श्यामलादण्डकम् !

Submitted by चैतन्य दीक्षित on 31 July, 2012 - 16:14

मध्यंतरी माझ्या एका मित्राकडे त्याची आत्या आणि आतेबहीण काही कामानिमित्त आल्या होत्या. त्या दोघीही शास्त्रीय गायन शिकतात आणि त्या संदर्भात श्री. विकास कशाळकर यांच्याकडे त्यांचे काही काम होते. या मित्राशी शास्त्रीय संगीताबद्दल बर्‍याचवेळा बोलणे होते त्यामुळे त्याने त्याच्या आत्याच्या रियाजाबद्दल बोलता बोलता माहिती दिली. रियाजाला सुरुवात करण्यापूर्वी त्या दोघीही 'कालिदासविरचित श्यामलादण्डकम्' नावाचं स्तोत्र म्हणतात असे त्याने सांगितले. मी हे नांव प्रथमच ऐकल्याने त्याबद्दल त्याला 'आत्याकडून अजून काही माहिती मिळते का ते बघ' असे मी सांगितले. त्यावर त्याने सांगितले की 'हे स्तोत्र नित्य म्हटले असता, ज्या कुठल्या कलाक्षेत्रात तुम्ही अभ्यास करता आहात, त्यात तुम्हाला सुयश प्राप्त होते असे म्हणतात. खूप नादमय आणि अनुप्रासयुक्त असं स्तोत्र आहे.'
एकतर नादमय आणि अनुप्रासयुक्त काव्य, त्यात ते कालिदासानं लिहिलेलं मग ते खासच असणार! असा विचार करून लगेच मी जालावर ते कुठे मिळतंय का ते पाहिलं.
प्रथम सापडला तो तेलगु गायक घंटसाला यांनी गायलेल्या गाण्याचा व्हीडिओ.
ह्या व्हीडिओत स्तोत्र पूर्ण गायलं नाहिये सुरुवातीचा थोडा भाग आणि एकदम शेवटचा भाग असं गायलंय.
(सुरुवातीचा सतारीवरचा भूपालीतला झाला सुंदर आहे) म्हणून पूर्ण स्तोत्र असलेला ऑडियो किंवा व्हीडिओ मिळतो का ते पाहिले तर हा एक ऑडियो-व्हीडिओ मिळाला. यात कर्नाटकी पद्धतीने स्तोत्र गायलंय (गायिकांचा उल्लेख नाहिये :() यातलं व्हायोलीन आणि बासरीही श्रवणीय आहे. तरीही, घंटसाला यांच्या गायनातून अनुप्रास आणि त्या वृत्तातले खटके जसे जाणवतात तसे ह्या गायनात जाणवत नाहीत. अर्थात, हे एक 'स्तोत्र' आहे म्हटल्यावर त्याचे 'गायन' होणारच. तरी एक बरं आहे की त्या दोन्ही भल्या गायिकांनी गाताना संस्कृताची वाट लावली नाहिये. नाहीतर 'आराध्यो भगवान्व्रजेशतनयस्तद्धामवृंदावनं' ह्या चैतन्य महाप्रभूंच्या सुंदर श्लोकाचं 'गायन' कितीही चांगलं झालेलं असलं तरी संस्कृताचा पार बोर्‍या वाजलाय त्यात.
असो, तर मग असा विचार आला की आपणच हे स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करावं. विचार बरेच दिवस चालू होता आज मुहूर्त मिळाला. स्तोत्र (वरच्या लिंक मधली पीडीएफ फाईल) पाहूनच 'छ्या! अशक्य आहे हे म्हणणं.' असाच विचार आला होता. पण हळूहळू सराव केला आणि बरंच बरं म्हणता येऊ लागलं.:)
आज ४-५ वेळा प्रयत्न करूनही मनाजोगं रेकॉर्ड झालं नाही, म्हणजे बर्‍याच चुका होत होत्या म्हणताना. पण शेवटी झालं ठीक-ठाक रेकॉर्ड (एक दोन चुका आहेतच त्यातही :() असो. रेकॉर्ड इथे ऐकता येईल.

