"हुस्न-ए-कश्मीर" (४) — अवंतीपुर

Submitted by जिप्सी on 8 August, 2012 - 00:57

=======================================================================
=======================================================================
या मालिकेतील आधीची प्रवासचित्रे. Happy
१. "हुस्न-ए-कश्मीर"
२. राजधानी दिल्ली - कुतुबमिनार

३. "राजधानी दिल्ली"
४. "हुस्न-ए-कश्मीर" (१) — श्रीनगर (दल सरोवर)
५. "हुस्न-ए-कश्मीर" (२) — मुघल गार्डन्स
६. "हुस्न-ए-कश्मीर" (3) — गुलमर्ग
=======================================================================
=======================================================================
"...ऐसा लगता है कि वो किसी और सदी कि बात थी.
शायद उन दिनो कि बात होगी जब ये इमारत उजडी नही थी
पिछले किसी जनम कि बात हि तो लगती है
एक काम करो, जब तक तुम यहा हो रोज घर पे खाने के लिए तो आया करोगी हि, खाने के बाद घुमने निकल आएंगे कमस्कम ये इमारत कुछ दिनो के लिए तो बस जाएगी"

वरील संवाद आठवतायंत का?
नाही?
अच्छा....तर मग "तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही... हे "आँधी" चित्रपटातलं गाणं नक्कीच आठवत असणार. याच गाण्यातील ती "उजडी" इमारत म्हणजेच आजच्या काश्मिर भेटीचे ठिकाण "अवंतीस्वामी मंदिर - अवंतीपुर".

श्रीनगर पासुन अनंतनागच्या रस्त्यावर अवंतीपुर गावातील हे मंदिर उत्खननात सापडले. प्रवेश फि ५/- प्रति माणशी. हा सर्व परीसर दाखवण्यासाठी गाईड उपलब्ध आहे.
अधिक माहिती येथे वाचा.

आम्हीही एक गाईड घेतला. सर्व माहिती सांगत असताना त्याने राजा अवंतीस्वामीच्या शिल्पाकडे आम्हास नेले. त्याची माहिती सांगत असताना त्याने वरील गाण्याचा संदर्भ दिला आणि सांगितले कि याच गाण्यातील तो "....ये जो फुलो कि बेले नजर आती है ना दरअसल वो बेले नही अरबीमें आयते लिखी है.." यातील फुलोंकि बेले म्हणजे राजा अवंतीस्वामीच्या गळ्यातील ती फुलांची माला आणि अरबी मधली आयते काळाच्या ओघात नष्ट झाली (प्रचि क्र. १२, १३ ). सारखा सारखा तो आपला "फुलोंकि बेले" वरच अडकत होता. Happy माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी हे गाण असल्याने आणि कॉलेजात असल्यापासुन हे गाण अक्षरशः कोळुन प्यायल्याने मला काहि ते पटत नव्हतं (कारण मूळ गाण्यात वरील संवाद कश्मिरमधल्या कुठल्यातरी बागेत आहे :-)). त्यामुळे हा गाईड काहीतरी भलतंच सांगत होता हे पटलं. Happy इथे तिथे फिरल्यावर पुन्हा मी त्या गाईडकडे गेलो आणि "....ये फुलो कि बेले" बद्दल विचारलं त्याने परत थातुर मातुर उत्तर दिले.:फिदी: अर्धा तास मंदिर परीसर फिरल्यावर जाताना पुन्हा एकदा त्याला "....ये फुलो कि बेले" बद्दल विचारले Proud यावेळी मात्र त्याने "चलो आपका एक गृप फोटो निकालता हुं" असं म्हणुन माझ्या प्रश्नाला बगल दिली आणि जितके पैसे दिले तितके घेऊन निमुटपणे दुसर्‍या गृपकडे पटकन निघुन गेला.:हाहा:

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
राजा अवंतीस्वामी
प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

