. तिच्या दारावरचा रक्षक त्या माणसाला दंड करत आहे इत्यादी. हा संकेत मोठ्या प्रमाणावर योजला गेलेला आहे उर्दू गझलेत. याचा एक नकळतपणे वापरला गेलेला अर्थ म्हणजे 'आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या लोकांपुढे आपल्याला मान तुकवावी लागते' त्यांचाही उल्लेख होणे. जसे गालिबला इंग्रजांपुढे मान तुकवावी लागायची ती थांबवलेल्या पेन्शनसाठी. कृपा व्हावी म्हणून आपण सगळे देवापुढे मान तुकवतो वगैरे! त्यामुळे गलीची प्राप्ती म्हणजे प्रेयसीची प्राप्ती हे त्या शेरात मुळात अध्याऋतच आहे.
(म्हणजे गली म्हणजे प्रत्यक्ष ती गल्ली असे मानून वर प्रतिसाद दिले गेलेले नाही आहेत. ज्यांनी त्याबद्दल लिहिले आहे त्यांनी हा संकेत मनात ठेवूनच लिहिले आहे)
निकलना खुल्दसे आदमका सुनते आये थे लेकिन
बडे बेआबरू होके तेरे कूंचेसे हम निकले
- गालिब
(स्वर्गातून आदमची - परवानगी नसतानाही एका झाडावरील फळ खाण्याबद्दल - जितक्या तुच्छपणे हकालपट्टी झाली त्यापेक्षाही अधिक बेअब्रू करून तू मला तुझ्या गल्लीतून बाहेर काढलंस)
माझी अत्यन्त आवडती गझल..
माझी अत्यन्त आवडती गझल.. शब्द न शब्द पाठ आहे. अर्थ मी माझ्या (बाल)बुद्धीप्रमाणे लावला होता. आज पहिल्यांदाच गझल व्यवस्थित समजली.
mansmi18 या धाग्याबद्दल आभार आणि बेफीकीरजी गझल उलगडून दिल्या बद्दल तुमचे ही आभार.
हा धागा निघाल्याच्या दुसर्या
हा धागा निघाल्याच्या दुसर्या दिवशी 'मीरकी शायरी'मध्ये मी मुद्दाम वाचले तर त्यात 'यास-ए-लहू' असा उल्लेख नाही आहे. म्हणजे 'याँसे लहू' हे जे मी वर म्हणालो होतो ते योग्य असावे असे दिसते.
उत्तम गझलकाराला अॅटिट्युड
उत्तम गझलकाराला अॅटिट्युड असतोच आणि प्रेयसीकडून वारंवार अपमान होऊनही त्यातच सुख मानणे यात विरोधाभास नाही का?
बेफि....या संदर्भात एकदोन
बेफि....या संदर्भात एकदोन किरकोळ शंका....
प्रेयसीच्या आराधनेपोटी बेअब्रू होऊन आशिक तिथून निघतो इतपर्यंत ठीक. पण मग मी काही ठिकाणी पाहिले आहे की अशा प्रसंगी एक गझलकार 'गली' वापरतो तर दुसरा 'कुंचा {कुचा असे देखील मी वाचले आहे}...असे असेल तर मग गली आणि कुचा यात काही सूक्ष्म फरक असू शकतो का ?
दुसरे : गालिब म्हणतात "....बडे बेआबरू होके तेरे कूंचेसे हम निकले...". तुम्ही केलेला अनुवाद सुचवितो..."बेअब्रू करून तू मला तुझ्या गल्लीतून बाहेर काढलंस..."
~ पण असे असू शकेल का की... प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बेआबरू झाली म्हणून मीच तुझ्या गल्लीतून बाहेर पडलो....?
अशोक पाटील
उत्तम गझलकाराला अॅटिट्युड
उत्तम गझलकाराला अॅटिट्युड असतोच आणि प्रेयसीकडून वारंवार अपमान होऊनही त्यातच सुख मानणे यात विरोधाभास नाही का?<<<<<<
गझलकाराला हा अॅटिट्यूड असतो की त्याच्या गझलेतला कवी वारंवार अपमान सहन करूनही तेथेच लुडबुडतो
============
कूंचा व गली यात काही सूक्ष्म फरक असल्यास मला माहीत नाही. मला जे माहीत आहे की ते समानार्थी शब्द आहेत.
कोणाला माहीत असल्यास / कळल्यास कृपया नोंदवावे.
============
पण असे असू शकेल का की... प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बेआबरू झाली म्हणून मीच तुझ्या गल्लीतून बाहेर पडलो....?<<<
शब्दार्थ तोच होत आहे की 'मी निघालो'! पण आदमला हाकलून देण्यात आले होते, बाहर निकले हे बाहर निकाले गये या अर्थी आहे
धन्स बेफी. छान खुलासा केलात.
धन्स बेफी. छान खुलासा केलात.
गझलकाराला हा अॅटिट्यूड असतो
गझलकाराला हा अॅटिट्यूड असतो की त्याच्या गझलेतला कवी वारंवार अपमान सहन करूनही तेथेच लुडबुडतो >> म्हणजे अतिव दु:खाने दु:खाचाच कैफ चढतो तसा कविला अपमानाचाच कैफ आहे असे का?
खरे तर होय, त्या (उर्दू
खरे तर होय, त्या (उर्दू गझलेतील) प्रियकरांना (जुनूं, उन्माद) हा त्या अतीव दु:खाचाच चढतो
(म्हणजे अश्याच अर्थाने शे'र लिहिले जातात)
अश्विनी, काहीसा असा पद्यमय
अश्विनी, काहीसा असा पद्यमय अर्थ..काव्याचा आनंद घेण्यासाठी.
