पैठणी

Submitted by बागेश्री on 4 August, 2012 - 01:24

बहरलेल्या यौवनावर हिरवीकंच पैठणी रूबाबदार दिसावी,
तसं जगणं...

इच्छांना जरतारीचे असंख्य धुमारे, पदराला न पेलवतील असे
म्हणूनच पदर सांभाळत वेगाने वाटचाल करणं जिकीरीचं होत जाणारं!

जरीचे काठ, गोल फिरून पायापर्यंत उतरणारे, तसाच कर्तव्यांचा विळखा..
दिसताना लोभस पण तितकाच आवळणारा...

रंग खुलणारा, आमंत्रण देणारा- रस्त्यातले काटेही त्याच रंगात मिसळलेले,
म्हणूनच न जाणवणारे, खोल रूतून बसणारे, आपल्या आणि आमंत्रिताच्या!

त्या भुलवणार्‍या यौवनात, नक्की काय खुणावतंय
हे समजेपर्यंत होणारी सांज...
लोपलेले धुमारे,
पूर्ण- अपूर्ण कर्तव्य,
जीर्ण होत गेलेला रंग.....

पण जीवापाड जपलेल्या पैठणीला कुरवाळून छातीशी धरताना,
घामाचा नि अत्तराचा विरत आलेला गंध, त्याचा कैफ, काही औरच!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"त्या भुलवणार्‍या यौवनात, नक्की काय खुणावतंय ....
....... " हा शेवटचा खंड विशेष आवडला.

अर्थात सुरवातीच्या खंडांतील पार्श्वभूमीमुळेच यातले गहिरे रंग समजतात, हेही तितकंच खरं.

काही वेळा प्रतिमेचा आशयाशी थेट संबंध कवीने न जोडणे अधिक प्रभावी ठरू शकते.

जसे:

============================

बहरलेल्या यौवनावर हिरवीकंच पैठणी रूबाबदार दिसावी,

जरतारीचे असंख्य धुमारे, पदराला न पेलवतील असे
म्हणूनच पदर सांभाळत वेगाने वाटचाल करणं जिकीरीचं होत जाणारं!

जरीचे काठ, गोल फिरून पायापर्यंत उतरणारे...
दिसताना लोभस पण तितकाच आवळणारा...

रंग खुलणारा, आमंत्रण देणारा- रस्त्यातले काटेही त्याच रंगात मिसळलेले,
म्हणूनच न जाणवणारे, खोल रूतून बसणारे, आपल्या आणि आमंत्रिताच्या!

त्या भुलवणार्‍या यौवनात, नक्की काय खुणावतंय
हे समजेपर्यंत होणारी सांज...
लोपलेले धुमारे,
जीर्ण होत गेलेला रंग.....

पण जीवापाड जपलेल्या पैठणीला कुरवाळून छातीशी धरताना,
घामाचा नि अत्तराचा विरत आलेला गंध, त्याचा कैफ, काही औरच!

============================

असे केल्यास इच्छा, कर्तव्ये हे आशयाचे पिलर्स वाचकावर सोडले जातील आणि या कवितेतून जो तो आपापला अर्थ लावत बसेल. हे अधिक मस्त होईल. Happy

(तुमची या पिढीतील अरुणा ढेरे होऊ शकेल हा साईड इफेक्ट Proud )

आकृतीबंधाची वैविध्ये हाताळणे (आता माझ्यामते) आवश्यक आहे कारण एखादा काव्यसंग्रह काढल्यास 'सर्वत्र एक प्रतिमा व एक संवेदना' असे काँबिनेशन दिसणे (फक्त) सकृतदर्शनी (च) (का होईनात पण) मारक ठरू शकते.

शुभेच्छा

-'बेफिकीर'!

.

.

.

कविता कळाली नाही
पुन्हा प्रयत्न करतो.>>>>>>>>>>>>>

यार किरण तुला काय वाटलं बाकीच्यांना कळाली म्हणून त्यांनी चांगले प्रतिसाद दिले ?

अरे प्रतिसाद काय ;आपल्या आधी आलेले एक दोन प्रतिसाद पाहून दिले तरी चालतात अरे ...तुला म्हणून सांगतोय ...कुण्णाला सांगू नकोस !!( मला बागेश्रीच्या कविता वाचल्यावर काय लिहू ते सुचत नाही (चान्गल्या अर्थाने..!! ) मग मी ही तेच करतो अरे...........;))

'त्या भुलवणार्‍या यौवनात, नक्की काय खुणावतंय
हे समजेपर्यंत होणारी सांज...
लोपलेले धुमारे,
जीर्ण होत गेलेला रंग....''
अप्रतिम!!! Happy

छान उलगडलंस गं बागे....मस्तच

अवांतर - कळ्लं नाही म्हणून गप्पा मारायलाच हव्यात का ? विपु , मेल्स झालंच तर वाहते धागे आहेत नं? एक दोनच प्रतिक्रिया पण विषयाशी निगडीत असल्या तर इतरांचा पण वाचताना बेरंग होणार नाही ही स्वत्।चीच जबाबदारी समजून आपण सबुरीने घ्यावं न Happy

बागु, मस्त ! छान कल्पना आहे. खुप्प्प आवडली. Happy

वेक्स Happy बघ परत एकदा तेच. बघ उगाच नाही लोकांना तुझा-माझा संशय येत. Wink ( आता तर शुद्धलेखनही. आता तर खात्रीच होइल त्यांची. त्यामुळे तु आपली आयफोनवरुन टाइप करुन अशुद्धच रहा. Proud )

छान मंडलय सगळं..........

