राजा होणे राजाचीही नकल होती

Submitted by सुधाकर.. on 5 August, 2012 - 14:36

खरी कहाणी विदुषकाची विकल होती
राजा होणे राजाचीही नकल होती

फ़ितूर झाले माझेच प्यादे आज इथे,
तशी न कोणत्या फ़िरंग्यांची मजल होती.

खरे सांगतो पराभूत मी तिथे झालो.
जिथे माझ्य़ा छाव्यांची नजर अचल होती.

पाय ठेवला विश्वासाने मी जिथेही
तिथे मानवी किड्यांची ही दलदल होती.

लढत रहाण सतत रणांगणात जिवनाच्या
हिच माझ्या आयुष्याची खरी गझल होती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑर्फी ......ही पण नेहमीप्रमणेच आहे रे ....लयीत "बरी " खयालात "खरी"