फकीराना आये सदा कर चले
मियाँ खुष रहो हम दुवा कर चले
आलो फकीरासारखा मी साद घालून चाललो
मित्रा रहा रे तू सुखी इतकेच मागून चाललो
जो तुझबिन न जीनेको कहते थे हम
सो इस अहदको अब वफा कर चले
जगणे नको तुजवाचुनी म्हटले असे जे नेहमी
ते वचन माझे आज मी पाळून येथून चाललो..
कोई नाउम्मीदाना करते निगाह
सो तुम हमसे मुंहभी छिपाकर चले
ते नष्ट लोक तुझ्याकडे टक लावूनी बघतात का
तू का लपविसी चेहरा हा मी समोरून चाललो !
बहुत आरझू थी गली की तेरी
सो याँसे लहूमे नहाकर चले
आसावलो किती यायला वस्तीत तुझिया जिवलगे
नैराश्य रक्तातील मी न्हाऊन घेऊन चाललो
दिखाई दिये यूं के बेखुद किया
हमे आपसेभी जुदा कर चले
दिसलीस तू अन हरवले मी भान स्वतःचे असे
गेलीस तरीही अवाक मी! तुजला दुरावून चाललो
जबीं सिज्दा करतेही करते गयी
हक-ए-बंदगी हम अदा कर चले
कितीदा रगडले भाळ मी त्या उंबर्यापाशी तुझ्या
अधिकार भक्तीप्रीतीचा माझा बजावून चाललो
पुरस्तिश की यां तक की ऐ बुत तुझे
नजरमे सबोंकी खुदा कर चले
पाषाणहृदयी मूर्ती तव मी नित्य इतकी पूजिली
नजरेत सर्वांच्या तुझे देवत्व स्थापून चाललो
कहें क्या जो पूछे कोई हमसे 'मीर'
जहाँमे तुम आये थे क्या कर चले
कोणी विचारील तेधवा मी 'मीर' सांगू काय ते
आलो कशास्तव येथ मी अन काय मिळवून चाललो
वा, बेफिकीर, ह्या गझलेचा अर्थ
वा, बेफिकीर,
ह्या गझलेचा अर्थ कळाल्याने अधिक आवडली आहे
मनःपूर्वक आभार!
ह्या धाग्यासाठी आभार mansmi!
कूचः = दोन घरांमधे असलेली
कूचः = दोन घरांमधे असलेली अतिशय अरुंद बोळवजा गल्ली..(तंग गली,वीथी)
गलीकूचे..म्हंजे आपले गल्लीबोळ..
बेफी म्हणाले तसं..सूक्ष्म
बेफी म्हणाले तसं..सूक्ष्म फरकच आहे दोन्हीत
अतिशय सुंदर अनुवाद भारती.
अतिशय सुंदर अनुवाद भारती. अभिनंदन! (मंदाकिनी वृत्तातील या रचनेत काही अक्षगणवृत्तीय तृटी आहेत त्यासाठी तुम्ही तो २१८८९ (की नेमका कोणता) तो धागा पाहू शकाल)
अनेक सुंदर ओळी!
सुंदर चर्चा. धन्य्वाद बेफी,
सुंदर चर्चा.
धन्य्वाद बेफी, स्वाती, भारतीजी 
( थोडासाच अर्थ कळत असूनही पुनः पुनः ऐकलेली - ऐकाविशी वाटलेली )
धन्यवाद वर्षू नील
धन्यवाद वर्षू नील
भारती ताई , ग्रेsssssट......
भारती ताई , ग्रेsssssट......
हजार बार जमाना इधरसे गुजरा
हजार बार जमाना इधरसे गुजरा है
नयीनयीसी है कुछ तेरी रहगुजर फिर भी
- फिराक गोरखपुरी
(यात वेगळ्या प्रकारचा अर्थ असावा असे वाटते) (म्हणून दिला)
थॅन्क्स वर्षू-नील... आता
थॅन्क्स वर्षू-नील...
आता चित्र स्पष्ट स्वच्छ झाले. एकाने 'कूचा' म्हणजे सडक सांगितले; पण सडक म्हटले की अकारण आकाराचा भला मोठा कॅनव्हास नजरेसमोर येतो; पण गल्लीबोळ म्हटले की मग त्या प्रियकराची फाटकी चोरटी अवस्था हुबेहूब उभी राहते.
शेक्सपीअरच्या 'रोमिओ-ज्युलिएट' मधील रोमिओची भटकंती अशीच गल्लीबोळातीलच दाखविण्यामागे लेखकाचा हास उद्देश असावा.
बेफिकीर ,नमस्करोमि ! वृत्तही
बेफिकीर ,नमस्करोमि ! वृत्तही सांगून मोकळे झालात.अभ्यास चालू राहील. :))
सामी ,अनघा मजा आली ना? मला स्वतःची गझल लिहिता येत नाही म्हणून हा उपद्व्याप. :))
धन्स मनस्मीजी,आम्ही एंजॉय केलं
धन्यवाद बेफि.
धन्यवाद बेफि.
बेफिकीर भेटायलाच हवं
बेफिकीर भेटायलाच हवं आपल्याला..
गझल परिचयासाठी, वाचण्याचा मला भयंकर कंटाळा आहे..
भारती, विनंतीला प्रतिसाद देऊन
भारती, विनंतीला प्रतिसाद देऊन या गझलेचा अतिशय सुंदर प्रकारे अर्थ सांगितल्या बद्दल धन्यवाद गं
संपूर्ण गझल दिल्याबद्दल
संपूर्ण गझल दिल्याबद्दल धन्यवाद बेफिकिर.
Pages