Submitted by हर्ट on 10 July, 2012 - 00:22
पुण्यात खास करुन कोथरुड भागात भारतीय पारंपरिक आणि फास्ट-फुड पाककृतीचे वर्ग कुठे असल्यास त्या वर्गांबद्दलची इथे माहिती लिहा. माहितीमधे संपर्क क्रमांक वा पत्ता नमूद करा. धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही पुण्यातील कुकरी क्लासेसची
ही पुण्यातील कुकरी क्लासेसची एकत्रित लिंक : http://www.justdial.com/Pune/cookery-classes
बी, अरे ते एक लाख वीस हजार
बी, अरे ते एक लाख वीस हजार रुपयांमध्ये असतील पण सिंगापुर डॉ मध्ये तेव्हढे होत नसावेत!
अर्थात तुझी पुतणी भारतात जाणार असेल तर तिकडे शिकलेले केव्हाही चांगलेच!
मलाही इथे येइपर्यंत स्वयंपाकात फारशी गती नव्हती! खुप पाकृ माहित होत्या पण करायची वेळ आली नव्हती. माझी आई जो काय वेगळा पदार्थ करायची त्याची कृती सांगायची. म्हणजे तिला तसे सांगायला आवडते हे आता अलिकडे लक्षात आले! ते ऐकलेले कुठेतरी डोक्यात होते आणि मी जयश्री देशपांडे यांच्या 'स्वयंपाक शोध आणि बोध' ह्या पुस्तकातील कृत्या बघायचे. सुरुवातीला तर प्रत्येक स्वयंपाकाला पुस्तक बघावे लागायचे! मग हळु-हळु हात बसत गेला.
वर अमांनी म्हटलय तसं कुणी मदत करायला असेल तर त्यांच्याकडुनही शिकता येइल. तिला शुभेच्छा!
(५०० रु. मला तरी जास्त
(५०० रु. मला तरी जास्त वाटतात. कारण ह्या सगळ्या पदार्थांचे व्हिडीओज आता मिळू शकतात ना )अर्थात हा निर्णय ज्याचा त्याचा असावा. पण मी केलेले काही कुकींग क्लासेस्.....वर उल्लेखलेला एक क्लास मी केलेला आहे. पण तिथे सुद्धा काही पदार्थ चक्क फसले होते. अश्या वेळेस चिडचिड होते ते वेगळेच. आणि तिथे खायला काही कोणी जात नाही तसेही...त्यामुळे क्लासचे पैसे खाण्यात वळते व्हावेत अशी अपेक्षाही नसावी शिकायला येणार्यांची.
पुण्याच्या सौ.मेधा गोखले अगदी
पुण्याच्या सौ.मेधा गोखले अगदी बेसीक मराठी स्वयपाक शिकवतात.सेल नम्बर ९३७३०९४४६७ आहे.
सुचरीता, मी तू दिलेल्या
सुचरीता, मी तू दिलेल्या क्रमांकावर फोन लावला. त्या चार दिवसांचा रोज तीन तासांचा वर्ग घेताता. फी आहे २००० रुपये. दोन भात, दोन भाज्या, दोन कोशींबीर्या, दोन गोडाचे पदार्थ शिकवतात. पोळ्या शिकवतात. तुला काय वाटत?
<फी आहे २००० रुपये. दोन भात,
<फी आहे २००० रुपये. दोन भात, दोन भाज्या, दोन कोशींबीर्या, दोन गोडाचे पदार्थ शिकवतात. पोळ्या शिकवता>
वरण, उसळ बेसिक मराठीत बसत नाही की दोन हजारांत?
हा रेट फॉरेनर्सना शिकवण्याचा असेल का?
२००० जरा जास्त नाही का
२००० जरा जास्त नाही का वाटत...कोण जात असेल आनि २००० रुपये देऊन भात भाजी शिकायला ????
बी, तुला प्रामाणिकपणे एक
बी, तुला प्रामाणिकपणे एक सूचना देऊ का? तुझ्या पुतणीला जर बेसिक स्वैपाक शिकायचा असेल तर घरामधेच सुरूवात करू देत की.
भात वरण आमटी, एखादी भाजी वगैरे घरामधेच शिकता येऊ शकते. पोळ्या कुणी कितीही शिकवल्या तरी सरावाखेरीज जमत नाहीत. त्यामुळे त्याचादेखील सराव घरामधेच करू देत. नंतर हळूहळू रेसिपी वाचून वाचून तिला दुसरे तुलनेने कठीण वाटणारे पदार्थ पण जमू शकतील. तिला स्वतःला स्वैपाकात इंटरेस्ट असेल तर उलट ती उत्साहाने अजून पदार्थ करू शकेल. त्यानंतर तिला ज्या पदार्थामधे शिकण्याची आवड आहे तिथे क्लास करता येऊ शकेल (उदा. पंजाबी/चायनीज्/केक्स इत्यादि) ते जास्त सोपे पडेल. तिला मायबोलीवरच्या आहारशास्त्र ग्रूपबद्दल सांग. इथल्या कित्येक रेसिपी अगदी माझ्यासारख्या अज्ञ मुलीला देखील करता येऊ शकतात.
बी फी ख्ररच खुपच जास्त
बी फी ख्ररच खुपच जास्त आहे,त्यापेक्षा रुचिरा,तरला दलाल,मायबोली,हमखास पाकसिद्धी मधील रेसिपी हळू हळू घरी करायला सुरवात करायची.स्वयपाक खुप सोपा आहे.
