बास्केटबॉल

Submitted by हिम्सकूल on 30 July, 2012 - 11:43

- १६ दिवस, २८८ खेळाडू, २ सुवर्ण पदके

- प्रचंड वेगवान खेळ

- प्रतिस्पर्धी संघाच्या जाळीत चेंडू टाकून गुण मिळतात.

- जास्ती गुण मिळवणारा संघ विजेता ठरतो.

- २४ सेकंदाच्या आत गुण मिळवायचा प्रयत्न करावा लागतो, अन्यथा चेंडू प्रतिस्पर्धी संघास दिला जातो.

- चुका झाल्यावर मिळणाऱ्या फेकीवर १ गुण मिळतो. ह्या फेकी फ्री-थ्रो लाईन वरून करतात.

- प्रत्येक सामना ४० मिनिटांचा असतो. आणि त्यात १० मिनिटांचे ४ भाग असतात. प्रत्येक संघ सामन्यामध्ये १ - १ मिनिटांचे टाईम आउट घेऊ शकतात आणि तेव्हा घड्याळ थांबवले जाते.

- चेंडू पास करत आणि ड्रीबल करत पुढे न्यायचा असतो.
- ड्रीबलिंग म्हणजे टप्पे देत देत चेंडू पुढे न्यायचा. खेळाडू दोन पेक्षा जास्त ढंगा चेंडूचा टप्पा दिल्या शिवाय पुढे जाऊ शकत नाही.
- खेळाडू चेंडू एकमेकांकडे फेकू शकतात.

- एकूण दोन स्पर्धा आहेत. पुरुष सांघिक व महिला सांघिक

- दोन्ही स्पर्धात १२ संघ आहेत.
- ६-६ संघाचे २ गट आहेत.
- प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर एक सामना खेलानात आहे.
- जिंकणार्‍या संघास २ गुण तर पराभूत संघास १ गुण मिळणार आहे.
- जर सामना बरोबरीत झाला तर ५ मिनिटांचे जास्तीचे भाग खेळवले जाणार आहेत. त्यात जो संघ जास्त गुण मिळवेल तो जिंकणार.

- गटातील ४ सर्वोत्तम संघ पुढच्या फेरीत दाखल होतील.

- उपांत्यपूर्व फेरीचे ४ सामने
- उपांत्य फेरीचे २ सामने
- अंतिम फेरीतील विजेता संघ सुवर्ण पदकचा तर उपविजेता संघ रौप्य पदकाचा मानकरी
- उपांत्य फेरीतील पराभूत संघ एकमेकांविरुद्ध खेळून त्यातील विजेता कांस्य पदकाचा मानकरी.

- १९३६ साली पहिल्यांदा ऑलिम्पिक्स मध्ये बास्केटबॉलचा समावेश केला गेला. त्या सामन्याचे मैदान मातीचे होते आणि पावसामुळे ते चिखलाचे झाले.

- १९०४ मध्ये प्रदर्शनीय सामने खेळवले गेले पण त्यात फक्त काही अमेरिकेतील क्लब संघानी भाग घेतला होता.

मूळ माहिती - http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/51...

Group content visibility: 
Public - accessible to all site users