हे स्तोत्र कालिदासाला देवी शारदा प्रसन्न झाली त्यावेळी स्फुरलं असं म्हणतात.
अर्थात, या स्तोत्राचा कर्ता आणि मेघदूतादींचा कर्ता कालिदास हे एकच की वेगळे यावर निश्चित माहिती मिळत नाही. स्तोत्रात वापरलेल्या उपमांमुळे (उदा. चारुशिञ्चत्कटीसूत्रनिर्भत्सितानङ्गलीलाधनु' - जिचे कटिसूत्र हे कामदेवाच्या धनुष्यापेक्षाही उजवे वाटते अशी... इ.) तो महाकवी कालिदासच असावा असे वाटण्यास जागा आहे. ते काहीही असो, स्तोत्र आहे खास ! हे श्यामलादेवीचं म्हणजेच कालीमातेचं(?) स्तोत्र आहे.
स्तोत्रात अनेकानेक विशेषणं आणि उपमा वापरून देवीचं वर्णन केलं आहे.
अजून सगळ्या स्तोत्राचा अर्थ उमगेल किंवा जेवढा उमगला आहे तो नीट शब्दबद्ध करता येईल इतकी माझी पात्रता नाही असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे खरं तर मी केवळ स्तोत्र म्हणता येतं म्हणून रेकॉर्ड केलंय इतकंच. हे ऐकून किंवा स्तोत्र वाचून कुणाला हे स्तोत्र म्हणून बघण्याची किंवा थोडं पुढे जाऊन 'नक्की काय अर्थ असेल?' ह्या विचाराने संस्कृत शिकण्याची इच्छा निर्माण झाली तर तो नक्कीच या स्तोत्राचा प्रभाव असेल.

-चैतन्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चैतन्य, माझ्या मुलाने अभ्यासक्रमात संस्कृत घेतलय. त्याल हे कदाचित लिलया झेपेल पण माझी वाचताना त्रेधा होऊ नये म्हणून उच्चारांच्या दृष्टीकोनातून मला संधीविग्रह हवा होता. कदाचित ते त्यालाही सोपे जाईल. तुम्ही तुमच्या सवडीने करा. मी फक्त माझे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करतोय. Happy
तुम्ही दिलेल्या वेळेसाठी आणि केलेल्या प्रयत्नांसाठी धन्यवाद !

>दाद,
तुमचा प्रतिसाद मिळाला की असं वाटतं की हा 'असंच अजून काम करत राहिलं पाहिजे' Happy
> कौतुक,
तुमच्या मुलाला संस्कृतच्या अभ्यासात अनेक शुभेच्छा. खूप चांगली बाब आहे.

>लंपन
>>>तुझे ऐकले पण आवाज काही केल्या मोठा ऐकू येत नाहिये.
पुन्हा एकदा रेकॉर्ड करून वरचा दुवा संपादित केलाय. तिथे एकदा ऐकून बघ आणि कळव आवाज नीट ऐकू येतोय का ते.

पूर्ण संधी-विग्रह खाली देतो आहे.

संधी-विग्रहात जिथे समस्त पद असूनही स्तोत्र म्हणण्याच्या दृष्टीने तोडून म्हणता येण्याजोगे आहे तिथे '-'
अशी खूण केली आहे. जिथे स्पेस आहे तिथे तो शब्द संपला असे लक्षात घ्यावे.
आधी स्तोत्र म्हणताना जिथे थांबता येईल अशा पद्धतीने ओळी लिहिल्या आहेत.
कंसात मला शक्य तसा संधी-विग्रह दिला आहे. काही शब्द मलाही नवीनच असल्याने, कदाचित योग्य
संधी-विग्रह न होण्याची शक्यता आहे. असे काही चुकीचे आढळले तर मला कळवा, माझाही अभ्यास होईल.
संस्कृत (किंवा खरे तर कुठलाही अभ्यासविषय) हे अथांग आहे, जितकं शिकू तितकं कमीच!