You Tube वर रेसिपी बघायला
You Tube वर रेसिपी बघायला सांगा तीला, बघून येत ते वाचून येत नाही
नाही तुम्ही गैरसमज करत आहात.
नाही तुम्ही गैरसमज करत आहात. तिला स्वैपाक खूप छान येतो. अगदी भाकरी वगैरे सुद्धा छान करते. चव आहे तिच्या हाताला. म्हणूनच मला वाटल आणि तिलाही वाटल कि एक पारंपरिक स्वैपाक शिकवणारा वर्ग लावावा. म्हणजे आपल्याला येत त्यापेक्षा अधिक चांगल आपण करु. स्वैपाक येत नाही म्हणून मी तिला वर्ग लाव असे म्हणत नाहीये तर तिला स्वैपाकातील अजून छोट्यामोठ्या गोष्टी माहिती व्हाव्यात ह्या उद्देशाने वर्ग लावायचा विचार करत आहे.
तर तिला स्वैपाकातील अजून
तर तिला स्वैपाकातील अजून छोट्यामोठ्या गोष्टी माहिती व्हाव्यात ह्या उद्देशाने वर्ग लावायचा विचार करत आहे.>>>>>>>>>>> अरे पण रोजचा थोडा जरी केला तरी छोट्या - मोठ्या गोष्टी आपोआप येत जातात...चुका करुन ,,चटके बसुन्,हात कापुन ,मीठ कमी- जास्त टाकुन, असेच प्रयोग करत मज्जा येते स्वयंपाक करायला
२०००/- मध्ये तर बरेच काही
२०००/- मध्ये तर बरेच काही सामान आणता येईल आणि रोज एक तास जरी दिला तरी भात, दोन भाज्या, दोन कोशींबीर्या, दोन गोडाचे पदार्थ शिकता येतील.
युट्युबवर बरेच व्हिडीओ आहेत, ते पाहून तर शिकणे सोपे आहे. सेल्फ-लर्निंग इथे उपयोगी आहे.
हो मलाही आता तसेच वाटते आहे
हो मलाही आता तसेच वाटते आहे की स्वतःहून शिकणेच योग्य होईल. इतक्या फिया घेतात आणि शिकवतात नुसते नावालाच. काल मला कोण नवल वाटले त्या सुचरिताच्या परिचयाच्या ताई म्हणाल्यात की आम्ही २००० मधे दोन भाज्या, दोन गोडाचे पदार्थ, दोन भात, दोन कोशींबीर्या शिकवतो. म्हणजे १००० रुपये दिले तर त्या एकच पदार्थ शिकवतील. कणिक कशी तिंबवतात येथून पोळी तव्यावर होईपर्यंत शिकवतो असेही म्हणाल्यात.
सुचरिता, त्यांनी तुझी किती फी घेतली नि काय काय शिकवले तेवढ्यात?
दूरदर्शनच्या मराठी
दूरदर्शनच्या मराठी वाहिन्यांवर रोज अर्ध्या अर्ध्या तासाचे क्लासेस असतात. वीज आणि केबल/डिशचे भाडे ही फी.
बी, तिला मायबोली आयडी काढायला
बी, तिला मायबोली आयडी काढायला सांग. इथे सोप्या पासून इंट्रिकेट पाककृती आहेत. करताना काही शंका आलीच तर मायबोलीकर पटकन मदत करतात. इथे येवढा मोठ्ठा खजीना असताना आणि तिला तसाही छान स्वयंपाक येत असताना क्लासची गरज लागू नये असं वाटतं.
आर्च +१
आर्च +१
आर्च, माझ्याकडे होती तेंव्हा
आर्च, माझ्याकडे होती तेंव्हा ती माझाच आयडी घेऊन इथे नियमित वाचायची. पण पुण्यात तिला इंटरनेट नाही आहे.
बी अहो मी क्लास लावला
बी अहो मी क्लास लावला नव्हता!माझ्या भिशी ग्रुप मध्ये कळल हे नाव!हे प्रकरण इतके महाग आहे हे माहीत नव्हते.मी आई,आजी,पुस्तके,मायबोलीच्या क्रुपेने स्वयपाक करते हो!
सुचरिता हे मला माहिती नव्हते.
सुचरिता हे मला माहिती नव्हते. त्या मेघाताई म्हणाल्यात की तुम्ही तिच्या विद्यार्थिनी अहात.
बी. अरे मग तिला स्वैपाकाची
बी. अरे मग तिला स्वैपाकाची आवड असेल तर प्रश्न मिटला. ती स्वतःहून शिकेल सर्व काही. चिन्ता नको. पारंपारिक, आधुनिक, वेगळं काही तरी ती स्वतःहून बनवू शकेल. इतकी फी देण्यापेक्षा तिला वेगवेगळ्या रेसिपीची कूकबूक्स घेऊन दे. ते जास्त फायदेशीर पडेल.
मेधाताईना _/\_(साष्टान्ग
मेधाताईना _/\_(साष्टान्ग दन्डवत त्यान्च्या मार्केटिन्ग स्किल्स् बद्दल)मी समक्ष जाऊन भेट घेणार आहे,ह्या बाईची!!!!!!!!!
Pages