प्रबळ ट्रबल

Submitted by मुरारी on 24 July, 2012 - 07:30

शुक्रवार ची संध्याकाळ फोनाफोन करण्यातच गेली . एका वेळी अनुक्रमे वल्ली, मोदक , आणि किसन शी बोलत होतो, मधेच गणेशा फोन करत होता.
कलावंतीण ट्रेक ठरलेला होता.. पण पावसाळ्यात तो खूपच रिस्की आहे , तेंव्हा तो जमल्यास स्किप करा असे बर्याच जणांनी सांगितले . तेंव्हा हो नाय म्हणता म्हणता ४ पर्याय
डोळ्यासमोर उरले . माहुली, शिवनेरी , लोहगड-विसापूर , आणि प्रबळगड .
शेवटी प्रबळगडावर शिक्का मोर्तब झाले , आणि सर्वांना फोनवून सांगितले. शनिवारी भल्या पहाटे बाईक काढली , सौरभ आलेलाच होता .. मी सौरभ हर्शल आणि सिद्धू असे चौघ निघालो.. किसन पनवेलला भेटणार होता .. गणेशाने आयत्यावेळी टूल्ली दिली . शिळफाटा- पनवेल रोड धड धाकट केल्याने सुसाट पनवेलात घुसलो . मग छोटीशी चहा पार्टी झाली .. आणि निघालो. वातावरण मस्तच होतं .. पाऊस नव्हता .. पण ढग दाटून आले होते . शेडुंग फाट्याहून आत घुसलो .. दोन्ही बाजूने मस्त भात शेती सुरु झाली .. १० मिनिटात ठाकूर वाडी त पोचलो .. खाली एक कृष्णाचं सुंदर देऊळ आहे . रस्ता विचारात पुढे आलो आणि प्रबळ ने दर्शन दिल ..

१.

प्रचंड लांबीचा असा अवाढव्य डोंगर .. बाजूलाच कलावंतीण सुळका !!

२.

पायथ्याशी एका वडाखाली बायका लावल्या आणि हुंदडत वर निघालो ..

३.

४.

अर्धा एक तास चालल्यावर एका वळणावर न्याहारी उरकली .. बाजूनेच एक कातकरी चाललेला त्याला विचारल प्रबळ गड किती वेळ ? म्हणाला ३ तास .. आमची हवा टाईट.. आम्ही खूपच आरामात होतो ... मग वेग पकडला आणि झपाझप वर आलो

५.

मारुतीराया आणि गणपती

६.

इथे जरा श्रम परिहार केला Happy

७.

.. साधारण एक तासात "प्रबळ माची " गाठली ..

८.

चायला समोर पाहिल्यावर हैराण झालो .. जेवढ वर चढून आलेलो त्याच्या इतकाच अजून कडा चढायचा होता. रस्ता माहित नाही ..
एका बाजूला कलावंतीण आणि त्या बाजूला प्रबळ
९.

