कन्दाचा रोस्टी व मूग कढीलिम्बाचे रायते

Submitted by anjut on 23 September, 2007 - 14:02

३ मोठे बटाटे किसून अर्ध रताळ किसून,१०० ग्राम कन्द किसून ३ कच्ची केळी किसून १ पाकीट मश्रूम्स,२ टे स्पून कोथिम्बीर चिरलेली, ४ मिरच्या बारीक चिरून,२ टे स्पून तूप्,थोडेसे भाजलेले जिरे,वाटलेले आले लसूण १ टे स्पून, चीज पाऊण वाटी, मीठ चवीनुसार.
प्रथम ९ इन्च व्यासाचा निर्लेप तवा तूप लावून तयार ठेवावा. सर्व कन्दान्चा कीस एकत्र करून त्यात मीठ घालावे. त्यातील अर्धा कीस तव्यावर थापावा. वर पातळ स्लाईस केलेले मश्रूम कोथिम्बीर मिरची चीज जिरे आले लसूण हलकेच मिसळून पसरावे.परत उरलेला कीस हलकेच वर थापून सारण पूर्ण पणे झाकावे.पो़कळ झा़कण ठेवून १ वाफ आणावी मग झाकण काढून खालील बाजू ताम्बूस होईपर्यन्त मन्द आचेवर ठेवावे.खालील बाजू खरपूस झाली की हळूच उलटून दुसरी बाजूही परतून घ्यावी. उलटल्यावर बाजूने तूप सोडावे.वाढताना चार तुकडे करून घ्यावेत. ही रोस्टी मूग-कढीलिम्बाच्या रायत्या बरोबर खावी.
मूग व कढीलिम्बाचे रायते:
१ वाटी वाफवलेले मोडाचे मूग,१ वाटी ताजा कढी लिम्ब ३ हिरव्या मिरच्या, लसूण पात १ जुडी, १ टेबल स्पून तूप, १ चमचा बारीक चिरलेले आले, २ कप घट्ट दही, मीठ, साखर.
कढईत तूप तापवून कढीलिम्बाची पाने कुरकुरीत तळून घ्यावीत. मिक्सर मध्ये लसूण मिरच्या मीठ सा़खर वाटून घ्यावे. तळलेली पाने हातानी कुस्करून सर्व एकत्र करावे.
थन्ड करून गरम रोस्टी बरोबर खायला द्यावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळा आणि छान पदार्थ आहे 'रोस्टी'.
रायत्याची कृति पण आवडली.

रेसिपि मस्त वाटतेय आणि नेहमिपेक्षा वेगळी पण!! शिवाय कढिलिंबाचा उपयोग चांगला होतोय. एरवि चटणीशिवाय एवढा वापरला जात नाही ना!!
करुन पहायला हवी..