भिती वाटते चेह-याची

Submitted by pradyumnasantu on 16 July, 2012 - 18:47

माझी कविता वाचलीत
आभार तुमचे मानतो
काय हवे तुम्हांकडून
विनम्रतेने सांगतो:
*
दो लब्ज प्यारके
दो लब्ज यारके
*
दोन शब्द टोचणारे
द्व्यर्थाने बोचणारे
*
तिरके आणि झोंबणारे
भावनिक ओथंबणारे
*
कडकडून डसणारे
वर्मावर बसणारे
*
भांडणे उकरणारे
लाथेने ठोकरणारे
*
स्वत:कडे नसतील तर
बाजारात मिळणारे
*
विकत नाही मिळाले तर
रेन्ट ऑर लीज
पण माझ्या मित्रांनो
स्मायली नकोत प्लीज !!!!