---------------------------------------
जय जननि सुधासमुद्रान्तरुद्यन्मणीद्वीप-संरूढबिल्वाटवीमध्यकल्पद्रुमाकल्प-कादम्बकान्तारवासप्रिये
कृत्तिवासप्रिये सर्वलोकप्रिये |

(सुधासमुद्रान्तः+उद्यत्+मणीद्वीपसंरूढबिल्व+अटवीमध्यकल्पद्रुम+आकल्पकादम्बकान्तारवासप्रिये)

सादरारब्धसङ्गीतसम्भावना-सम्भ्रमालोलनीपस्रगाबद्धचूलीसनाथत्रिके सानुमत्पुत्रिके
(स+आदर+आरब्धसङ्गीतसम्भावनासम्भ्रम+ आलोलनीपस्रग+आबद्धचूलीसनाथत्रिके)

शेखरीभूतशीतांशुरेखामयूखावलीबद्ध-सुस्निग्धनीलालकश्रेणिशृङ्गारिते लोकसम्भाविते
(शेखरीभूतशीतांशुरेखामयूख+आवलीबद्धसुस्निग्धनील+ अलकश्रेणिशृङ्गारिते)

कामलीलाधनुस्सन्निभभ्रूलता-पुष्पसन्दोहसन्देहकृल्लोचने वाक्सुधासेचने
(कामलीलाधनु: सन्निभभ्रूलतापुष्पसन्दोहसन्देहकृत् + लोचने)

चारुगोरोचनापङ्ककेलीललामाभिरामे सुरामे रमे
प्रोल्लसद्ध्वालिकामौक्तिकश्रेणिकाचन्द्रिकामण्डलोद्भासि-लावण्यगण्डस्थलन्यस्तकस्तूरिकापत्ररेखा-
समुद्भूतसौरभ्यसम्भ्रान्तभृङ्गाङ्गनागीत-सान्द्रीभवन्मन्द्रतन्त्रीस्वरे सुस्वरे भास्वरे
(प्र+उल्लसत्+ध्वालिकामौक्तिकश्रेणिकाचन्धिकामण्डल्+
उद्भासिलावण्यगण्डस्थलन्यस्तकस्तूरिकापत्ररेखासमुद्भूतसौरभ्यसम्भ्रान्तभृङ्गाङ्गनागीतसान्द्रीभवन् +
मन्द्रतन्त्रीस्वरे)

वल्लकीवादनप्रक्रियालोलतालीदलाबद्ध-ताटङ्कभूषाविशेषान्विते सिद्धसम्मानिते
(वल्लकीवादनप्रक्रियालोलतालीदल + आबद्धताटङ्कभूषाविशेष+अन्विते)

दिव्यहालामदोद्वेलहेलालसच्चक्षुरान्दोलनश्री-समाक्षिप्तकर्णैकनीलोत्पले श्यामले
पूरिताशेषलोकाभिवाञ्छाफले श्रीफले
(दिव्यहालामद+उद्वेलहेलालसत् + चक्षु; + आन्दोलनश्रीसमाक्षिप्तकर्ण+ एकनीलोत्पले श्यामले पूरित +
अशेषलोक+ अभिवाञ्छाफले श्रीफले)

स्वेदबिन्दूल्लसत्फाललावण्यनिष्यन्द-सन्दोहसन्देहकृन्नासिकामैक्तिके सर्वविश्वात्मिके सर्वसिद्ध्यात्मिके
कालिके मुग्धमन्दस्मितोदारवक्त्रस्फुरत्-पूगताम्बूलकर्पूरखण्डोत्करे ज्ञानमुद्राकरे सर्वसम्पत्करे पद्मभास्वत्करे
श्रीकरे
(स्वेदबिन्दु+उल्लसत्+फाललावण्यनिष्यन्दसन्दोहसन्देहकृत् + नासिकामौक्तिके सर्वविश्वात्मिके
सर्वसिद्ध्यात्मिके कालिके मुग्धमन्दस्मित+उदारवक्त्रस्फुरत्+पूगताम्बूलकर्पूरख्ण्ड+उत्करे )