=======================================================================
=======================================================================
(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आँधी मधलं ते दुसरंच कुठलं गार्डन असेल नाहीतर हिंदू मंदिरात 'आयतें' कशी आढळणार.. तू उगीचच त्या बिचार्‍या गाईड ला त्रास देत बसला होतास Proud

वर्षूदी Proud

आँधी मधलं ते दुसरंच कुठलं गार्डन असेल नाहीतर >>>>हो तो संवाद दुसर्‍याच बागेतला आहे. पण तो गाईड सांगत होता याच मंदिरातला आहे. Happy ती "आयते" आता नष्ट झाली आहेत म्हणुन सांगत होता. Happy

ते गाणं माझही आवडत आहे रे. Happy
मंदिर खुप सुंदर आहे. ह्याचे अवशेष असे तर पुर्ण मंदिर किती जबरदस्त असेल ना?

फोटो काय नेहमी छानच काढतोस तु. ते वेगळ सांगायची गरज नाहिये. Happy

आमच्या ट्रीपमध्ये आमची बस श्रीनगरहून पहलगामला जाताना या मंदिराच्या बाहेर फक्त २ मि. ऊभी केली गेली होती व आम्ही खाली न ऊतरता बसमधुनच फोटो काढले होते. त्या फोटोंमध्ये कंपाउंड चे गेट मध्ये आले आहे. हा त्याचा झब्बु -

Avantipura Mandir.JPG

सुंदर Happy

अवंतीपूरच्या भग्नावशेषांत फिरताना मी अक्षरशः हरवून गेले होते. तिथून पाय निघत नव्हते.

आम्ही तिथे शिरत असतानाच एक मध्यमवयीन सरदारजी जवळ आला आणि 'मी इथला गाईड आहे' म्हणत, आम्हाला गाईड हवा आहे, नाही, काही न विचारता त्यानं सरळ बडबड सुरू केली. मग थोडावेळ पुढीलप्रमाणे संवाद झाला -

सरदारजी : बडबडबडबड
अजय : तुम्ही इथले ऑफिशियल गाईड आहात?
सरदारजी (दुर्लक्ष करून) : बडबडबडबड
अजय : आप जेके टुरिझमके गाईड हैं?
सरदारजी (दुर्लक्ष करून) : बडबडबडबड
अजय : नाम क्या है आपका? आप ऑफिशियल गाईड हैं?
सरदारजी (दुर्लक्ष करून) : बडबडबडबड
अजय (त्याला गप्प करत) : एक मिनिट, एक मिनिट, मेरी बात सुनो... आप ऑफिशियल गाईड हैं?
सरदारजी : नहीं, लेकिन मैं सिर्फ साडेपाचसौ रुपये लूँगा !!
अजय : आप जाईये, हमें गाईड नहीं चाहीये...

Lol

नंतर कळलं, की तिथे कुठलाच अधिकृत गाईड नेमला गेलेला नाहीये !!

आम्ही तिथे शिरत असतानाच एक मध्यमवयीन सरदारजी जवळ आला आणि 'मी इथला गाईड आहे' म्हणत>>>>>लले, आमचा तो गाईडही सरदारजीच होता. :फिदी:. आमच्याकडुन फक्त ५० रूपये घेतले त्याने. Happy

Happy

अवंतीपूरचे बदाम प्रसिद्ध आहेत. विकत घेतले की नाही? Happy

आमच्या ड्रायवरने आम्हांला हेच मंदीर 'पांडव मंदीर' म्हणून दाखवले होते. Uhoh तेव्हा एवढी फुलझाडे वगैरे आणि बोर्ड वगैरे काही नव्हते.
माझ्याकडचा फोटो टाकते आहे.
प्रचि क्र. २२ मध्ये उजव्या कोपर्‍यातले टॉवरवाले घर माझ्याकडच्या फोटोतही उजव्या कोपर्‍यातच दिसते आहे बघ. Happy

maabo1.JPGUhoh

मस्तच Happy