जे .कृष्णमुर्ती कविता

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 8 August, 2012 - 09:06

जे .कृष्णमुर्ती कविता -- मला उमगलेले कृष्णजी, हा कृष्णजीच्या तत्वज्ञानाचा मला झालेला बोध आहे .त्यावर टीका टिप्पणी नाही .ज्ञात अज्ञात मित्रांशी share करण्यासाठी हा प्रपंच .

सत्याचे आकलन
का असते जहांगिरी कुणाची
का मालकी कधी कुणाची
व्रतस्थ राहून वासनांचे
दमन करणा-या तापसांची
पुस्तकी ज्ञानाने वाकलेल्या
जड मतांध पंडिताची
गादीवर बसून धनिक शिष्यांची
फौज उभारणा-या गुरूंची
तिथे नम्र अतिनम्र होऊन
बाहेर फुत्कारणा-या शिष्यांची

सत्याचा उदय होण्यास
कश्याचीही कुणाचीही
मुळीच गरज नाही
गरज आहे ती फक्त
स्वत:त असलेल्या ''तळमळीची''
अन जाणवणाऱ्या ''तातडीची''

सत्याच्या आकलनास हवे अंतर
अत्यंत नम्र ऋजू नितांत सुंदर
तितकेच दृढ आणि सशक्त
नाना मतांच्या गजबजाटात
नाना निष्टांच्या अरण्यात
न हरवता वाट जे राहते सदैव
शांत निस्तब्ध विमुक्त

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशय विषय छान आहे .शब्द सुटसुटीत साधे निवडलेत तेही आवडले .
एकन्दर कवितेचा परिणाम व्हायला हवा तसा नाही झाला ..........त्यामुळे आपणास जे म्हणावयाचे आहे ते पूर्णपणे पोचत नाही किम्बहुना नक्की उलगडाच होत नाही आहे .

अजून काव्यात्मकता आपण नक्कीच आणू शकला असता असे वाटले
(ओळी नीटशा वाक्यात्मकही नाहीत झालेल्या तिकडेही लक्ष पुरवावे जेणे करून अर्थ पूर्णपणे उलगडेल वगैरे )
पुलेशु

परखड प्रतिक्रियेकरिता क्षमस्व
आपला नम्र
वैवकु