Submitted by shilpa mahajan on 29 July, 2012 - 13:27
ओली आठवण
तुझी पाठवणी केली त्याला
पुष्कळ काळ उलटून गेला
भरून आलेला पापणीचा मेघ
पाउस पडून निरभ्र झाला.
दिल्या घरी सुखी आहेस
डोळा बघते, कानी ऐकतेय
अधून मधून भेटीचा योग
काळीज भरून सुखावून जातोय.
एखाद्या चुकार सायंकाळी
तरी पण का असे होते?
परतणारी पाखरे पाहून
अंधाराने मन भरून जाते.
हसून केलेल्या पाठवणीची आठवण
जाणीवेला खोलवर दुखावून जाते
पोटाशी धरून रडण्याच्या सुखाला
मुकल्याची हुरहूर लावून जाते.
मिटल्या डोळ्यांच्या खोट्या अंधारात
हरवलेला 'तो' क्षण परतून येतो,
स्मृतिकोशात तुला कवटाळताना
घळघळ मला रडवून जातो.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भावनांच्या अभिव्यक्तीत
भावनांच्या अभिव्यक्तीत रुक्षपण, व कमतरता जाणवते. त्यामुळे शेवटचे घळघळ रडणे परिणामकारक वाटत नाही.
छान आहे. आणखी प्रयत्न केल्यास
छान आहे. आणखी प्रयत्न केल्यास लयीत येईल.
छान
छान
छान....
छान....
प्रद्युम्नजी,
प्रद्युम्नजी, योगुली,किरणजी,और्फिजस जी धन्यवाद !
मी तुमच्या सूचनांचा नक्की
मी तुमच्या सूचनांचा नक्की विचार करीन.
छान.
छान.
छान आहे.
छान आहे.
आशय चांगला आहे, पण लय, वृत्त
आशय चांगला आहे, पण लय, वृत्त अणि शब्दयोजना याकडे अधिक लक्ष दिल्यास कविता प्रभावी होऊ शकेल
असे माझे वैम. कृगैन.
sagalya oli vachlya sarkhya
sagalya oli vachlya sarkhya vaatatat
प्रद्युम्नजीन्शी ८५-९० %
प्रद्युम्नजीन्शी ८५-९० % .............किरणशी १००% सहमत
उल्हासकाकान्चा प्रतिसाद नेहमीच पर्फेक्ट असतो