हर देशीही तू, हर वेशीही तू

Submitted by नरेंद्र गोळे on 1 August, 2012 - 07:21

हर देशीही तू, हर वेशीही तू
रूपात हरेक, असशी परी तू
तुझी रंगभूमी, ही सृष्टी जरी
खेळांतही तू, मेळांतही तू

सागरी उठशी, मेघांतूनी तू
पर्जन्य होशी, जल होऊन तू
मग निर्झर, ओढा, नदी होशी
प्रकार अनेक, जलाशय तू

घडला मातीतुनी, अणुरेणू
रूप जीवसृष्टीचे, शाश्वत तू
पर्वत कधी, विशाल तरूही तू
कौतूक तुझे, सत्‌ एकची तू

दाविशी दिव्य, जरी हे तू
गुरूदेव दयाघन, प्रसन्न तू
तुकड्या सांगे, परका न कुणी
एकच सगळे जण, मी आणि तू

(राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांच्या एका मूळ हिंदी प्रार्थनेचा मराठी अनुवाद)

http://anuvad-ranjan.blogspot.in/ "अनुवाद रंजन" ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

http://madhuvan1205.wordpress.com/2011/02/03/har-desh-me-tu/ ह्या दुव्यावर ती ऐकताही येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या दोनचार ओळींची भाषिक ढब पाहूनच हा अनुवाद असणार असे ओळखले
शिवाय मागे एकदा माझ्या एका अनुवादित गझलेला मिळालेला तुमचा प्रतिसाद लक्षात होताच म्हणा

असो
बरा जमलाय
पुलेशु