Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 7 September, 2011 - 03:51
कुणाला कर्करोगाने करी बेजार तंबाखू
कुणाला वाटतो ''नायाब आविष्कार'' तंबाखू
श्रमीकांच्या खिशाला सोसवेना थेर व्हिस्कीचे
जिवाला भागल्या थकल्या ठरे आधार तंबाखू
''चुना लावायचा नाही कुणाला '' ,हे मना ठावे
सदा अपुले चुन्याने हात माखवणार तंबाखू
चिरुटे,धुम्रकांड्या किंमती,सोंगे अमीरांची
खिशामध्ये गरीबांच्याच आढळणार तंबाखू
कशाला लाजतो ''कैलास'',तू मागावयासाठी
जरी परका तरी नक्की तुला देणार तंबाखू.
--डॉ.कैलास गायकवाड
गुलमोहर:
शेअर करा
जरी परका तरी नक्की तुला देणार
जरी परका तरी नक्की तुला देणार तंबाखू.>>>
तंबाखू दिल्याने परके आपले होतात.
गझलेची रदीफ नवीनच! (गझल / कविता इत्यादी येथे नको)
(कृगैन)
-'बेफिकीर'!
झक्कास, माझ्या कल्पनेबाहेरची
झक्कास, माझ्या कल्पनेबाहेरची रदीफः)
''चुना लावायचा नाही कुणाला '' ,हे मना ठावे
सदा अपुले चुन्याने हात माखवणार तंबाखू>>> मुहावरे का लाजवाब प्रयोग, परंतू शेर थोडा कमजोर वाटला, क्षमस्व!
मतला मस्तच, मक्ता फार आवडला, शेर क्रमांक २ व ४ समान आशयाचे वाटले.
चू. भू. द्या घ्या
(No subject)
आवडली.
आवडली.
अलगच रदीफ..छान निभावलात.
अलगच रदीफ..छान निभावलात.
श्रमीकांच्या खिशाला सोसवेना
श्रमीकांच्या खिशाला सोसवेना थेर व्हिस्कीचे
जिवाला भागल्या थकल्या ठरे आधार तंबाखू
.
कशाला लाजतो ''कैलास'',तू मागावयासाठी
जरी परका तरी नक्की तुला देणार तंबाखू.
हे दोन विशेष आवडलेत.
.........................................
स्वतः महागडी दारू पिणारेही तंबाखूचे व्यसन वाईटच असते, अशी कायमच मल्लीनाथी करत असतात.
सिगारेटचे चेन स्मोकर असणारे डॉक्टरही पेशंटना तंबाखू किती वाईट असतो, याचे धडे देतांना खूपदा पाहिले आहे.
पण इतके वास्तववादी बाजू उलगडणारे डॉक्टर मी आजच पाहतो आहे. हॅटस ऑफ.
ज्याच्या खिशात गायछाप चुना
ज्याच्या खिशात गायछाप चुना पुडी, तोच खरा मर्द गडी
अप्रतीम गझल... आम्हा गरीबांचा
अप्रतीम गझल...
आम्हा गरीबांचा जिव्हाळ्याचा विषय...
कुणाला कर्करोगाने करी बेजार
कुणाला कर्करोगाने करी बेजार तंबाखू
कुणाला वाटतो ''नायाब आविष्कार'' तंबाखू
लाजवाब... आपल्यात एकंदरीतचजी नवनिर्मीतीची एक सहज उर्मी आहे ..ती पाहून अवाक होतो.
अनवट अशी रचना.. रोजच्या पाहीलेल्या त्याच गोष्टींवर इतके नावीन्यपूर्ण लिखाण कसे काय सूचते तुम्हाला ... तुमच्या ह्या ''नायाब आविष्काराला सलाम.. गझल झक्कासच आहे डॉक्टर साहेब.. आवडली जाम आवडली..
आग्री गझल काय ..तंबाखू काय .. बोहोत हटके बोहोत अच्छे...
गुरु डॉक..... बहोत
गुरु डॉक..... बहोत अच्छे...!!!
(No subject)
कशाला लाजतो ''कैलास'',तू
कशाला लाजतो ''कैलास'',तू मागावयासाठी
जरी परका तरी नक्की तुला देणार तंबाखू
य म क्. नाहि JULALE TARI ...VISHAYAALA DHARUN GAZALECHA PRAYANTA...SUNSER
वाह वाह डॉक!! वेगळाच रदीफ
वाह वाह डॉक!! वेगळाच रदीफ आहे.. आयुष्यात सुचला नसता मला.
मस्तच.
डॉक, मस्त आणी जरा हटके
डॉक,
मस्त आणी जरा हटके गजल.
गजल वाचून मलाही तम्बाखू खाविशी वाटतेय. खालील ओळी वाचून लक्षात येईलकी मोठ्यानी पण तम्बाखूच्या वापरासाठी परवानगी दिली आहे.
"कृष्ण म्हणे अर्जुना
लावा तम्बाखुला चुना" हा: हा: हा:
वेगळी रदीफ...निभावणे
वेगळी रदीफ...निभावणे अवघड...त्यात वृत्तही सहज नाही ...हे सगळं बखुबी सांभाळणं खूपच सुरेख जमलंय..
अभिनंदन!!!!
गझलकाराने कितीही ठरवलं तरी व्यक्त होण्यासाठी गझलच जवळची वाटते, याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.
आशय आवडला पण शेर, शेर म्हणून नाही आवडले..
जाऊद्या मंग काढा तम्बाकू..:)
भन्नाट.
भन्नाट.
.
.
छान!
छान!:)
आवडली
आवडली
छान
छान
अतॄप्त आत्माच्या तम्बाखू या
अतॄप्त आत्माच्या तम्बाखू या कवितेत ही लिन्क मिळाली............... सर्वप्रथम त्यान्चे आभार
__________________
झक्कास, माझ्या कल्पनेबाहेरची रदीफ>>>>>>>>>>>>>>.
गझलकाराने कितीही ठरवलं तरी व्यक्त होण्यासाठी गझलच जवळची वाटते, याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.>>>>>>>>>>>>>>>>>>
कणखरजी व शामजी यान्च्याशी १००% सहमत!!