दवबिंदू..!

Submitted by बागेश्री on 12 July, 2012 - 08:18

मी व्यर्थसा दवबिंदू
पानावर गोठलेला,
धरणीला जो नकोसा
आकाशाने त्यागलेला..!

तुज रुपवान भासे,
मज भासे, मी अभागी
उदास घुसमटतो,
थिजतो, बसल्या जागी...!

क्षणभंगूर सारे काही
जाणतो आपण सारे,
देखणे दिसणे फक्त
हे जगणे आहे का रे..?

पानावर ओल्या ओल्या
मी खिन्नसा बसलेला
टिपेल का मज कोणी,
आशेवर बेतलेला..

मज नाते ना रुचते
ना जमते बिलगाया,
थिजणे संपून जावे
वाटे जन्म नवा घ्यावा!
जिथे स्वैर मी असावे
अलगद मी रुजावे,
अन् माझ्या रुजण्याने
जन्म नवे उमलावे..

ही इच्छा अधू आहे
ही आसही कोरी कोरी,
मज ठाव आहे सारे
जन्म, ना कोणी उद्धारी!

घे जगून संपतो आहे
मी मिथ्या जगलो आहे,
इच्छा लपेटून सार्‍या
जागीच विरतो आहे!

माझ्या रूपाने जिंकले
तुज पुरते मोहवले,
पण जाण जगा, तू ही
मी जगलो थिजलेले!!

मी जगलो थिजलेले...

गुलमोहर: 

छान!!

आशय, प्रवाह. .. मस्तच

कवितेला लय हवी होती किंवा मला सापडली नाही...

पु.ले.शु!!! Happy

छान कविता .... आवडली.
"मज नाते ना रुचते......... जन्म नवे उमलावे.." >>> हे अधिक आवडलं.
(यापुढची कडवीही चांगली आहेतच, तरी)
एकदा वाटलं, याच ओळीशी कविता संपली असती तर ....
तर ..... अपूर्णतेचा एक वेगळा फील आला असता,
चुटपुट लागली असती.

बागेश्री............ अतिशय सुंदर रचना........
<<ही इच्छा अधू आहे
ही आसही कोरी कोरी,
मज ठाव आहे सारे
जन्म, ना कोणी उद्धारी!

घे जगून संपतो आहे
मी मिथ्या जगलो आहे,
इच्छा लपेटून सार्‍या
जागीच विरतो आहे! >>

अहाहाहाहा......... अप्रतिम अगदी.... Happy

प्रतिसाद देणार्‍या सार्‍यांची आभारी आहे.
उकाका, पटतंय... तसाही शेवट छान वाटला असता नक्कीच Happy

भुंग्या,
व्यक्त झालेली ईच्छा ही एका, जागीच थिजलेल्या दवबिंदूची आहे आणि म्हणूनच ती पंगू, अधू आहे असंच म्हणायचंय, अधूरी नाही.

खूप छान आहे काविता

अष्टाक्षरी असेल तर लय , यमके , एखाद्या शब्दातली अक्षरसंख्या, एखाद्या ओळीतली शब्दमांडणी यावर अजून खोलवर विचार व्हायला हवाय.........

-जसे घुसमटतो हा शब्द ५ अक्षरी आहे त्याच्या आधी उदास हा ३अक्षरी शब्द आहे इथे लयीत वाचताना मजा येत नाही यास्तव 'घुसमटतो उदास'........... अशी शब्दमांडणी करावीत
-अधू म्हणताना त्या ओळीत एक अक्षर कमी पडते त्या ऐवजी 'पांगळी' असे करावेत
- क्षणभंगूर सारे काही,,,, ; घे जगून संपतो आहे......; आणि .....तुज पुरते मोहवले,.....इथे एक-एक अक्षर जास्त आहे
- पहिल्या कडव्यात त्यागलेला ऐवजी टाकलेला असे यमक गोठलेला या यमकाशी अधिक मिळते जुळते ठरते. तसाच बदल 'बिलगाया -घ्यावा' याबाबत अपेक्षित

असो हा प्रतिसाद शांतपणे लक्षपूर्वक वाचलत याबद्दल आभारी आहे

आपला निस्सीम चाहता
वैवकु

__________
अवांतर : आपणास सौंदर्य या विषयाची आसक्ती/ ओढ आहे हे आम्ही पूर्वीच ताडले आहे (आपल्या व्यक्तिगत माहितीत आपण डकवलेल्या मधुबालेच्या फोटोवरून .............:D)

मज नाते ना रुचते
ना जमते बिलगाया,
थिजणे संपून जावे
वाटे जन्म नवा घ्यावा!
जिथे स्वैर मी असावे
अलगद मी रुजावे,
अन् माझ्या रुजण्याने
जन्म नवे उमलावे..

2 gud
Happy

असो हा प्रतिसाद शांतपणे लक्षपूर्वक वाचलत याबद्दल >> तुला रे कसे कळाले? Happy
आपणास सौंदर्य या विषयाची आसक्ती/ ओढ आहे हे आम्ही पूर्वीच ताडले आहे >> परफेक्टो Happy

वैवकु, तू म्हणतोस ते पक्के पटलेय, बाकी, एक प्रांजळपणे सांगेन, ह्या कवितेतून फक्त एक खिन्नतेचा मूड परावर्तित करायचा होता आणि लयीकडे मी कमीच ल़क्ष पुरवले- त्यामुळे लहान मोठ्या गोष्टी खटकत असाव्यात... (स्टील नेक्स्ट टाईम ऑल इम्प्रुवमेंटस विल बी सीन, सर! )

सर्वांची आभारी आहे दोस्तों!

फक्त एक खिन्नतेचा मूड परावर्तित करायचा होता >>>>>>

तेच तर ना गं बागे ........ .लयीत अजून पक्की बसली असती ना ही कविता तर तो मूड आपसूकच पसरला असता आणि काळजात रुतूनही बसला असता बघ !!! लयीन्ची हीच तर जादू असते बाळा........ जादू.असते बघ !!

स्टील नेक्स्ट टाईम ऑल इम्प्रुवमेंटस विल बी सीन>>>>>
-मनःपूर्वक पुलेशु!!

कविता आशयाने आवडली.. सुरेख!

पण सुंदरश्या दवबिंदूचा हा खिन्नसा मूड नाही भावला.. कृपया गै. नसावा Happy

Proud

(वरील गंभीर भावमुद्रा ही पाध्यांच्या प्रतिसादावरील प्रतिसाद असून तिचा संबंध मूळ साहित्याशी कृपया जोडला जाऊ नये)

(अवांतर - 'भूत' म्हणाले की ही भावमुद्रा मूळ साहित्यास अतिशय सौम्य प्रतिसाद ठरेल)

वाचली होती पण मुद्दामच प्रतिसाद दिला नाही Wink

हम उम्हारे चार मारते है (कवितेवरचे प्रतिसाद) तब जाके तुम हमारा एक मारते हो. ये हिसाब नही चलेग. हमारा दिवाळा वाजेगा भई ! अब बैसो ऐसेच. कविता कशी काय वाटी ये लिखाच नही Biggrin

Pages