आजही मी लावलेले दार नाही.....

Submitted by kaaryashaaLaa on 16 September, 2008 - 16:15

मित्रांनो,

सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांची संख्या आता ५५ झाली आहे.

यांच्याव्यतिरिक्तही ज्यांना गझल शिकायची, लिहायची इच्छा आहे, पण नाव नोंदवायचं राहून गेलंय, अश्यांनी २६ तारखेपर्यंत आमच्याकडे आपल्या रचना पाठवा. आपण त्या कार्यशाळेत जरूर समाविष्ट करून घेऊ.

मायबोली वर आयोजित केलेली ही दुसरी कार्यशाळा थोडी वेगळी आणि मनोरंजक करू असं म्हटलं होतं.

पहिल्या कार्यशाळेत आपण ’तरही’ गझल लिहिल्या होत्या. म्हणजे एक ओळ (मिसरा) दिली होती.
त्याचे वृत्त (बहर), यमक (काफिया), स्वरचिन्ह (अलामत) व अंत्ययमक (रदीफ) समजावून सांगण्यात आले होते.
दिलेल्या ओळीने सुरूवात करून, तीच जमीन वापरून किमान ५ व कमाल कितीही असे शेर लिहून गझल लिहायची होती.

ह्यावेळी मात्र आपण काही बंधनं शिथील करणार आहोत. ह्या कार्यशाळेत आम्ही तुम्हाला फक्त अंत्ययमक काय असावं हे सांगणार. वृत्त आणि काफिया काय असावा हे तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे. आहे ना मजा? Happy

मग तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही.

गझल कार्यशाळा २००८ साठी आपण निवडलेला रदीफ आहे : 'नाही'.

मग आता इतकंच करायचं -
'नाही' रदीफ वापरून किमान पाच शेर लिहायचे. म्हणजे फक्त १० ओळी!
गझल पूर्ण झाली, की ती आम्हाला kaaryashaalaa08@maayboli.com या पत्त्यावर पाठवायची.
ती गझल तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे निर्दोष करण्यासाठी संयोजक समितीचे सदस्य तुमच्याबरोबर असतीलच.

हे कसं, काय याची प्राथमिक माहिती या ठिकाणी दिलेली आहे :

गझलची तोंडओळख - १
गझलची तोंडओळख -२ (वृत्त विचार)
गझलची तोंडओळख -३ (शेर, काफिया, रदीफ, अलामत.. )
"गझल - काही उदाहरणे"

त्यातून काही अडलं तर आम्ही आहोतच. Happy

* एक स्पर्धक एकापेक्षा अधिक रचना पाठवू शकतो. मात्र अशा रचना वेगळ्या वृत्तात व वेगळा काफिया वापरून लिहिलेल्या असल्या पाहिजेत.
* ह्या कार्यशाळेत हझल (हास्य-गझल) स्वीकारली जाणार नाही Happy
* तसेच स्वरकाफिया असलेल्या गझल स्वीकारल्या जाणार नाहीत.
* कृपया तुम्ही लिहीत असलेली रचना आम्हाला खाली दिलेल्या ई-पत्त्यावरच पाठवावी.
ती रचना निर्दोष आहे असं ठरल्यावर संयोजक समिती कार्यशाळेत प्रकाशित करेल.
तोवर तुम्ही ती कार्यशाळेतल्या कुठल्याही दुव्यावर वा अन्यत्र कुठीही प्रकाशित करू नये.
* तसंच या आधीच अन्य ठिकाणी प्रकाशित झालेल्या रचना कार्यशाळेत देऊ नयेत अशी नम्र विनंती.
* तुमची मतं, तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. काहीही प्रश्न / शंका / सूचना असतील त्या आम्हाला अवश्य कळवा. त्यावर लगेच कार्यवाही केली जाईल.

लक्षात असू द्या :

२६ सप्टेंबर : गझल पाठवण्यासाठी शेवटची तारीख आहे.

नाव नोंदवायचं राहून गेलं? हरकत नाही. २६ तारखेपर्यंत तुमची गझल आम्हाला पाठवा. आपण ती कार्यशाळेत समाविष्ट करून घेऊ Happy

यापुढील पत्रव्यवहार या पत्त्यावर करायचा आहे : kaaryashaalaa08@maayboli.com

मग करताय ना सुरुवात? Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाद, माझे अडीच शेर झालेत.. उरलेल्या अडीचांसाठी धुमश्चक्री चालू आहे.. तुझी गजल झालीच आहे, तर माझी पूर्ण करतेस का? Proud
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!