कुन्दपुष्पद्युतिस्निग्धदन्तावलीनिर्मलालोलकल्लोलसम्मेलनस्मेरशोणाधरे चारुवीणाधरे पक्वबिम्बाधरे
(कुन्दपुष्पद्युतिस्निग्धदन्तावलीनिर्मल + आलोलकल्लोलसम्मेलनस्मेरशोणाधरे चारुवीणाधरे पक्वबिम्ब+
अधरे)
सुललित नवयौवनारम्भचन्द्रोदयोद्वेल-लावण्यदुग्धार्णवाविर्भवत्-कम्बुबिम्बोकभृत्कन्थरे सत्कलामन्दिरे मन्थरे
(सुललितनवयौवन+आरम्भचन्द्रोदय+उद्वेललावण्यदुग्ध+अर्णव+आविर्भवत्+कम्बुबिम्बोकभृत्+कन्थरे)

दिव्यरत्नप्रभाबन्धुरच्छन्न-हारादिभूषासमुद्योतमानानवद्याङ्गशोभे शुभे
(दिव्यरत्नप्रभाबन्धु: + अच्छन्नहारादिभूषासमुद्योतमाना+ अनवद्या+अङ्गशोभे)

रत्नकेयूररश्मिच्छटापल्लव-प्रोल्लसद्दोल्लताराजिते योगिभि: पूजिते
(रत्नकेयूररश्मिच्छटापल्लव+ प्रोल्लसत् + उल्लताराजिते)
विश्वदिङ्मण्डलव्याप्तमाणिक्यतेजस्फुरत्कङ्कणालङ्कृते विभ्रमालङ्कृते साधुभि: पूजिते
(विश्वदिक्+ मण्डलव्याप्तमाणिक्यतेजस्फुरत् + कङ़्कण+आलङ्कृते विभ्रम्+आलङ्कृते)
वासरारम्भवेलासमुज्जृम्भमाणारविन्द-प्रतिद्वन्द्विपाणिद्वये सन्ततोद्द्यद्दये अद्वये
(वासर+आरम्भवेलासमुज्जृम्भमाणा+ अरविन्दप्रतिद्वन्द्विपाणिद्वये सन्तत+उद्यत् +दये )
दिव्यरत्नोर्मिकादीधितिस्तोमसन्ध्यायमानाङ्गुलीपल्लवोद्यन्नखेन्दुप्रभामण्डले सन्नुतखण्डले चित्प्रभामण्डले
प्रोल्लसत्कुण्डले
(दिव्यरत्न + उर्मिकादीधिति: +स्तोमसन्ध्यायमाना+अङ्गुलीपल्लव+उद्यत् + नखेन्दुप्रभामण्डले )

तारकाराजिनीकाशहारावलिस्मेर-चारुस्तनाभोगभारानमन्मध्य-वल्लीवलिच्छेद वीची समुद्यत् -
समुल्लाससन्दर्शिताकारसौन्दर्यरत्नाकरे वल्लकीभृत्करे किङकरश्रीकरे
(तारकाराजिनीकाशहारावलि: स्मेरचारुस्तन+आभोगभार+आनमत् + मध्यवल्लीवलिच्छेद वीचीसमुद्यत् +
समुल्लाससन्दर्शित+ आकारसौन्दर्यरत्नाकरे )

हेमकुम्भोपमोत्तुङ्गवक्षोजभारावनम्रे त्रिलोकावनम्रे
लसद्वृत्तगम्भीरनाभीसरस्तीर-शैवालशङ्काकरश्यामरोमावलीभूषणे मञ्जुसम्भाषणे
(हेमकुम्भोपम+उत्तुङ्गवक्षोजभार+अवनम्रे त्रिलोक+अवनम्रे लसत् + वृत्तगम्भीरनाभीसर:
+तीरशैवालशङ्काकरश्यामरोमावलीभूषणे- खरे तर लसद्वृत्त-
पासून रोमावलीभूषणे पर्यंत पूर्ण सामासिक शब्द आहे त्यामुळे त्यात संधी-विग्रह देणं तितकंसं बरोबर नाहिये.)

