मायबोली वर्षाविहार २०१२ - सचित्र वृत्तांत आरोहीच्या नजरेतून..

Submitted by हिम्सकूल on 25 July, 2012 - 04:42

बाबांनी मला आदल्या रात्री सांगितलं की आपल्याला उद्या टीपला जायचं आहे.. आता लवकर झोप... पण मी तेव्हाच त्यांच्या मागे लागले. मला टीपला जायचयं... निहिला ताईपण येणाले का? ती कशी येणाले? आणि झोपलेच नाही लवकल... आणि मग सकाळी उशिला उठले.. मग पटापटा आवललं आणि बाबांबरोबर टीपला निघाले..
आम्हीच सगल्यात शेवटी गेलो.. बस मध्ये निहिलाताई, श्यामली मावशी, मोनिका आत्या, देविका ताई, आशुमावशी होत्या.. मी त्यांच्या बलोबल बसले. आणि बाबा पुढेच उभे होते.. आणि आमची बस निघाली.. पण मला बाबा कोठे दिसलेच नाहीत,, म्हणून मग मी खूप जोलात भोकाड पसल्लं.. आणि माझा आवाज ऐकून बाबा पटकन आले.. थोड्यावेळानी बस थांबली. बाबा परत खालती उतलले आणि काहीतली काम केलं... आणि फोटो पण काढले.

आम्ही ह्या बशीतून आलो.

हे आम्हाला आतच बसवून बाहेल फोटो काढणार होते पण मला बाबांकडे जायचच होतं म्हणून मी पण खाली आले..

सगले काका मावश्या बस मध्ये फालच गोंधल कलत होते..

हे मायबोलीचे अजय काका.. मी नंतल ह्यांच्या बलोबल केक पण कापला..

सगळी बाळं खेळतायेत..

मी बाळाबलोबल

हे सगले काय बोलत होते त्यांनाच माहिती..

हा मत्त मत्त केक..

नंतल मी खूप वेळ पाण्यातच खेळत होते.. बाबा खूप रागवत होते.. पण मी बाहेलच नाही आले..

हे सगळे काका तिकडे बॉल खेळत होते..

तिकडेच बाबांना हा बगळा पण दिसला.

ह्या सगळ्या मावश्या अजय काकांशी काय बले बोलत असतील??

मग मी एकदम मत्त जेवण केलं आणि झोपले... आणि कोणीतली मोठ्ठा आवाज केला तेव्हा जागी झाले...
तेव्हा हे सगले काका आणि मावश्या दंगा कलत होते..

तिथे आलेल्या सगळ्यांचा फोटो काढला मग..

नंतल काही काका हे काहीतली कलत होते.. (सं. वस्त्रहरण फोटो स्वरुपात)

मग सगळ्यांनी अजयकाकांना एक दिवा दिला..

नंतल आम्ही मस्त चहा आणि भजी खाल्ली...

हे बाबांबलोबल जे काका आणि मावशी काम कलत होते ते...

आणि आम्ही गाडीत बसून पलत घली आलो..

आल्यापासून मी बाबांना विचालते आहे.. बाबा टीपला पलत कधी जायचय..

विषय: 

शाब्बास आरोही... Happy अगदी बाबांच्या पावलावर पाऊल ठेवले आहेस... अभिनंदन!

'सचित्र वृत्तांत'... आरोही कडुन

हिम्स...
आरोहीचं कौतूक करतोय... पण खरा सलाम तुझ्या 'वेगळ्या दृष्टीला'...
खूप छान, सुंदर, मस्त...
Happy

मस्तय Happy

नील.. Happy

पण ओम जबरी पोज देतो फोटो काढताना... माझ्याकडे आहे त्याचा एक फोटो.. सगळ्या फोटोंची लिंक पाठवीन त्यात आहे..

फक्त पुढच्या वविला मला तुझा एक तरी फोटो काढू दे गं....>> नील.. आपला फोटो सगळ्यांना दाखवायला बाबाची परवानगी आहे की नाही हे तिला रविवारी माहित नसल्याने ती तुला काढू देत नसावी.. Happy आता पुढच्या वेळी देईल बघ..

Pages