कवितांची Curry

Submitted by pradyumnasantu on 15 July, 2012 - 14:31

आला आला पावसाळा
आल्या कवितांच्या सरी
रसिकांनो चिंब व्हावे
घ्याव्या भरून घागरी
*
नाचे ग्रीष्माच्या उन्हात
माझ्या शब्दांची मयूरी
उष्मा कितीही भासला
माझे काव्य थंड करी
*
कन्या निघाली सासरी
कवीराज त्वरा करी
शब्दभांडार संपले
थांबा खोलतो तिजोरी
*
प्रियकर खूप झाले
प्रिया कमी पडतात?
भिऊ मुळीच नका हो
बाण असंख्य भात्यात
*
मित्रा सांग काय वाटे
खावेसे रे तुला तरी
देतो शब्दांचे पराठे
आणि कवितांची करी
*
घसा कोरडा पडला
कशी तहान भागेल?
कविता? त्या इतरांसाठी
मला बिअर लागेल
***

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

घसा कोरडा पडला
कशी तहान भागेल?
कविता? त्या इतरांसाठी
मला बिअर लागेल>>>>>

कविता करीसाठी केली
चारोळ्यांची तोडणी
बिअरसोबत चाखण्यासाठी
घाला कोंबडिला फोडणी.

Proud

प्रथम माझ्या "आषाढी" ह्या कवितेवरच्या खूप छान प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

तुमची ही कविता मला पु.ल.च्या कवितेची आठवण देऊन गेली. आषाढ महिन्यात नवकवींच्या
कवितांचा पाऊस पडतो अशा प्रकारची कविता होती ती. मला आता आठवत नाही. पण
तुमच्या सगळ्या कवितांसारखी ही पण छान. विभाग्रजची चारोळीही मस्त.

प्रॅद्युनम्श, मस्त आहे कविता! तुम्ही अश्या कवितांचा पाउस कधी थंबवणार>>>>
झंपी: शुद्ध मराठीतली आपली प्रतिक्रिया छान आहे. आपल्यासारख्या रसिकांमुळे पाऊस थांबला आहे पण आपल्याला कवींची हजामत करण्यासाठी थोडे पाणी लागेलच, म्हणून रिपरिप चालू आहे. एरवी बिनपाण्याची करावी लागेल आणि ते न जमल्यास धोकटी आवरून ठेवावी लागेल ना?
प्रतिसादाबद्दल आभार.

विभाग्रज, बेफिकीर, वैभवराव,मुक्तेश्वर, सुरेखाजी, लोला, झंपी, आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.

रैनाजी: प्रतिक्रियेबद्दल आभार. काहीच्या काहीमधील माझी कविता व विभाग्रजांचा तीवरील प्रतिसाद जरूर वाचा.

कविता करीसाठी केली
चारोळ्यांची तोडणी
बिअरसोबत चाखण्यासाठी
घाला कोंबडिला फोडणी.>>>>>मांसाहार टाळा.चाखण्यासाठी चणे,वेफर्,काकडी,कांदा,मुळा ईत्यादी वापरा.