बेफींनी चांगल्या सूचना केल्यात. ते म्हणतात तसं प्रतिमा - आशय संबंध विषद न करता तश्याच वाचकाला आपापले अर्थ लावू द्यायला मुभा मिळेल.......

बाकी.... उत्तम जमलिये. शुभेच्छा...!!!

वेकाज्जी
नाहीच कळालं तर काय करावं माणसानं , आं , सांगा कि सांगा !

पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यावर असं वाटलं कि कुणाची तरी हिरवी पैठणी नायिकेला आवडली असावी. तिची पैठणीची इच्छा पूर्ण होत नाहीये असं दिसतंय. मग ती कुठलंतरी कापड रंगात बुकळून उन्हात वाळवत असावी पण संध्याकाळपर्यंत त्यावरचे रंग उडून गेले असं काहीतरी झालं असावं.

खरंच दुर्दैवी आहे Sad

नाही रे किरण .........

तू म्हणत आहेस तशीकाही (काहीच्या काही ) नाहीये ही कविता

बघ ..फक्त पहिल्या दोन ओळी त जे लिहिलंय तिथं जगणं आणि यौवन याची आदलाबदल करायचीय मग बघ त्या ओळी अशा दिसतील ...

बहरलेल्या जगण्यावर हिरवीकंच पैठणी रूबाबदार दिसावी,
तसं यौवन ...
(मग जीवन हे देह अन यौवन ही पैठणी बनते )

हां आता वाच पुढची कविता जशीच्या तशी ..........

मग पुढच्या दोन कडव्यात तिचे जरतारी काठ (कर्तव्याचा विळखा ) आहे
खुलणारे अन खुलता खुलता काट्याप्रमाणे सलणारे रंग आहेत काट्यांच्या भोवतीनं कावियात्रीने रस्ते योजले आहेत जे चालण्याचे खुले आमंत्रण देत आहेत

नंतर होणारी सांज (जीवनाची)..अन आठवातात ती पूर्ण- अपूर्ण कर्तव्य, मग उडत गेल्यागत वाटणारा जीर्ण होत गेलेला रंग.....(मनाचा)

मग समारोपातल्या दोन ओळी ...........
इथं पैठणी म्हणजे ते यौवन
घाम म्हणजे तारुण्यात केलेले कष्ट
अत्तराचा गंध म्हणजे जावानीतली ती धुंदी
अन त्यांचा कैफ .........इत्यादी इत्यादी
अशाप्रकारे एका मस्त कवितेचा शेवट होतो

हो ...पण सुरुवात मी म्हणालो तशी केले तरच ; की ........

बहरलेल्या जगण्यावर हिरवीकंच पैठणी रूबाबदार दिसावी,
तसं यौवन ...

असो मी की बागेश्रीला बदल कर'च' हे नाही सांगणार .तिने तो केला तर उत्तमच आहे म्हणा ;नाही केला तरी माझं काही म्हणणं नाहीये

वैवकु

चांगली आहे कविता. पैठणी हा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय आहे.
शांताबाई शेळक्यांची " पैठणी " नावाची अप्रतिम कविता आहे. इथे देण्याचा मोह टाळत आहे. इथे कौतुक तुमच्या पैठणीचे.

बागेश्री,
छान कविता.
बेफिंच्या सुचवणीशी सहमत आहे.
मलाही शांताबाईंची 'पैठणी' ही कविता आठवली.मला आधी वाटलं की शांताबाईंच्या 'पैठणी' या कवितेचं रसग्रहण असेल,पण ही पूर्ण वेगळी आहे. तुम्ही प्रतिमा फार छान वापरता, अजून लिहा.
मनापासून शुभेच्छा.

कवितेला अनुसरून प्रतिसाद देणार्‍यांची आभारी आहे.
वाचणार्‍यांचा रसभंग करू नये (अर्थात हा अत्यंत साधा संकेत आहे, पण तो नमुद करावा लागणं, हे दुर्भाग्य)

काय रसंग्रहणं आहेत>>>>>>:हहगलो:

कवितेला अनुसरून प्रतिसाद देणार्‍यांची आभारी आहे.>>>>
धन्स बागे............... आज प्रथमच माझे आभार मानल्याबद्दल !!:)

Pages