ओठ बरेचदा बदलतो
पण तंबाखू सुटत नाही
डावीकडचा फाटलाय
हे,उजवीकडच्याला पटत नाही
तोंडही जुन्या चाळीसारखं
तंबाखू म्हणजे बिह्राडकरु
ओठांसारख्या मोकळ्या खोल्या
ईकडे भरु का तिकडे भरु?
भाडेकरुंचं प्रेमही अजीब..
रहायला चालते कुठचीही खोली
एकीकडचा उडाला चुना..
की लगेच दुसरीकडे रहायची बोली
दारुवाल्यांना म्हणतात तळिराम
त्यांचा सगळा साजच मोठा..
आंम्हालाही म्हणावं मळिराम
आमचा तर फक्त कार्यक्रमच छोटा
आंम्हा दोघांची एकच गल्ली
त्यांना झाकुन आंम्हाला काढा
त्यांचा आहे एक्सप्रेस हायवे
आंम्ही पितो लोणावळ्यात सोडा
रस्ता वेगवेगळा असला तरी
वाट आमची एक आहे
त्यांचा अंड्याचा.....तर
आमचा साधा केक आहे
तरी आंम्हाला सगळे म्हणतात
अहो घाण असतं ते...सोडा..
च्यायला...यांना काय माहित
हे गाढव आहे..की..घोडा?
व्यसन ही एक व्रुत्ती आहे
तीला बांध घालता येत नाही
ते म्हाताय्रा सारखं आहे हो,
काठीशिवाय चालता येत नाही
हा वेढा सुटत नाही..पण,
लवकरच मी फोडणार आहे
खरचं सांगतो...उद्या पासून...
मी तंबाखू सोडणार आहे.
छान पण टायपो संभळा.
छान पण टायपो संभळा.
काही सोडायची गरज नाही.. एक
काही सोडायची गरज नाही.. एक दिवस तोच तुंम्हाला सोडेल

पण तंबाखु-दर्दी लोकांची परिस्थिती छान मांडलीत
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/28834
एक दिवस तोच तुंम्हाला सोडेल
एक दिवस तोच तुंम्हाला सोडेल >>> धन्यवाद.....! शुभेच्छा अवडल्या.

गोवे-करांना आमच्या भावना कळ्ल्या म्हणायच्या
बेस्ट कविता जबरदस्त फॉरम्याट
बेस्ट कविता
जबरदस्त फॉरम्याट (चारोळी)
खूप खूप आवडली
____/\____ आत्मा इन अॅक्शन
____/\____
आत्मा इन अॅक्शन
सोडा सोडा.. तंबाखूबरोबर
सोडा सोडा.. तंबाखूबरोबर नावीन्यपूर्ण कल्पना आहे !! मी पण एकदा गुटखा सोडला होता. म्हणजे सोडावाच लागला. डॉक्टरांनी एक जबरदस्त गालगुच्चा घेऊन सोडून दिलं. मग दिसला गुटखा कि दुकान बंद असं काही दिवस केलं बगा
- किरणचंद्र गवार
( अवांतर : कविता ब्येष्ट हाये, ही इष्टाईल लैच आवडली बगा. दहा म्हैनं २४ * ७ ना सी फडके वाचल्यावं येकदम अण्णाभाऊ साठेंच फकिरा वाचल्यावानी वाटलं )
सोडा सोडा.. >>>
सोडा सोडा.. >>>
सर्वांचे
सर्वांचे धन्योsssवाद..............!