चारुशिञ्चत्कटीसूत्रनिर्भत्सितानङ्गलीलाधनु-श्शिञ्चिनीडम्बरे दिव्यरत्नाम्बरे
(चारुशिञ्चत् + कटीसूत्रनिर्भत्सित+ अनङ्गलीलाधनु: + शिञ्चिनीडम्बरे)

पद्मरागोल्लसन्मेखलामौक्तिकश्रोणि-शोभाजितस्वर्णभूभृत्तले चन्द्रिकाशीतले
(पद्मराग+ उल्लसत् + मेखलामौक्तिकश्रोणिशोभाजितस्वर्णभूभृत् तले)
विकसितनवकिंशुकाताम्रदिव्यांशुकच्छन्न-चारूरुशोभापराभूतसिन्दूर-शोणायमानेन्द्रमातङ्गहस्मार्गले
वैभवानर्ग्गले श्यामले
(विकसितनवकिंशुक+ आताम्रदिव्य+अंशुकच्छन्नचारु+उरुशोभापराभूतसिन्दूरशोणायमान+
इन्द्रमातङ्गहस्मार्गले वैभव+ अनर्ग्गले)

कोमलस्निग्धनीलोत्पलोत्पादिता-नङ्गतूणीरशङ्काकरोदारजङ्घालते चारुलीलागते
(कोमलस्निग्धनील+ उत्पल+उत्पादित+अनङ्गतूणीरशङ्काकर+उदारजङ्घालते)

नम्रदिक्पालसीमन्तिनी-कुन्तलस्निग्धनीलप्रभापुञ्जसञ्जात-दुर्वाङ्कुराशङ्कसारङ्गसंयोग-रिंखन्नखेन्दूज्ज्वले
प्रोज्ज्वले
(नम्रदिक्पालसीमन्तिनीकुन्तलस्निग्धनीलप्रभापुञ्चसञ्जातदुर्वाङ्कुर+ आशङ्कसारङ्गसंयोगरिंखत्+
नख+इन्दु+उज्ज्वले प्रोज्ज्वले)
निर्मले प्रह्व देवेश लक्ष्मीश भूतेश तोयेश - वाणीश कीनाश दैत्येश यक्षेश-
वाय्वग्निकोटीरमाणिक्य संहृष्ट-बालातपोद्दामलाक्षारसारुण्य-तारुण्यलक्ष्मीगृहीताङ्घ्रिपद्मे सुपद्मे उमे
(वायु+अग्निकोटि:+ रमाणिक्य, संहृष्टबाल+आतप+उद्दामलाक्षारस+आरुण्य, गृहीत्+अङ्घ्रिपद्मे)

सुरुचिरनवरत्नपीठस्थिते सुस्थिते- रत्नपद्मासने रत्नसिंहासने शङ्खपद्मद्वयोपाश्रिते विश्रुते -
तत्र विघ्नेशदुर्गावटुक्षेत्रपालैर्युते - मत्तमातङ्गकन्यासमूहान्विते-
भैरवैरष्टभिर्वेष्टिते-मञ्चुलामेनकाद्यङ्गनामानिते-
देवि वामादिभि: शक्तिभि: सेविते-
धात्रि लक्ष्म्यादिशक्त्यष्टकै: संयुते- मातृकामण्डलैर्मण्डिते-
यक्षगन्धर्वसिद्धाङ्गनामण्डलैरर्चिते -
(विघ्नेशदुर्गावटुक्षेत्रपालै: + युते, मत्तमातङ्गकन्यासमूह+ अन्विते
भैरवै: + अष्टभि: + वेष्टिते, मञ्चुलामेनका+ आदि+ अङ्गनामानिते
लक्ष्मी+आदिशक्ति+अष्टकै:, मातृकामण्डलै: + मण्डिते, यक्षगन्धर्वसिद्ध+अङ्गनामण्डलै: +अर्चिते)

