"हुस्न-ए-कश्मीर" (3) — गुलमर्ग

Submitted by जिप्सी on 6 August, 2012 - 00:59

=======================================================================
=======================================================================
या मालिकेतील आधीची प्रवासचित्रे. Happy
१. "हुस्न-ए-कश्मीर"
२. राजधानी दिल्ली - कुतुबमिनार

३. "राजधानी दिल्ली"
४. "हुस्न-ए-कश्मीर" (१) — श्रीनगर (दल सरोवर)
५. "हुस्न-ए-कश्मीर" (२) — मुघल गार्डन्स
=======================================================================
=======================================================================

कही कोई झरना गझल गा रहा है, कही कोई बुलबुल तराना सुनाए
यहा हाल ये है के सांसो की लय पर खयालोमें खोया बदन गुनगुनाए
इन हसीन वादियोंसे दो चार नजारे चुरा ले तो चले

प्रचि ०१

पहिल्या दिवशी श्रीनगरची भटकंती झाल्यावर दुसर्‍या दिवशी गुलमर्गला जाण्याचा बेत ठरला होता. ठरल्याप्रमाणेच दुसर्‍या दिवशी मंझुरमलिकचा भाऊ जहांगीर गाडी घेऊन सकाळी ठिक साडेआठवाजता गेस्ट हाऊस जवळ आला. आम्हीही तयार होतोच. श्रीनगर-गुलमर्ग अंतर साधारण ४०-४५किमी आहे. गुलमर्गला जाताना जहांगीरने आम्हाला सफरचंदाच्या, अक्रोडच्या बागा दाखवल्या. टंगमर्गच्या पुढे काही किमी अंतरावर "ड्रंग (Drang)" नावाचे एक सुंदर पण काहीसे अपरीचित ठिकाण आहे, ते तुम्ही नक्की पहा हा ड्रायव्हरचा आग्रह आम्हाला काही मोडवला नाही. अतिशय सुरेख असं हे ठिकाण. ग्लेशिअर्स मधुन येणारे थंडगार पाणी आणि सभोवतालचा निसर्ग, फक्त खळाळत जाणार्‍या पाण्याच्या आवाज. इथे शाळेच्या सहली आल्या होत्या. गुलमर्गच्या वाटेतली हि अनवट जागा नक्कीच भेट देण्याजोगी आहे.
Drang
3.5km from Tangmarg, a motorable road leads to this famous picnic spot. A day trip from Gulmarg can be made far enjoying at the Ferozepur nallah ‘river’. Once a Tax collection point while passing into the Valley, ‘Drang’ has now became a favorite tourist spot with beautiful mountains of Gulmarg forming a valley through which the crystal clear waters of Ferozepurr nallah flows.JKTDC has launched a new park along the river.
(आंतरजालाहुन साभार)

प्रचि ०२

प्रचि ०३
ड्रंगला जाणारा रस्ता

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

पुढे गुलमर्गला पोहचल्यावर, मनसोक्त फिरल्यावर "गंडोला" राईड्ससाठी निघालो. (इथे घोडेवाले तुमच्या मागे लागतात आणि गंडोलाचे अंतर खुप आहे, घोड्याची सवारी घ्या असं सांगतात पण चालत अगदी जवळच आहे.)
गंडोला केबलकारची तिकिट पहिल्या फेजपर्यंत ३०० आणि त्याच्या पुढे (जर जायचे असेल तर) ५०० अशी एकुण ८०० रुपये प्रतिमाणशी आहे. दोन्ही फेजची तिकिटे खालीच मिळतात. पहिल्या फेजवर बर्फ नसल्याचे कळल्याने आम्ही दोन्ही फेजच्या तिकिट्स घेतल्या. पहिल्या भागात गेल्यावर केबल कारमधुन उतरून तुम्हाला दुसर्‍या केबलकार मध्ये बसवतात. दुसर्‍या भागात मात्र भरपूर बर्फ होता. Happy कश्मिरला गेलो आणि बर्फात खेळलो नाही, असं कसं होईल? मग मात्र कॅमेर्‍या म्यान केला आणि मनसोक्त बर्फात खेळुन घेतले.

गुलमर्ग
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९
गंडोला केबल कार (सर्व प्रचि काचेतुन घेतले आहे)
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
बाबा रेशी दर्गा
Shrine (Ziarat) of Baba Reshi, dedicated to Muslim scholar and saint Baba Reshi, is a sacred mosque in the valley of Gulmarg. This tomb was built in 1480. Baba Reshi was an important courtier during the period of King of Kashmir Zain-ul-Abidin and is considered as a holy shrine.
The five century old shrine was constructed with the architectural styles of Persian and Mughals. The shrine is located in a vast expanse of greenish lawns and it can accommodate many thousands at a time.This sacred tomb is a highly revered religious attraction and thousands of devotees visit this shrine every year. Tourists can access by local means of transportation such as sledges and field chutes.
(आंतरजालाहुन साभार)
प्रचि २८

बाबा रेशी दर्ग्याला भेट देऊन आम्ही श्रीनगरकडे निघालो.
=======================================================================
=======================================================================
(क्रमश:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन, झकास, वर्षूदी धन्यवाद.

प्लीज एडिट करून टाक ना ते.>>>>>वर्षूदी, शेवटचा पॅरा डिलीट केला.

मस्त Happy

सुंदरच प्रचि.
तू यापुढे प्रचिंच्या खाली तारखा टाकत जा, म्हणजे कुठल्या दिवसात तिथला निसर्ग असा दिसतो, याचा अंदाज येत राहील.

आणि स्पष्टवक्तेपणाबद्दल अभय दिले आहेस म्हणून, प्रचि २ मधला पाण्याच्या स्पेशल इफेक्ट आता इतका कॉमन झालाय, कि ते फोटो नैसर्गिक वाटत नाहीत. शक्य झाल्यास मूळ फोटो टाक, (हवा तर हा ही ठेव, म्हणजे दूध का दूध और.... होऊन जाइल !)

शक्य झाल्यास मूळ फोटो टाक>>>>दिनेशदा, हा मूळ फोटोच आहे Sad शटरस्पीड कमी ठेवून काढलाय. ट्रायपॉड विसरलो होतो म्हणुन दगडांचा आधार घेऊन काढलाय. Sad

१, १३ आणि गोंडोलाचे सगळेच कड्क....
अरे दिनेशदा म्हणतायत...की नेहमीच्या शटरस्पीडवर काढलेला हाच फोटो...तो मूळ फोटो...:)

मीरा, झब्बू मस्त Happy
भरपूर बर्फ होता कि तुम्ही गेला तेंव्हा Happy आम्हाला गंडोलाच्या सेकंड फेजला बर्फ मिळाला. Happy

वर थंडीत कुडकुडलेले बाप लेक

thandee.jpg

आम्हाला पहिल्याच लेव्हलला खुप बर्फ मिळाला. थोड स्नो फॉल पण मिळाला