मी तर कधी अभ्यास पण एवढी डोकंफोड करून, नेटाने केला नव्हता. मी माझ्या मैत्रिणींना हे गझल प्रकरण सांगितले तेव्हा त्या एकसुरात "काSSSSSय? तूSSSS?" असे किंचाळल्या तेव्हा आपणही कुणाला शॉक वगैरे देऊ शकतो ही नवी जाणिव झाली Proud

जे पुण्यात आहेत ते विद्यार्थी एकत्र भेटून सुद्धा अभ्यास करू शकतो यावर.. मग थोडीफार देवाण घेवाणही करता येईल.. Happy

ज्यांनी यशस्वीरित्या गझल लिहिल्यात त्यांनी त्यांचे अनुभव वा सोपे उपाय आम्हालाही सांगून प्रेरणा दिलीत तर आमच्याही गझला २६ पर्यंत होतील. खरचं मी गंभीरपणे हे विचारत आहे.

यशस्वी वगैरे माहित नाही पण २ लिहिल्यात.

साहित्य : १ मोठा कोरा कागद, १ शिसपेन्सिल, १ खोडरबर, १ पेन, १ बाटली पाणी, पंखा, बशीत काहितरी तोंडात टाकायला, १ वृत्त, चवीपुरता आशय

कृती : एका कोर्‍या कागदावर ठरवलेले वृत्त उदाहरणार्थ एक ओळ "लगागा*४" ची असे दोन दोन ओळींचा ग्रुप ५ वेळा पेन ने लिहावा (भोज्याला हात टेकवल्यापुरता आनंद हवा असेल तर ५ वेळा पुरेल नाहीतर कितीही वेळा लिहावा) मग पेन बाजूला ठेवावे.

पहिल्या दोन ओळींच्या शेवटच्या "गागा" च्या वर पेन्सिलीने "नाही" असे लिहावे. खालच्या ग्रुप्स मधील दुसर्‍या ओळीत शेवटच्या "गागा" च्या वर एक एक "नाही" लिहावा. मग काफिया अलामत जमण्यासाठी त्यात बसणारे बरेचसे शब्द पानाच्या शेवटी एकापढे एक रफवर्क म्हणून लिहून काढावेत. स्वतःवर थोडे खूष होऊन त्यातील मस्त वाटलेले शब्द काफिया अलामत च्या जागी लिहून टाकावेत. उलटे डोके वापरून प्रत्येक शेरातली दुसरी ओळ आधी रचावी व त्याला अनुसरून पहिली ओळ रचावी. वृत्त बिघडत नाही ना याचा मधे मधे अंदाज घ्यावा (तरी ते बेसावध पणे मधे मधे बिघडतेच, लक्षात आणून द्यायला व सुधारायला मदत करायला कार्यशाळा समर्थ आहेच !!).

मग दोन शब्दांच्या मधे आपल्यालाच आपण काय लिहिले आहे ते कळण्यासाठी छोट्या उभ्या रेघा पार्टीशन म्हणून माराव्यात. लगागा*४ मधे शब्द बसण्या साठी प्रत्येक शब्द ३ अक्षरांचाच हवा असे नाही. तो पुढच्या लगागा मधे घुसखोरी करु शकतो.

तसेच वृत्तात बसवताना मनात उत्स्फूर्त पणे आलेला आशव कुठेतरी हरवतो आहे असे वाटते पण इलाज नाही. व्याकरण व आशय दोन्ही उत्कृष्ठ पणे जमायला खूप प्रॅक्टीस, व्यासंग पाहिजे. इथे आपण तर पहिल्यांदाच हा प्रयास करतोय त्यामुळे हताश व्हायचे नाही.

हे पार पाडताना आपल्याला पाणी व चिवडा, बिस्कीटांचा आधार मिळतो. मग धीर करुन पाचही शेर अर्थ लक्षात घेऊन वाचावेत. स्वतःवर प्रसन्न होता आले तर परत परत ३-४ दा वाचून कार्यशाळेला मेल करून टाकावेत. एकदा वाचून दमायला झाले तर ताबडतोब निस्तरायला कार्यशाळेला मेल करावेत.

कार्यशाळेच्या प्रतिसादाची वाट बघावी. बिचारे लगेचच व कौतुकाने आपली रचना बघतात व आपल्याला मदत करतात. आपण १-२ मधे खलास होतो तर कार्यशाळेला तर अशा अनेक समरप्रसंगांना तोंड द्यावे लागत असेल.

सलाम या कार्यशाळेला Happy

खी खी खी खी....... Lol
अगदी अगदी अश्विनी,
माझाच कीबोर्ड घेतलास की! Happy
मी पण असेच काही करायच्या विचारात होतो,
फक्त कागदा ऐवजी एक्सेल वापरणार......! तेवढच कॉपी पेस्ट करायला सोप!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

तू ऑफिस मधे हे सगळं करतोयस की काय? बॉसशी पण लगागा लगागा भाषेत बोलशील हा !! मी हे उद्योग घरीच केले व कागद पर्स मधून स्वतःबरोबर कॅरी करतेय. म्हणजे कार्यशाळेने काही सुचवले की लग्गेच कागदावर दुरुस्त करायचे मग टायपून मेल करायचे, मग कार्यशाळेचे डोके खायचे मिळाले का? मिळाले का? करत.

