वोह जब याद आयें

Submitted by भारती.. on 13 July, 2012 - 06:21

वोह जब याद आयें बहुत याद आयें..

आठवते तेव्हा खूप खूप आठवते ती..
दु:खाच्या घनगर्द तमी जळते-विझते प्रीतज्योती

चाहुलीने त्या रस्ते हसले अंतर्यामी
काहूर उरातील जरा शांतवत उठलो मी
घेरते जिवाला कितीदा भासांची सृष्टी
..ती येते दूरून अधोवदन झुकवून दृष्टी
आठवते तेव्हा खूप खूप आठवते ती..

जळत्या हृदयावर अश्रूंची वाहे धारा
लोकांची कुजबुज क्षोभ मनाचा तो सारा
उमटते स्मित पण भिजलेल्या गालांवरती
- स्वप्नात येऊनी मंदमधुरसे हसते ती
आठवते तेव्हा खूप खूप आठवते ती..

ती गेली सरले जगणे उरलेले श्वसणे
ज्योतीने निरंतर प्रकाशाविना हे जळणे
किती रमवावे मन हरवून गेली पण शांती
छेडले सूर अन गीतांच्या अधुर्‍या पंक्ती
आठवते तेव्हा खूप खूप आठवते ती..

भारती बिर्जे डिग्गीकर
------------------------------------------------------------
वो जब याद आये, बहोत याद आये
गम-ए-जिन्दगी के, अँधेरे में हमने
चिराग-ए-मोहब्बत जलाए, बुझाए

आहटे जाग उठी, रास्ते हँस दिए
थामकर दिल उठे, हम किसी के लिए
कई बार ऐसा भी धोखा हुआ हैं
चले आ रहे है, वो नज़रे झुकाए

दिल सुलगने लगा, अश्क बहाने लगे
जाने क्या क्या हमे, लोग कहने लगे
मगर रोते रोते हँसी आ गयी हैं
ख्यालों में आ के वो जब मुस्कुराये

वो जुदा क्या हुए, जिन्दगी खो गयी
शम्मा जलती रही, रोशनी खो गयी
बहूत कोशिशें की, मगर दिल ना बहला
कई साज छेड़े, कई गीत गाए
गीतकार असद भोपाली
(शशांकजी,धन्स,मूळ कविता आता येथे पेस्टली आहे)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वो जब याद आये, बहोत याद आये
गम-ए-जिन्दगी के, अँधेरे में हम हैं
चिराग-ए-मोहब्बत जलाए, बुझाए

आहटे जाग उठी, रास्ते हँस दिए
थामकर दिल उठे, हम किसी के लिए
कई बार ऐसा भी धोखा हुआ हैं
चले आ रहे है, वो नज़रे झुकाए

दिल सुलगने लगा, अश्क बहाने लगे
जाने क्या क्या हमे, लोग कहने लगे
मगर रोते रोते हँसी आ गयी हैं
ख्यालों में आ के वो जब मुस्कुराये

वो जुदा क्या हुए, जिन्दगी खो गयी
शम्मा जलती रही, रोशनी खो गयी
बहूत कोशिशें की, मगर दिल ना बहला
कई साज छेड़े, कई गीत गाए

'पारसमणी' चित्रपटातील हेच गाणे ना ? मूळ गाण्याचे शब्द वाचकांना नीट कळावे म्हणून देत आहे. कृ गै न

भारतीताई नेहमीप्रमाणेच छान आहे हे ही ................

हे माझे अत्यंत आवडते गाणे आहे भाषांतर वाचताना मात्र भाषांतरीत शब्दांमुळे मूळ शब्द जरा विसरायला झाले होते शशांकने मूळ गीत दिले खूप बरे केले !!
शशांक खूप खूप आभार रे ...........

धन्स वैभव अंजली ..खूप व्याकूळ करणारी ही सुरावट..काही गाणी अक्षरश; भावविश्व व्यापतात..शशांकजींनी मूळ शब्द देऊन पूर्ण केले काम.

मोहम्मद रफींनी गायलेल्या 'पारसमणी' सिनेमातील या श्रवणीय गीताचा सुंदर भावानुवाद ! वा भारती !!

आभार जादुगर,बिनधास्त,सखी..माझं खूप आवडतं गाणं हे, अगदी स्फटिकीकृत विरहभावनाच आहे त्यात..

छान गीतानुवाद. भारती ताई. तुमच्यामुळे एक सुंदर गाणे कळले. आता नक्की ऐकेन मूळ गीत ही.

मागे मी इथे एका हिंदी सिनेमातील गीताचा अनुवाद टाकला होता. तेव्हा बेफ़िकीर ह्यांनी गीतानुवाद हा शब्द सुचविला होता. मनोगत ह्या मराठी संकेतस्थळावर बरेच जण असे भावानुवाद लिहितात.

माझ्या आठवणीनुसार वैवकु ह्यांनी ही "होशवालो को खबर क्या..." ह्या गझलेचा सुंदर भावानुवाद गझलेच्याच स्वरुपात इथेच माबोवर केला आहे.

माबोवर गुलमोहर विभागात "गीतानुवाद" हा ऑप्शन अ‍ॅड करायला हवाय, नाही का?

खूप छान कल्पना निंबुडा,जोरदार अनुमोदन. खूप मजा येईल..take it up .
पण 'इथे' मध्ये काही सापडलं नाही मला, पण अन्यत्र मिळालं Wink
वैभवचा बराचसा समवृत्तीय सुंदर अनुवाद

http://www.maayboli.com/node/31795

अन तुझा मुक्त प्रयत्न. हाही छानच.
http://www.maayboli.com/node/22318

पण 'इथे' मध्ये काही सापडलं नाही मला, पण अन्यत्र मिळालं
>>>
लिंक देताना गोंधळ घातला होता मी. आता प्रतिसाद एडिटलाय!