"दिखाई दिये यु, के बेखुद किया - गाण्याचा अर्थ

Submitted by mansmi18 on 14 August, 2012 - 11:09

नमस्कार,

नुकताच खय्याम यांच्या गाण्यांवर आधारीत "एसेन्स ऑफ गंधार" हा कार्यक्रम पाहिला. त्यात "दिखाई दिये यु, के बेखुद किया.." हे बाजार चित्रपटातील लताचे गाणे ऐकले. या गाण्याचा अर्थ लिहाल का?
मी नेटवर शोधले त्यात काहीनी अर्थ लिहिला आहे..पण इथल्या "दर्दी" लोकांकडुन ऐकायला आवडेल.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण इथल्या "दर्दी" लोकांकडुन ऐकायला आवडेल.<<<

अशी आशा असूनही मी लिहिण्याचे धाडस करतो

ही मीरची गझल आहे

दिखाई दिये यूं के बेखुद किया
हमे आपसे भी जुदा कर चले

(तिचे असे दर्शन झाले की मी धुंद झालो, मी माझ्यापासूनच दुरावलो, वेगळा झालो)

पुरस्तिश की यां तक की ऐ बुत तुझे
नजरमे सबोंकी खुदा कर चले

(तुझी - प्रेमात - अक्षरशः - इतकी भक्ती केली, की लोकांना वाटायला लागले की ही कोणी देवीच असावी, तुला इतरांच्या नजरेत - मनात - देव बनवून गेलो)

ही घ्या पूर्ण गझल :

फकीराना आये सदा कर चले
मियाँ खुष रहो हम दुवा कर चले

जो तुझबिन न जीनेको कहते थे हम
सो इस अहदको अब वफा कर चले

कोई नाउम्मीदाना करते निगाह
सो तुम हमसे मुंहभी छिपाकर चले

बहुत आरझू थी गली की तेरी
सो याँसे लहूमे नहाकर चले

दिखाई दिये यूं के बेखुद किया
हमे आपसेभी जुदा कर चले

जबीं सिज्दा करतेही करते गयी
हक-ए-बंदगी हम अदा कर चले

पुरस्तिश की यां तक की ऐ बुत तुझे
नजरमे सबोंकी खुदा कर चले

कहें क्या जो पूछे कोई हमसे 'मीर'
जहाँमे तुम आये थे क्या कर चले

- मीर तकी मीर

सोया से लहु मे नहाकर चले.. (ही ओळ अशीच ऐकु येते.. चु भु द्या.घ्या)
<<<

ही ओळ अशी आहे.

सो याँसे लहूमे नहाकर चले

===========

तुझ्या मुहल्ल्यात (तू जेथे राहतेस तेथे यायची) खूप इच्छा होती. (पण तेथे आलो की तुझ्या प्रेमातले माझे प्रतिस्पर्धी आणि खुद्द तुझे माझ्याबाबतीतले क्रौर्य मला रक्तबंबाळ करते म्हणून सवय असावी म्हणून) मी येथूनच रक्तबंबाळ होऊन निघालो

(हा मला लागलेला अर्थ - तसा 'उत्तम'ही आहेच)

( मात्र हा मला लागलेला अर्थ नेमका नाही हे खालील प्रतिसादांमधून दिसावे. पण तरीहॉ, जर खरंच 'यास-ए-लहू' असे नसले तर माझा अर्थ अधिक सुंदर आहे हे मात्र नक्की) Happy

(यासाठी अश्विनींचे आभार)

-'बेफिकीर'!

दिखाई दिये यूं के बेखुद किया
हमें आपसे भी जुदा कर चले

जबीं सिज्दा करते ही करते गयी
हक-ए-बंदगी हम अदा कर चले

पुरस्तिश की याँ तक के ऐ बुत तुझे
नजर में सबोंकी खुदा कर चले

बहुत आरझू थी गली की तेरी
सो यास-ए-लहू में नहा कर चले

जभीं सजदा करते ही करते गयी<<< जभीं नाही, जबीं! जबीं म्हणजे कपाळ!