आश्विनी, तू माझ्याकडे कधी डोकवून गेलीस? Proud
कधी कधी ऑफिसमधे पण कामाच्या नावाखाली आपले लिखाण काम सुधारायचा, पर्यायाने अधिकच बिघडवायचा प्रयत्न करावा!! Proud

व्याकरण व आशय दोन्ही उत्कृष्ठ पणे जमायला खूप प्रॅक्टीस, व्यासंग पाहिजे. >> बरोबर हेच मल म्हणायचं आहे. व्याकरणाकडे लक्षा देता देता आशय कुठेच्य कुठे पळतो आहे.

अश्वीनी धन्यवाद. छान लिहिलसं. यावरून तुझी गजल किती छान असेल असे वाटते आहे.

अश्विनी, एकच गजल सांगितली होती ना लिहायला.. मग ती दुसरी गजल मला देऊन टाक Happy आणि माझी अर्धवट गजल तुझ्या डोक्याला आयाम मिळावा म्हणून मी तुला देऊन टाकतो. कसें??

अरे आधी नाही का सांगायचंस? मी दुसरी पण मेल केली कालच. कार्यशाळेलाच मी काय लिहिलंय ते वाचायला व समजायला व मला दुरुस्त्या समजाऊन सांगायला वेळ लागणार आहे त्यावरून ती किती खतरनाक आहे बघ ! तुझी अर्धवट गजल मी "अधूरी एक कहाSSSSSणी" सदृष्य मालिकेला टायटल साँग म्हणून देऊन टाकली असती कारण ती पुर्ण करण्यासाठी त्राणच नाहिये. आणि "नाही" शब्द १०० दा वाचून वापरुन कंटाळा आलाय. आता काहितरी "होय" सारखे सकारत्मक हवंय चेंज म्हणून (स्वतःशीच : अश्विनी, याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे Proud )

लिंबू, तू excel वापरणार ना? मग कंडिशनल फॉर्मॅटींग वापरून दीर्घ, जोड अक्षर आले की आपोआप लाल होईल असे कर म्हणजे "गा" कुठला व "ल" कुठला यावर लक्ष ठेवणे सोपे जाईल. Happy

वाह! भारी चालू आहे की इथे..
(वैभवा, इथल्या टवाळान्ना चांगलाच उद्योग लावून दिला आहेस.. no wonder v n c ओस पडला आहे:) ~D
इथे, "वृत्त तुमचे शब्द आमचे" असा काहीतरी गझल-degree holders ना नविन व्यवसाय सुरू करता येईल नक्की..
असो. एकंदरीत वृत्तपंथ छान चालू आहे.. गेल्या वेळेप्रमाणे याही खेपेला सुंदर गझला वाचायला मिळतील अशी आशा आहे.

अहो गुर्जी, बाई... आमची गजाल मिलाली का?

>>>>> (वैभवा, इथल्या टवाळान्ना चांगलाच उद्योग लावून दिला आहेस.. no wonder v n c ओस पडला आहे:) ~D

हो रे हो योग, sg road पण बहुतेक त्यामुळेच ओस पडलाय......! Proud DDD

अश्विनी, कन्डीशन लिहून दे! Happy मला जमत नाहीये
...;
आपला, लिम्बुटिम्बु

अश्विनी, सहीच ना! गझलेच्या पुस्तकातला धडाच लिहिलास की. Happy

शब्द, वृत्त, आशय, ही पण चर्चा चालू झालेली दिसतेय. म्हणजे पुढची पायरीच की.

खरं तर गझलेच्या ह्या आकृतीबंधामुळेच तर गझल लिहण्यात खरी मजा आहे. ह्या बंधनांमुळे आशयावर अन्याय होतो असे सुरुवातीला वाटू शकेल. भटांनी ही म्हटले आहे की,

शोधू तुला कुठे मी? आहेस तू कुठे?
मी शब्द शब्द माझा उकलून पाहिला

पण हळूहळू ’च’, ’या’, ’ते’ सारखे अनावश्यक शब्द टाळायची सवय लागते. नेमके आणि तेच शब्द वापरले जातात. तिथे त्या जागी काही पर्यायी शब्द नसतो. आपण जे स्वत:चे किंवा दुसर्‍याचे आपण पाहिलेले विचार/अनुभव शेरातुन व्यक्त करायचा प्रयत्न करत असतो ते संदर्भासहीत असतात. पण ह्या आकृतीबंधामुळे संदर्भ वेगळे करून फक्त अनुभव लिहायची सवय लागते आणि त्यानंतर:

तुमची करा आरास अन तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा बदनाम झंझावात मी

हे वाचताना ह्यातले ’तुम्ही’ म्हणजे कोण हे प्रश्न दुय्यम होतात.

