सुरण
आमसुले ३-४
गरम मसाला
धनेजिरे पुड
चाट मसाला /जलजीरा/जिरावण/पानीपुरी मसाला
मीठ चवीनुसार.
तिखट--आवडी प्रमाणे
तांदुळाची पिठी
थोडेसे तेल
सुरणाचे साल काढुन त्याच्या पात़ळ चौकोनी फोडी/चकत्या करा.
एका पातेल्यात अंदाजे चकत्या बुडतील इतके पाणी घेवुन ते गॅसवर गरम करायला ठेवा.
पाणी गरम झाले कि त्यात आमसुले टाका .नंतर सुरणाच्या फोडी टाका.पातेल्यावर झाकण ठेवुन गॅस कमी करुन ठेवा.
अधुन मधुन ढवळा.
अंदाजे ८ ते १०मिनिटात फोडी थोड्याशा शिजतील.
फोडी चाळणीवर टाकुन पाणी काढुन काढावे.
सर्व मसाले एकत्र करावे.
या आहेत शिजलेल्या फोडी व सर्व मसाले एकत्र करुन तयार झालेले मिश्रण.
सुरणाच्या फोडींवर मसाला भुरभुरवुन घ्यावा.
फ्राय पॅन /तवा तापवुन त्यावर चमचाभर तेल पसरुन घ्यावे.
तांदुळ पिठी वर सुरणाच्या फोडी दोन्ही बाजुनी घोळवुन घ्याव्या .पॅन मधे दोन्हीकडुन खरपुस परतुन घ्याव्या.
मस्त कुरकुरीत सुरणाच्या फोडी तयार आहेत.
जेवताना स्टार्टर किंवा साईड डिश साठी करता येतील .तसेच चहाबरोबर ही आस्वाद घेता येतो.
सुरणाच्या फोडी आमसुले घातलेल्या पाण्यात शिजवुन घेतल्याने खाजत नाहीत तसेच आमसुलाचा आंबटपणा फोडींना थोडासा येतो त्यामुळे चव छान येते.
वॉव. मस्तच. माझी आई नेहमी
वॉव. मस्तच. माझी आई नेहमी बनवते. मसाला थोडा वेगळा असतो. आमसुल तसेच.
हे तर सुरणाचे लॅम्थो. मी
हे तर सुरणाचे लॅम्थो. मी सुरणाबरोबरच अळकुड्यांचे ही असेच करते.
कृती इथे आहे - अळकुड्यांचे लॅम्थो
अमसूलाऐवजी चिन्चेचा कोळ
अमसूलाऐवजी चिन्चेचा कोळ वापरूनही खुप छान लागतात सुरणाचे काप्!मस्त रेसिपी!