( सिज्दा म्हणजे आदराने - अती प्रेमाच्या आवेगाने वगैरे - कपाळ ' उंबर्‍यावर वगैरे ' घासणे)

पुरस्तिश किया तक के ऐ बुत तुझे<<< पुरस्तिश किया नव्हे! पुरस्तिश की याँ!

सो यास-ए-लहू में नहा कर चले<<<

यास - ए - लहू

यास म्हणजे औदासीन्य! म्हणजे रक्तातील औदासीन्यात नाहून निघालो.

हाच अर्थ बरोबर आहे. मला ते 'सो यां से' असे वाटत असल्याने मी तसा अर्थ दिला होता.

पूर्ण गझलसाठी धन्यवाद.

यास-ए-लहू म्हटलं तर शेरचा अर्थ काय होईल?

व्वा....भूषणराव....

दिल खुश कर दिया आपने, भाई.
लताची ती गझल तर १९८२ च्या आगेमागे 'बाजार' पाहिला त्यावेळेपासून हृदयात घर करून आहे...आजही सुप्रिया पाठक दिसते, आणि ज्याच्याकडे गातागाता ती नजर चोरून पाहते तो फारुख शेखही.

[अवांतर नाही, तरीही तुम्ही तसे समजू शकता....

"पुरस्तिश की यां तक की ऐ बुत तुझे
नजरमे सबोंकी खुदा कर चले".....

याबाबत लिहिताना तुम्ही 'देवी' चा उल्लेख केला आहे....जो योग्यच आहे. पण 'असली नकली' या चित्रपटात देव आनंद (रफीच्या आवाजात) साधनाला उद्देश्यून म्हणतो :

"एक बुत बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा...."
या ठिकाणी 'बुत = पुतळी' की 'देवी" ?]

अशोक पाटील

बुत म्हणजे मूर्ती. उर्दू काव्यात सहसा देवाची मूर्ती या अर्थी येतं. बुतपरस्ती म्हणजे मूर्तीपूजा. प्रेयसीची तुलना सहसा (प्रार्थनेला प्रतिसाद न देणार्‍या) मूर्तीशी केली जाते.

या ठिकाणी 'बुत = पुतळी' की 'देवी" ? <<<

बुत म्हणजे मूर्ती. मुस्लिम मूर्तींचा तिरस्कार (घृणा) करतात. त्यांच्यामते अल्लाह निर्विकार आहे. त्यामुळे 'बुत' (म्हणजे मूर्ती) ची पूजा करणार्‍यांना 'काफिर' म्हणतात (काफिर - इस्लामचा शत्रू, मूर्तीपूजक).

देव आनंद साधनाच्या त्या गाण्यात बुत चा अर्थ मूर्ती (पुतळा या अर्थी) असून हिंदी भाषिकांवर (हिंदी कलाकारांवर विशेषतः) उर्दूचा अतिरिक्त प्रभाव असल्याने तो शब्द तसाच्या तसा वापरणे ही यडचाप चूक झाली आहे. (तसेही, हिंदीत त्याला काय म्हणणार?)

बहुत आरझू थी ह्या शे'र' चा अर्थ शब्दशः नसावा असे मला वाटते.
<<<

गझलेत (जर गझलकार खरोखर उत्तम गझलकार असेल तर) कसलाच शब्दशः अर्थ नसतो. आणि उत्तमच नव्हे, तर एकंदरच उर्दू गझलेच्या क्षेत्रात मीर (मीर = सरदार) हा सर्वोत्कृष्ट व सर्वश्रेष्ठ मानला जातो (व त्याला कारणेही आहेत)

Happy

हम्म्म्म Happy

ते कसे आहे? की प्रेम त्या पातळीला केले की आपोआप नाला, खुने जिगर, उंगलिया फिगार, खामा खूंचका, दूद हे सर्व आपोआप येते Proud

मागे एकदा "आजही हमने बदले है कपडे, आजही हम नहाये हुये है" ह्याचा शब्दशः अनुवाद देत अर्थ दिला होता ते आठवले म्हणून लिहिले हो वरचे वाक्य. Sad

घिसते घिसते मिट जाता आपने अबस बदला
नंगे सिज्दासे मेरीं संगे आस्ताँ अपना

- गालिब

( तुझ्या प्रेमाच्या याचनेत माझ्या कपाळाने घासून घासून शेवटी संपलाच असता. तू उंबर्‍याचा दगड उगीच बदललास.)

