गरम मसाला आमटी

Submitted by Mandar Katre on 20 July, 2012 - 08:55

मसूरडाळ ,बटाट्याच्या लहान/मोठ्या फोडी,थोड्याश्या वांग्याच्या फोडी आणि टोमेटो च्या फोडी एकत्र शिजवून घेणे .प्रमाण - साधारण एका व्यक्तीसाठी ४० ग्राम डाळ .

गरम मसाला पावडर दुकानात चांगली मिळत असेल तर घेणे ,शक्यतो मजीठीया चिकन मसाला मिळाल्यास उत्तम .अन्यथा गरम मसाला अख्खा मिळतो ,तो घेणे .तो भाजून मिक्सर वर बारीक करून घेणे . कांदा व सुके खोबरे भाजून मिक्सर वर लावणे , त्यात थोडी लसूण ही घालणे .नंतर सर्व मसाला आणि कांदा,खोबरे लसूण एकत्र करून घेणे .

फोडणी साठी लसूण ठेचून घेणे ,फोडणीत लसूण,हळद,तिखट आणि मोहरी,तीळ घालून चांगली फोडणी करून मग शिजलेली डाळ त्यात ओतावी .योग्य प्रमाणात पाणी घालावे.वाटलेला सर्व मसाला घालावा .चवी-प्रमाणे मीठ ,ओले खोबरे आणि कोथिंबीर घालून चांगली उकळावी .

पावा बरोबर किंवा भाता बरोबर अतिशय छान लागते !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users