असंच विचारात विचारात शेताडीतून निघालो. पण एक तास झाला तरी प्रबळ जवळ यायची चिन्ह नाहीत .. आम्ही बरोबर समांतर चालतोय .. तेवढ्यात एक माणूस दिसला त्याला विचारलं. तर म्हणाला रस्ता चुकलात .. परत मागे माचीत जा... आयला . .सगळे हबकलेच . एवढ १ तास चुकीच चाललो म्हणजे .. आता मागे जाण्यात परत तेवढाच वेळ .. काय करायचं ? त्याला विचारलं असाच पुढे रस्ता नाही का? तर म्हणाला नाही.. तसा एक आहे खिंडीतून .. पण त्याबाबतीत तो आग्रही दिसला नाही .. तरी आम्ही मागे ण फिरता पुढे रस्ता दिसतोय का ते पाहायला निघालो .. परत १५ मिनिट चाललो .. शेवटी प्रबळ गडाच दुसर टोक दिसायला लागल .. पण आम्ही अजूनही समांतर .. भिडायचं कस Wink तिथे दोन तीन शाकारलेली घर होती .. तिथे जरा एक ब्रेक घेतला .. थोडी खादाडी केली .. काय करायचं ? आता मागे जायलाच हव होतं. घड्याळाचा काटा १०.३० दाखवत होता. शेवटी सर्वांचा निर्णय झाला .. आज काहीही झालं तरी प्रबळ सर करायचाच .. मग काय " हर हर महादेव"!!! झपाझप उद्या मारत मागे सुटलो .. प्रबळ माची पहिलं टार्गेट ठेवलं. येताना अर्ध्या तासात मागे आलो .. तिथल्या एका शेतकऱ्याला रस्ता विचारला .. तर नशीब तो यायला तयार झाला .. त्याने एक वाट दाखवली .. पण हि वाट आहे? असा प्रश्न जवळ जवळ सर्वांना पडला.. भयंकर जंगल .. सर्व बाजूने किर्र रान आणि भयानक चढ .. मधेच एक धबधबा होता.. त्यात पाणी नव्हत .. त्याच्यातून वाट काढत वर जायचं होत ... आता मात्र सिद्धूने धीर सोडला .. त्याच्या बिचार्याचा पहिलाच ट्रेक होता .. आणि हे अस प्रचंड काहीतरी समोर होतं. कसे बसे मान खाली घालून चढायला लागलो .. किती वेळ चढतोय काही कळत नव्हत.. किस्नू आणि अल्पेश पुढे होते सौरभ मध्ये .. मी आणि हर्शल सिद्धुला हात देत वर घेत . हळू हळू येत होतो .. अजून एक चेक पोइंत आला.. इथे बसायला थोडी जागा होती .. आता बाजूला उंच कडा ..

१०.

११.

१२.

१३.

आणि समोरून येणार प्रचंड धुकं.. पाहता पाहता आम्ही त्या धुक्यात हरवून गेलो... अवर्णनीय अनुभव होता.. पाऊस नसल्याने आलेला थकवा त्या गार धुक्याने घालवून टाकला .. परत चढाइला सुरुवात केली . सिद्धूची हलत अतिशय वाईट झालेली होती.. आता तो परत मागे फिरतो का काय अस वाटत होत . पण नाही पट्ट्या चढला वरती .. कधीतरी १२.३० च्या सुमारास वर आलो ...
आखिर कार.... WE HAVE DONE IT . प्रबळ सर झाला "याच साठी केला होता अट्टाहास " अशा भावना होत्या ...वर तर अक्षरश: नंदनवन फुललं होतं ... लुसलुशीत गवताची मलमली चादर अक्ख्या कड्यावर पसरली होती... प्राचीन वाटणारं जंगल .. त्यातूनच उफाळलेला गूढ धुक्याचा लोट ... मग तब्येतीत बसलो .. जेवणाची वेळ झालेली होती .. मेनू फर्मास होता . पुलाव, पोळी भाजी , थालीपीठ , सोन पापडी, किसान फेम "शंकर पाळे" ..

१४.

१५.

१६.

तडस लागेपर्यंत बकाबका जेवलो .. मस्त झर्याचं पाणी प्यायलो . आणि गड भटकायला निघालो ..

धुंद रान

१७.

१८.

१९.

२०.

आमच्याशिवाय वर बाकी कोणीही नव्हतं .. नुसत रान माजलेलं होतं .. वाट फुटेल तसं चालत होतो .. आणि एका क्षणाला त्या रानातून बाहेर मोकळ्यावर आलो ......
समोरच दृश्य भान हरपून टाकणार होतं.. समोर प्रचंड पसरलेली दरी .. आणि बाजूलाच दिसणारा कलावंतीण.. धुक्यामुळे अगदी क्षण दोन क्षण दर्शन होत होतं .. पण .. शब्दात सांगता येणार नाही असा आनंद झाला होता..

२१.

२२.

त्या पठारावरच आडवे झालो .. तेवढ्यात एक काका आले.. एकटेच आले होते .. गावातल्या एका छोट्या गाईड ला घेऊन . त्यांच्याबरोबर गप्पा टप्पा सुरु झाल्या . तेही ठाण्याचेच होते . १०० व्या वर गड फिरले होते .. आणि मजा म्हणजे ते नेहमी एकटेच फिरायला जातात .. Happy त्यांनी आम्हाला गडावरील अजून एक दोन ठिकाण दाखवली . एक म्हणजे गणरायाचं प्राचीन मंदिर आणि दुसर म्हणजे गोड्या पाण्याचं कुंड.

