रांगोळ्या व दिवाळी फराळ

Submitted by यशस्विनी on 19 July, 2012 - 01:21

नमस्कार मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,

आज "व्हिनस" तुमच्याजवळ सादर करत आहे, मी काढलेल्या रांगोळ्या व स्वत:च्या हाताने एकटीने केलेला दिवाळी फराळ..........आता श्रावण सुरू झाला आहे .... त्यामुळे हा प्रकाशचित्रांचा धागा समयोचित वाटत नाही, पण कधीपासुन हे फोटो मायबोलीवर टाकीन टाकीन असे करत होते, पण वेळेअभावी शक्य झाले नाही, आज मस्त वेळ मिळाला आहे त्यामुळे तुमच्याबरोबर शेअर करते, चला तर मग करु सुरुवात..............

१.

R1.jpg

२. खालील सर्व फराळ मी एकटीनेच केला आहे बर का, तो देखील चक्क दोन दिवसात, आहे की नाही गम्मत.......फक्त त्या दोन दिवसात जेवण मात्र बाहेरुन मागवले Proud लग्नाच्या दुसरया वर्षी केलेला दिवाळी फराळ आहे हा.... दुबईला असताना....स्वत:चे पाककौशल्य दाखवायचे दिवस होते ते Happy
तसे अजुनही आहेत पण नविन लग्न झालेले असताना ही सर्व कलाकौशल्य आपल्याकडे आहेत हे नवरयाला व इतर नातेवाइक, शेजारी-पाजारी, मित्रमैत्रीणींना दाखवायला वेगळेच समाधान मिळते, बरोबर की नाही Happy

R2.jpg

३.

R3.jpg

४. हा फोटो माझ्या लग्नानंतर आलेल्या पहिल्या दिवाळीतील आहे, त्यावेळी दुबईला होते मी, माझ्या लाडक्या श्रीकृष्णाला दिवाळीच्या पहाटे दाखवलेला फराळ आहे तो...... हा देखील फराळ मी एकटीने दोन दिवसात केला पाकपुस्तक वाचुन...... त्यावेळी खुप सारे प्रकार एकाच वेळी करुन बघायला आवडायचे..... चकली करायला साचा नव्हता तर हातानेच वळुन केल्या Happy

R4.jpg

५.

R5.jpg

६. हा वरील फोटो क्रमांक ४ मधील फराळाचा मोठा फोटो

R6.jpg

७.

R7.jpg

८.

R8.jpg

९.

R9.jpg

१०.

R10.jpg

११.

R11.jpg

१२.

R12.jpg

१३.

R13.jpg

१४.

R15.jpg

गुलमोहर: 

मस्त गं वर्षा.......... Happy

तसे अजुनही आहेत पण नविन लग्न झालेले असताना ही सर्व कलाकौशल्य आपल्याकडे आहेत हे नवरयाला व इतर नातेवाइक, शेजारी-पाजारी, मित्रमैत्रीणींना दाखवायला वेगळेच समाधान मिळते, >>>>>>>>>> +१ मी ही ११ वर्षात पहील्या दोन वर्षीच केले पण मि. लुंकडच्याच मदतीने.......... Proud

छानच!
हा देखील फराळ मी एकटीने दोन दिवसात केला पाकपुस्तक वाचुन...... त्यावेळी खुप सारे प्रकार एकाच वेळी करुन बघायला आवडायचे..... चकली करायला साचा नव्हता तर हातानेच वळुन केल्या >>>तुझा उत्साह आवडला.

खुप मेहनत घेतलेली दिसत आहे फराळ करताना, ताटांमधील मांडणी सुरेख केली आहे, छान ...... रांगोळ्या देखील सुंदर व आटोपशीर काढल्या आहेत Happy

Mastach!

धन्यवाद shrushti14@gmail.com, अनुरागजी,दिनेशदा,सोनाली,शुम्पी,रीया,चिन्नु,लाजो,राममाधव्,नारायणी,वत्सला,इंद्रधनुष्य Happy

@sonalisl

त्यावेळचा माझा उत्साह एकदम जबरदस्तच होता..... एकतर पहिल्यांदाच दिवाळी फराळ करुन बघणार होते व परदेशी असल्यामुळे राजा-राणीचेच राज्य होते त्यामुळे जरी कोणता पदार्थ बिघडला असता तरी हसणारे कोणी नव्हते Happy पण एक आहे त्यामुळेच आत्मविश्वास आला, आता माझ्या साबा व आई मला विचारतात की हा पदार्थ कसा केलास ग Happy

@ शूम्पी

ती श्रीकृष्णाची मुर्ती खरच खुप सुंदर आहे..... त्या मुर्तीला वेगवेगळ्या वेषभुषेत सजवायला मला खुप आवडते Happy

सुंदरच.. आरास,फराळ,... खूप छान!!
तुझा उत्साह पाहून खूप कौतुक वाटलं Happy
'हाताने चकल्या वळल्या'.. बाप्रे..केव्हढा वेळ लागला असेल.. __/\__

सुरेख रांगोळ्या अन पदार्थांमधे ईतकी व्हरायटी, ....... अशी पत्नी प्रत्येकाला मिळू दे Happy

Pages