ही गझल आत्ता परत परत ऐकली तरी मन भरलं नाहिये आणि तिच्यातला शेरांचे अर्थ अगदीच रुक्ष / कृत्रिम वाटतायत Sad मग गझल सुंदर का वाटतेय? उर्दू शब्दांच्या सौंदर्यामुळे की स्वर्गीय आवाजामुळे की खय्याम साहेबांच्या चालीमुळे?

तिच्यातला शेरांचे अर्थ अगदीच रुक्ष / कृत्रिम वाटतायत मग गझल सुंदर का वाटतेय? उर्दू शब्दांच्या सौंदर्यामुळे की स्वर्गीय आवाजामुळे की खय्याम साहेबांच्या चालीमुळे? <<<

खय्याम साहेबांनी दिलेली चाल दुर्दैवाने गझलेच्या मूळ प्रवृत्तीला न्याय देणारी नाही.

या गझलेचा अर्थ देत आहे. अत्यंत भारी गझल आहे ही.

Happy

रुक्ष, कृत्रिम नाही आहे Happy

बहुत आरझू थी गली की तेरी
सो याँसे लहूमे नहाकर चले

तुझ्याकडे यायची खूप आस होती म्हणून रक्तातल्या नैराश्याचीच आंघोळ करून निघालो..
कायकाय असेल कवीच्या मनात..

रक्तातलं नैराश्य-जुना पाळंमुळं रुजलेला पराभव जगण्यातला.नित्य साथ करणारा,त्यानेच नाहून मी येतोय -याच्यासकट मला समजून घे,स्वीकार.
असे वाटले!

खूप छान चर्चा.

"उर्दू शब्दांच्या सौंदर्यामुळे की स्वर्गीय आवाजामुळे की खय्याम साहेबांच्या चालीमुळे?"

~ मला वाटते शब्द, आवाज आणि मौसिकी....या तिन्ही घटकात वजन कुणाच्या पारड्यात टाकायचेच झाल्यास 'शब्द' प्रथम येतील [यात दुमत असू शकेल....पण शब्द जर तसे लखलखीत धारदार असतील तर संगीतकार त्या रचनेला 'चार चाँद' लावू शकतो. आणि आवाजाबाबत तर आपल्या देशात विलक्षण गुणवत्तेची खाणच आहे. संगीतकाराला नेमके माहीत असतेच की अमुक एका गझलेला कुणाचा आवाज शोभून दिसेल.

'गमन' मधील....

"सिने मे जलन...." ह्या गझलेसाठी खय्याम यानी सुरेश वाडकर यांचा आवाज वापरला आणि सुरेशजींचे ते पहिलेच गाणे असावे, असा सुंदर मिलाफ.

शहरयार यांच्या रचनेतील याच गझलमधील एका कडव्यातील :

"दिल है तोह, धडकने का बहाना कोई ढुंढे....
पत्थर की तरह बेहिजा-ओ-बेजान सा क्यों है ?"

~ बेहिजा = संवेदनशून्य आणि बेजान = अचेतन
असा अर्थ समजल्यावर झटदिशी त्या गझलमधून प्रतीत होत असलेल्या नायकाची घालमेल समजून चुकली.

बेफिकीर शहरयार यांच्या या गझलवर जास्त प्रकाश टाकू शकतील.

