नागपंचमी

Submitted by विनार्च on 24 July, 2012 - 05:16

लेकीने कालंच काढल होतं पण मीच आळस केला इथे टाकण्याचा. बघुन काढलेल चित्र आहे पण फार कमी वेळात पुर्ण केलय तिने १ ते १-३० तासात. (शाळेत जायच्या घाईतच तिला काय काय करायच असत आणि माझी डिफीकल्टी लेवल वाढवुन ठेवते नेहमी :डोक्याला हात लावुन बसलेली बाहुली:)
लेकीचं वय : ८ वर्ष ४ महिने.
माध्यम : क्रेयोन्स

2012-07-026.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वॉव.. लहान आहे तुझी पोरगी पण चित्र एकदम झकास काढलंय.. आर्टिस्ट ने हातबीत छान प्रपोर्शनेट काढलेत्,शिवाय चेहर्‍यावरचा भक्तीभाव सुद्धा.. ऑसम!!! Happy

सुंदर काढलंय चित्र.....
कानातील झुबे, काळेभोर केस आणि नागोबाचं शेडिंग फारच आवडलं.
माझ्यातर्फे शाब्बासकी द्या लेकीला Happy

आठ वर्षे म्हनजे इयत्ता दुसरी..

( आम्हाला दुसरीत असताना काय येत होतं?? पाटीवर पेन्शिलने दोन त्रिकोण दाखवून त्यात मधून सूर्य उगवताना दाखवणे. सूर्याला नाक डोळे तोंड काढणे )

आठ वर्षे म्हनजे इयत्ता दुसरी.. >>>>> नाही हो चौथीला आहे ती. (वयाप्रमाणे तिसरीत असायला हवी होती पण शाळेच्या कृपेने ४ला आहे).
तिची चित्रकला मायबोली वर पहायला मिळणार्‍या उत्तमोत्तम चित्रांमुळे तसेच तिच्या चित्रांना मिळणार्‍या माबोकरांच्या कौतुकामुळे बहरते आहे त्याबद्द्ल माबोकरांचे खूप खूप धन्यवाद!