तंदूर कोळंबी

Submitted by मराठमोळा on 10 July, 2012 - 22:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नमस्कार मंडळी,
कोळंबीचा हा माझा सर्वात आवडता प्रकार आहे. तंदूर कोळंबी नुसतं म्हंटल तरी तोंडाला पाणी सुटतं. पटकन साहित्य घ्या.

१. पावशेर कोळंबी
२. एका लिंबाचा रस
३. लाल तिखट १-२ टे.स्पून
४. काश्मिरी लाल तिखट १ टे.स्पून
५. एक पळी वितळलेले बटर
६. आलं पेस्ट १ टे.स्पून
७. लसूण पेस्ट १ टे.स्पून
८. तंदूर मसाला २ टे.स्पून
९. मीठ चवीनुसार
१०. अर्धा कांदा उभा चिरून

क्रमवार पाककृती: 

१. कोळंबी स्वच्छ धुवुन घ्या आणि धागा काढुन घ्या.
२. लिंबाचा रस, लाल तिखट, काश्मिरी तिखट, आल आणि लसूण पेस्ट, मीठ, तंदूर मसाला आणि बटर चांगले एकजीव करुन घ्या.
३. या मिश्रणात कोळंबी मरीनेट करा. कमीत कमी १ तास.
४. ओव्हन १५० डिग्रीवर प्री-हीट करा १० मिनिटे.
५. ट्रे वर अ‍ॅल्युमिनिअम फॉईल पसरवा.
६. आता फॉईलवर कोळंबी पसरवून ठेवा.
७. १८० डिग्रीवर फॅन फोर्स्ड मोडमधे १५-२० मिनिटे ठेवा. दर ५ मिनिटांनी कोळंबीची बाजू बदलत रहा. इथे जरा अंदाजानेच आणि लक्ष ठेवून वेळ किती ते ठरवा.
८. कांदा पाण्यात धुवुन घ्या. त्यात मीठ आणि थोडे काश्मिरी तिखट घाला.
९. कांदा, लिंबू आणि कोळंबी प्लेटमधे ठेवून सजवा आणि लुटा मस्त आनंद.

Tandoor Kolambi.jpg

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
अनुभव्/प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! फोटो मधे एकदम सही दिसतायत कोळंब्या.

या कोळंब्या स्क्युअरवर लावुन बार्बेक्यु करायच्या Happy सोबत बारिक किसलेली काकडी+पुदिना+दही यांचे डिप.

मी खात नाही पण नवरोबांना करुन देते Happy