२३.

२४.

हे सगळ बघून झाल्यावर खाली उतरायला लागलो .. बाप्परे .. आता धमाल येत होती .. पायांनी साथ सोडून दिलेली होती.. कसे तरी रेटत खाली उतरत होतो .. माची गाठल्यावर परत चहा वेग्रे प्यायलो .. आणि काकांचा निरोप घेतला . हा अवलिया आज मुक्काम करणार होता आणि उद्या कलावंतीण करणार होता . पाऊस नसल्याने भिजणं झालेलं नव्हत. मग येताना दिसलेल्या एका ओढ्यात डुंबून घेतलं. परत उतारावरून कसबस सावरत खाली येणं.. पण एकमेकांची हलत बघून हसायला धमाल येत होती . येताना कृष्णाच्या देवळात जाऊन आलो . सुरेख देऊळ बांधलंय.

२५.

बाहेर आल्यावर सुसाट डोंबिवलीला सुटलो .
एकूण प्रबळ ने आमची चांगलीच परीक्षा घेतली , पण सर्वजण चांगल्या मार्कांनी पास झालो Happy

*प्रकाश चित्र श्रेय : सौरभ उपासनी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रसन्न ... मस्त फोटु. अन छान वर्णन Happy

आम्ही कलावंतीन केला होता पावसाळ्यात ... प्रबळ राहिलाय अजुन ...

छान फोटो आणि वर्णन.
. मी पण ९ वर्षांपुर्वी प्रबळगडावर गेलो होतो. इथे लेख पण लिहिला होता. आम्हाला वर जायची वाट सापडलीच नव्हती. येताना मात्र तिथल्या मुलांच्या सोबतीने आणि त्यांच्याच वाटेने उतरलो होतो.

खिक्क.....! Wink

स्व-प्रसन्न....अता इथेही...........! Wink

यो..
मागच्या पावसाळ्यात केलेला प्रबळ आठवला
तुमच्या सारखीच अवस्था झाली होती.. रस्ता चुकलो होतो..
फोटो आणि वर्णन झकासच

मस्त फोटो. चार वर्षांपूर्वी मी माचीपर्यंत गेले होते, ते ही नोव्हे.डिसें.दरम्यान... त्यावेळी सगळीकडे रुक्ष, रखरखाट व्हायला सुरूवात झालेली होती. ऐन पावसाळ्यातले हे फोटो फारच मस्त वाटतायत पहायला Happy

खूपच प्रबळ इच्छेचे असल्याने हा ट्रेक घडला तुमचा........
सर्व प्र चि व वर्णनही मस्तच.....
(तुझे 'योगीराणा' व 'बॅचलर खिचडी' कायम स्मरणात अस्ते रे....)

प्रसन्न... सुंदर वर्णन... मस्त ट्रेक.
प्रबळमाची असलेल्या घरांच्या मागुनच खिंडीत जायला वाट आहे. तुम्ही वाडीत विचारले नाही का? वर खिंडीत गेल्यावर मग डावीकडे कलावंतीणला वाट जाते नी उजविकडची प्रबळला.

कलावंतीण झालाय आमचा आता एकच लक्ष... प्रबळगड

सुरक्षीत ट्रेक करा आणि जमल्यास फुल पॅण्ट घालुन जा सर्वांनी.. > +१

मस्त फोटो आणि वर्णन. मला तिथे वर गणपतीच्या देवळातच जाउन राहावं वाट्तं आहे. धुक्यातल्या झाडाचा फोटो फारच छान.

प्रसन्न... सुंदर वर्णन... मस्त ट्रेक.फारच सुन्दर फोटो

प्रबळमाची असलेल्या घरांच्या मागुनच खिंडीत जायला वाट आहे. वर खिंडीत गेल्यावर मग डावीकडे कलावंतीणला वाट जाते नी उजविकडची प्रबळला

वृत्तांत आवडला.

अर्थात किल्ल्याच्या इतिहासाची थोडी माहिती यायला हवी होती.

प्रबळगडाच्या हिरव्यागार फोटोंमध्ये खादाडीच्या फोटोंनी रसभंग होतो आहे हे निश्चित.