ओली आठवण

Submitted by shilpa mahajan on 29 July, 2012 - 13:27

ओली आठवण

तुझी पाठवणी केली त्याला
पुष्कळ काळ उलटून गेला
भरून आलेला पापणीचा मेघ
पाउस पडून निरभ्र झाला.

दिल्या घरी सुखी आहेस
डोळा बघते, कानी ऐकतेय
अधून मधून भेटीचा योग
काळीज भरून सुखावून जातोय.

एखाद्या चुकार सायंकाळी
तरी पण का असे होते?
परतणारी पाखरे पाहून
अंधाराने मन भरून जाते.

हसून केलेल्या पाठवणीची आठवण
जाणीवेला खोलवर दुखावून जाते
पोटाशी धरून रडण्याच्या सुखाला
मुकल्याची हुरहूर लावून जाते.

मिटल्या डोळ्यांच्या खोट्या अंधारात
हरवलेला 'तो' क्षण परतून येतो,
स्मृतिकोशात तुला कवटाळताना
घळघळ मला रडवून जातो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावनांच्या अभिव्यक्तीत रुक्षपण, व कमतरता जाणवते. त्यामुळे शेवटचे घळघळ रडणे परिणामकारक वाटत नाही.

छान

प्रद्युम्नजी, योगुली,किरणजी,और्फिजस जी धन्यवाद !

छान.

आशय चांगला आहे, पण लय, वृत्त अणि शब्दयोजना याकडे अधिक लक्ष दिल्यास कविता प्रभावी होऊ शकेल
असे माझे वैम. कृगैन.

प्रद्युम्नजीन्शी ८५-९० % .............किरणशी १००% सहमत

उल्हासकाकान्चा प्रतिसाद नेहमीच पर्फेक्ट असतो