Submitted by pradyumnasantu on 16 July, 2012 - 18:47
माझी कविता वाचलीत
आभार तुमचे मानतो
काय हवे तुम्हांकडून
विनम्रतेने सांगतो:
*
दो लब्ज प्यारके
दो लब्ज यारके
*
दोन शब्द टोचणारे
द्व्यर्थाने बोचणारे
*
तिरके आणि झोंबणारे
भावनिक ओथंबणारे
*
कडकडून डसणारे
वर्मावर बसणारे
*
भांडणे उकरणारे
लाथेने ठोकरणारे
*
स्वत:कडे नसतील तर
बाजारात मिळणारे
*
विकत नाही मिळाले तर
रेन्ट ऑर लीज
पण माझ्या मित्रांनो
स्मायली नकोत प्लीज !!!!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्तच! स्मायली नकोत प्लीज
मस्तच!
स्मायली नकोत प्लीज !!!!>>>>>फिदीफिदी तर नकोच नको.
हसून तुम्ही बघा एकदा बदलून
हसून तुम्ही बघा एकदा बदलून जाते सृष्टी
हसू जीवनी घेवूनी येते चैतन्याची वृष्टी
चेहरा नाही आवडला तर नुसता नको
चेहरा नाही आवडला तर नुसता नको मुका
दात न लावता सांगा 'परत येऊ नका'