तांदळाच्या उकडीचे थालिपीठ आणि corn चे सुप

Submitted by rakhee on 22 September, 2007 - 11:08

थालिपीठ :

तांदळाच्या उकडीमध्ये चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ, साखर, वाटलेली हिरवी मिरची व जिरे पुड घालावी. थोडेसे पाणि घालून चांगले मळून गोळा बनवावा. हा मोठा गोळा लहान गोळ्यांमधे विभागावा. तव्यावर कुकिंग स्प्रे किंवा तेल लावावे. एक छोटा गोळा घेऊन त्याचे थालिपीठ थापावे. ह्या थालिपीठाला मधे एक आणि त्या भोकाच्या भोवती अजुन ४-५ भोके पाडावीत. ह्या भोकांमधे तेल सोडावे. झाकण ठेऊन खालची बाजु क्रिस्पी होईपर्यंत शिजवावे. मग झाकण काढुन थालिपीठ उलटावे. दुसरी बाजु क्रिस्पी होईपर्यंत शिजवावे.

सुप :

थलिपीठ करायला घेण्याआधी corn चे दाणे कुकर मधे शिजायला ठेवावे. ३ शिट्या करुन घ्याव्या. एका copper bottom च्या भांड्यात corn flour बटरमधे भाजावे. सतत हलवत रहावे. corn flour चा रंग बदलला की त्यात दुध घालुन शिजवावे. ह्या मिश्रणाला घट्टपणा आला की gas बंद करावा. ह्याची consistency साधारण भज्यांच्या पीठापेक्षा थोडी घट्ट असावी. शिजलेले corn चे दाणे ह्या मिश्रणात घालावे. जर क्रिमी सुप हवे असेल तर hand blender नी सगळे एकजीव करून घ्यावे. अजुन दुध, मीठ, साखर आणि मिरपुड घालून सुप उकळावे.

ह्या मेनुला जास्त भाज्या चिरव्या लागत नसल्यामुळे मोदक करून उरलेली उकड असेल तर हा मेनु नक्कि ३० मिनिटात तयार होतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users