अशोक पाटील

उपरोधाने भरलेली गझलः

मीर तकी मीरची:

फकीराना आये सदा कर चले
मियाँ खुष रहो हम दुवा कर चले

(च्यायला आपलं काहीच चांगलं झालं नाही. मग काय करायचं? इतरांना आशीर्वाद, गूड विशेश देत बसा. तेच आम्ही केलं)

जो तुझबिन न जीनेको कहते थे हम
सो इस अहदको अब वफा कर चले

(तसाही खरे तर मी तुझ्याशिवायच जगत होतो. पण तेव्हा तू माझी होशील अशी आशा होती. आता तू माझी झालेली नाहीस हे कळल्यानंतर त्यावेळच्या माझ्या वागण्याला मी 'वफा' म्हणजे प्रेमातला प्रामाणिकपणा म्हणून मोकळा होत आहे) Lol

कोई नाउम्मीदाना करते निगाह
सो तुम हमसे मुंहभी छिपाकर चले

(ज्यांना तू कधी प्राप्त होणे शक्यच नाही तेही तुझ्या - सौंदर्याकडे - कडे बघतात हे समजल्यानंतर तू माझीही नजर चुकवायला लागलीस???) Proud

बहुत आरझू थी गली की तेरी
सो याँसे लहूमे नहाकर चले - वरील प्रतिसादात दिलेला आहे

दिखाई दिये यूं के बेखुद किया
हमे आपसेभी जुदा कर चले - वरील प्रतिसादात दिलेला आहे

जबीं सिज्दा करतेही करते गयी
हक-ए-बंदगी हम अदा कर चले

आम्ही कपाळाने - तुझ्या घराच्या उंबर्‍याचा दगड - घासत राहिलोच. काही का असेनात, प्रेमाच कर्तव्य - जे तुझ्यासंदर्भात इतके क्लेशदायी असते - ते आम्ही पूर्ण करूनच गेलो)

पुरस्तिश की यां तक की ऐ बुत तुझे
नजरमे सबोंकी खुदा कर चले - वरील प्रतिसादात दिलेला आहे

कहें क्या जो पूछे कोई हमसे 'मीर'
जहाँमे तुम आये थे क्या कर चले

यार आपल्याला जर कोणी विचारलंच 'मीर', की तुला एवढे जीवन मिळाले होते, त्याचे काय केलेस? तर आपण बोलणार काय?

Happy

बेफिकीर शहरयार यांच्या या गझलवर जास्त प्रकाश टाकू शकतील.

<<< एकंदर मीर आणि गालिबपुढे शहरयार हे 'शब्दप्रभू' पेक्षा अध्क नव्हते. (शहरयारवर एक लेख लिहिलेला आहे मी) Happy

=====================

ओके. नीट सलग अर्थ देताय का? वरच्यासारखा तुटका तुटका (आणि खरंच रुक्ष) नको. अर्थ गद्यात असला तरी त्यातून काव्य जाणवायला हवं <<<

अश्विनी के,

मीर बाबत असा प्रतिसाद देण्यात शहाणपण जाणवायला हवं! जे तुमच्या प्रतिसादात मला 'न' आढळल्याने मीर तुम्हाला समजावून सांगण्यातील स्वारस्य संपलेले आहे. माफ करा, काही इतर कवींना गाठा.

ह्या गजलेचा अर्थ मलाही आजवर कळला नाहीय. अर्थात गजल अतिशय सुंदर आहे, कितींदा ऐकली तरी मन भरतच नाही, पण इतक्यांदा ऐकुनही नेमका तर सोडाच साधारण जवळपास जाणाराही अर्थ मला कधी कळला नाही.

एकदा नेटवर ह्याचा अर्थ शोधत असताना खालील लिंक सापडलेली. आज परत शोधुन काढली. त्यात या गजलेला एकदम वेगळेच परिमाण दिलेले आढळले.

http://www.sukh-dukh.com/forums/showthread.php?t=638

बेफी, धन्यवाद. गालिबचा शेरही मस्त. Happy

भारती, 'यास-ए-लहू'च्या अर्थासाठी तुमचेही धन्यवाद. Happy
माझ्याच मनात दडलेल्या निराशेवर मात करून (तू अप्राप्य आहेस हे माहीत असूनही) मी तुझ्याकडेच निघालो आहे - असा अर्थ लागतो आहे मला.

आहा हा... काय बाफ उघडला... काय ती चर्चा...

बेफी... सलाम, सजदा, आदाब तुम्हाला... !!! तुमच एक वाक्य मला नेहमी आठवतं, " उर्दू गझलांची मजा, मराठी गझलेत नाही" खरय...

मीर, गालिब... ह्यांच्य बद्दल काय बोलणारं

Pages