झाड

Submitted by संजयb on 10 July, 2012 - 07:06

एक झाड ऊभे होते
काटेरी वाटेवर
फाद्यांची पाने झडलेली
खोड मोडकळलेले
वा-यावर हलेना
पावसात बहरेना
पण एक गुपीत होते
म्हणूनच ते ऊभे होते
डोलीत एक मैना
आश्रयाला होती
पदराखाली तीच्या
दोन लहानगी होती
झाडाचाच आधार होता
झाडाचीच सावली
एकटीच माऊली
दोन जीवाना वाढवीत होती
झाडाचाच आधार होता
झाडाचीच सावली
झाड म्हणून तर ऊभे होते
सरला बहर तरी जगत होते
मैनेच्या मातृत्वात
तेही तृप्त होते

गुलमोहर: 
शब्दखुणा: