अ‍ॅनिमेशन या क्षेत्राविषयी माहीती हवी आहे.......

Submitted by यशस्विनी on 1 August, 2012 - 00:05

मला अ‍ॅनीमेशन या क्षेत्राविषयी जाणुन घ्यायचे आहे..... या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी कोणत्या स्किलची आवश्यकता आहे, कोणत्या सॉफ्टवेअरचे ज्ञान असणे आवश्यक आहे..... या क्षेत्रात कामाचे विभाग कसे असतात त्यानुसार किती संधी मिळतात.... विविध अ‍ॅनिमेशन स्टुडियोज कोणत्या बेसवर तुम्हाला तिथे काम देतात..... या क्षेत्रात फ्रीलान्सिंगला किंवा स्वतःचा छोटया प्रमाणात उदयोग करण्यास कितपत वाव आहे....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हिनस (वर्षा)

मला राज ठाकरेंचा सल्ला आठवला. हल्ली अ‍ॅनिमेशनचे कोर्सेस करणारी पुष्कळ मराठी मुलं फसवणूक झाली म्हणून ओरडत असतात. अ‍ॅनिमेशन हे क्षेत्र ज्यांच्या हातात कला आहे त्यांच्यासाठी आहे. चित्रकला व्यवस्थित असेल तर अ‍ॅनिमेशन सॉफ्टवेअर हे टूल म्हणून वापरावे. नाहीतर त्याचा उपयोग काय करणार ?
कला क्षेत्रासाठी अचूक सल्ला आहे हा.

या व्यतिरिक्त इंजिनिअरिंग क्षेत्रात अ‍ॅनिमेशनचा खूप उपयोग होतो. सॉलिड मॉडेल बनवून घेण्यासाठी सॉलीडवर्क्स, प्रो-ई, कॅटीया, ३ डी मॅक्स आदी सॉफ्टवेअर्स आहेत. या मॉडेल्सला माया सारख्या सॉफ्टवेअरमधे इंपोर्ट करून अ‍ॅनिमेशन करता येतं.

धन्यवाद किरण, तुम्हाला अजुन डिटेल मध्ये माहिती आहे का या क्षेत्राबद्दल...... तुम्ही सांगत आहात ते देखील बरोबर आहे.... कारण हल्ली हा विषय शिकवण्याचे क्लासेस भरपुर निघाले आहेत ते चांगली चित्रकला हवीच असे सांगत नाहीत फक्त सॉफ्टवेअर शिकवण्यावर भर देतात. यामध्ये नवनिर्मितीक्षम मन हवे हे मान्य..... पण या क्षेत्रात खरोखर संधी उपलब्ध आहेत का? याबद्द्ल काही माहीती आहे का तुम्हाला?

Graphic Design आणि animation शिकवणाऱ्या संस्था गल्लो गल्ली क्लासेस उघडून बसलेल्या आहेत. शिवाय पैसाही "दबाके" घेतात
त्यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी बरीच चवकशी करून जा .
तिकडे शिकवणारा बरासचा स्टाफ हा.. तिथलेच भूतपूर्व विद्यार्थी असतात , ज्यांना बाहेर कुठे नोकरी मिळत नाही .क्लास मध्ये जे शिकवले जाते त्याचा आणि प्रोफेशनल animation चा काडीचाही संबंध नसतो

चांगल्या पगाराची नोकरी मिळेल असे आश्वासन दिले जाते , प्रत्यक्षात अशा कंपन्या म्हणजे एखाद्या सिंगल रूम मध्ये चालणारा DTP तैप कारभार असतो , ज्यात पगार ४००० ते ५००० दरम्यान दिला जातो. तोही वेळेवर मिळतो असे नाही.

नोकरी मिळवण्यासाठी स्वतःचा portfolio बनवन मोठ जिकरीच काम असत, तुमच्या डिग्रीला नाही तर कामाला पाहून लोक दाराशी उभ करतात

या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर भयानक क्रियेटीविटी , आपल ज्ञान वाढवण्यासाठी आंतरजालाचा भरपूर वापर, प्रोफेशनल लोकांची काम, त्यांचे पोर्ट फ़ोलिओ पहाण मग शिकण, अस करत करताच यशस्वी होता येईल..

व्हिनस खाली दिलेल्या दोन्ही लिनक्स animation उद्योगात काम करायचे असल्यास खूप उपयोगी पडतील,

बाकी मार्केट तसे इंडिया पेक्षा फार इस्ट दुबई आणि परदेशात जास्त अनुकूल आहेत, ह्याचा रथ indiat आज्जीबात नाही असाही नाहीये, तुमच्या स्किल वर ते अवलंबून असत, च्नागल्या college मधून पास आउट झालात, आणि अंगी पात्रता असेल तर नक्की यश मिळते

प्रचंड प्रचंड मेहेनतीचे क्षेत्र आहे हे, अक्षरह दिवस रात्र stuio मध्ये पडून राहणे यात पहिली काही वर्षे जातात, पण निर्मितीचा आनंद खूप मिळतो, drawing आणि creativity is key factor

http://www.idc.iitb.ac.in/resources/design-india.html
http://www.designinindia.net/everywhere/disciplines/animation/institutio...

वर्षा
मी काही तज्ञ नाही. पण माझ्या प्रॉडक्टससाठी मी बरेचदा सॉलीड मॉडेल आणि अ‍ॅनिमेशन बनवून घेतलेले आहे. ज्याचे काम चांगले त्याला बसायला वेळ नाही. पुण्यातल्या एकाकडे पुढच्या तीन वर्षासाठी इतकं काम आहे कि तो फोनही घेत नाही.

कला क्षेत्रामधे अर्थातच आधी कला असायला हवी हे वर आलेच आहे. पुण्यात, चेन्नईत आणि मुंबईत काही स्टुडीओ आहेत जिथे हॉलिवूडपटांचे अ‍ॅनिमेशनचे काम मिळते. प्रिझम थ्री डी वगैरे हाय एण्डचे सॉफ्टवेअर वापरून व्हीएक्सएफची कामेही मिळतात. माझ्या एका मित्राचा पुण्यात स्टुडीओ आहे. जुरासिक पार्क या सिनेमाचे काम ज्यांनी केले त्यांचंच सॉफ्टवेअर आणि मशीन वापरून त्याने आपलं काम सुरू केलं आहे. वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्सचे आणि ब-याचशा कंपन्यांचेही काम आहे त्याच्याकडे.

तुमच्याकडे व्हिजन आणि स्ट्रगल करण्याची क्षमता हे तर हवेच त्याचबरोबर इतर क्षेत्राप्रमाणे मार्केटिंग आणि सतत अपडेट राहणे हे हवेच. कोर्स केला कि जादू होईल असं काही नाही इथे.