भैरवी संवृते पञ्चबाणात्मिके- पञ्चबाणेन रत्या च सम्भाविते -
प्रीतिभाजा वसन्तेन चानन्दिते- भक्तिभाजं परं श्रेयसे कल्पसे-
योगिनां मानसे द्योतसे- छन्दसामोजसा भ्राजसे-
गीतविद्याविनोदातितृष्णेन कृष्णेन सम्पूज्यसे -
भक्तिमच्चेतसा वेधसा स्तूयसे -
विश्वहृद्येन वाद्येन विद्याधरैर्गीयसे -
(च+ आनन्दिते, छन्दसाम्+ ओजसा, भक्तिमत्+चेतसा, विद्याधरै:+ गीयसे)
श्रवणहरदक्षिणक्वाणया वीणया किन्नरैर्गीयसे-
यक्षगन्धर्वसिद्धाङ्गनामण्डलैरर्च्यसे -
(किन्नरै: + गीयसे, यक्षगन्धर्वसिद्धाङ्गनामण्डलै+ अर्च्यसे)

सर्वसौभाग्यवाञ्छावतीभिर्वधूभि: सुराणां समाराध्यसे-
(सर्वसौभाग्यवाञ्छावतीभि: + वधूभि:)
सर्वविद्याविशेषात्मकं चाटुगाथा-समुच्चारणाकण्ठमूलोल्लसद्-
वर्णराजित्रयं कोमलश्यामलोदारपक्षद्वयं-तुण्डशोभातिदूरीभवत्किंशुकं-
तं शुकं लालयन्ती परिक्रीडसे -
(समुच्चारण+ आकण्ठमूल+उल्लसत्+वर्णराजित्रयं, तुण्डशोभा+ अतिदूरीभवत्+किंशुकं)

पाणिपद्मद्वयेनाक्षमालामपि स्फाटिकीं- ज्ञानसारात्मकं वर्णमालागुणं-
पुस्तकं चाङ्कुशं पाशमाबिभ्रति -
(पाणिपद्मद्वयेन+ अक्षमालाम् + अपि, च्+अङ्कुशं, पाशम् + आबिभ्रति)

तेन सन्चिन्त्यसे तस्य वक्त्रान्तरात्- गद्यपद्यात्मिका भारती निस्सरेत्-
येन वाध्वंसनादाकृतिर्भाव्यसे -
तस्य वश्या भवन्तिस्तियः पूरुषा: -
येन वा शातकंबद्युतिर्भाव्यसे -
सोऽपि लक्ष्मीसहस्रै: परिक्रीडते-
(वाध्वंसनाद+आकृति:+ भाव्यसे, वश्या: + भवन्तिस्तियः,
शातकंबद्युति:+ भाव्यसे, सः+ अपि=सोऽपि)

किन्न सिद्ध्येद्वपु: श्यामलं कोमलं- चन्द्रचूडान्वितं तावकं ध्यायतः -
तस्य लीला सरोवारिधी: तस्य केलीवनं नन्दनं-
तस्य भद्रासनं भूतलं तस्य गीर्देवता किङ्करी-
तस्य चाज्ञाकरी श्री स्वयं -
(किं+न=किन्न, सिद्ध्येत्+वपु:=सिद्ध्येद्वपु:)

सर्वतीर्थात्मिके सर्वमन्त्रात्मिके-
सर्वयन्त्रात्मिके सर्वतन्त्रात्मिके-
सर्वचक्रात्मिके सर्वशक्त्यात्मिके-
सर्वपीठात्मिके सर्ववेदात्मिके-
सर्वविद्यात्मिके सर्वयोगात्मिके-
सर्ववर्णात्मिके सर्वगीतात्मिके-
सर्वनादात्मिके सर्वशब्दात्मिके-
सर्वविश्वात्मिके सर्ववर्गात्मिके-
सर्वसर्वात्मिके सर्वगे सर्वरूपे जगन्मातृके-
पाहि मां पाहि मां पाहि मां
देवि तुभ्यं नमो देवि तुभ्यं नमो देवि तुभ्यं नमो देवि तुभ्यं नमः

|| इति श्यामलादण्डकं सम्पूर्णम् ||

चैतन्य,

परत एकदा त्रिवार दंडवत! आमच्यासाठी एव्हढी मेहनत घेता तुम्ही.

रच्याकने : लिम्बुटिम्बु नाही दिसले कुठे या बाफवर...?

आ.न.,
-गा.पै.

Pages