कधी कधी अर्थही त्रास देऊ लागतो.

उरले तरी बिचार्‍या शब्दात काय आता?
अर्थास ऐनवेळी फुटतात पाय आता

Happy

आता कार्यशाळा असल्याने वेळेचे बंधन आहे. पण त्यानंतर गझल लिहिताना घाई नसते. शिवाय गझलची जमीन आधीच एखाद्या सुचलेल्या शेरातुन स्पष्ट झालेली असेल तर मग काय, गझल पुर्ण करायला भरपूर वेळ असतो. भटांनी त्याच्या काही गझला कित्येक वर्षांनी पुर्ण केल्या आहेत.

हा पहा लागला अर्थ बोलायला
शब्द येतात त्यांना पुकारू नये

कधी कधी मात्र उलटेच होते. काही शब्दच आपल्याला इतके आवडतात की ते वापरायचा मोह आवरणे अवघड जाते. ते शब्दच आपल्याला पुकारू लागतात की मला वापर. अशावेळी अर्थाशी/आशयाशी तडजोड होण्याची शक्यता असते. म्हणूनच मनावर ताबा मिळवून:

अडवून जरी शब्दांनी भरपूर खुशामत केली
दारात वर्तमानाच्या मी अर्थ उद्याचा नेला

हे शक्य होऊ शकते. नंतर नंतर आपल्या कल्पना वृत्तातच उतरतात असा कसलेल्या गझलकारांचा अनुभव आहे. ह्या दृष्टीने वैभव ने मायबोलीच्या पहिल्या गझल कार्यशाळेत "बोलता बोलता गझल" अशी एक पोष्ट टाकली होती. ती जरूर वाचावी.

वरच्या काही प्रतिसादांमधे आशय आणि वृत्तबद्धता ह्या बद्दल उल्लेख होता म्हणून हे सगळे लिहिण्याचा मोह आवरता आला नाही. लईच जड झाले असेल तर क्षमस्व. Happy

टिप: ह्या प्रतिसादातील सर्व शेर सुरेश भटांचे आहेत. तसेच त्यांच्या मुलाखतीमधील काही भाग ही वापरला आहे. Happy

==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
shama1_0.jpgkaaryashaalaa08@maayboli.com

कार्यशाळा - तुम्हाला मायबोलीवरून मेल कलेय. Plaese मिळालं का नाही कळवणार का?

मीटिंगमधे माझं हा उपद्व्याप सुरू होता..
ल गा गा एका कागदावर लिहून काहीतरी शब्द घुसडणं चालू होतं.

बॉस म्हणे क्या चल रहा है?

नोट्स बना रही हु... (कसल्या हे त्याला कशाला सांगा... Happy

एक्सेल मधे जमत नाहिये. कागदावर खोडाखोड करायला जाम मजा येतेय.

बरे कार्यशाळावाले..
माझ्या गझलमधले वृत्त तर भयानक आहेच. पण आशय फारच गमतीशीर होतोय. म्हणजे एक शेर रडका तर दुसरा मजेदार, असं चालतं का??

या गझला लिहिण्यापेक्षा कथा लिहिणे. (त्या अर्धवट सोडण् अगदी सोप्पय. )

--------------
नंदिनी
--------------

>>>बॉस म्हणे क्या चल रहा है?
>>नोट्स बना रही हु... (कसल्या हे त्याला कशाला सांगा...

सेम पिंच!! Happy

अरे.... हे कार्यशाळा वाले फार्फार चांगले आहेत...
माझ्या अ. आणि आ. गझलेला स्मायली वगैरे सह रिप्ल्याय केलाय.. !!
त्यामुळे थोडा हुरूप आलाय... तुम्ही पण तयार असेल होईल तसं पाठवून द्या त्यांना.. थोडं tension कमी होतं म्हणजे.. Proud

कार्यशाळा, तुम्ही खूप छान माहिती देताय व आम्हाला सपोर्ट देताय. माझ्या दुसर्‍या गजलेला तुम्ही सुधारणा सांगणार होतात पण अजून काही कळवले नाहियेत त्याअर्थी पुर्ण गजलच उलटी पालटी करावी लागणार आहे का? Uhoh
कदाचित तुम्हाला वेळही झाला नसेल, मी समजू शकते Happy

कार्यशाळा:

हा विद्यार्थी अगदी आयत्या वेळी वर्गात येवू पहात आहे...घेणार का..? गृहपाठ लिहून तुम्हाला पोचता केला आहे.
कृपया कळवा.

अनेक आभार!
(खाली पालकांची सही) Happy

संयोजक
मतल्यामध्ये फेरफार करण्याची पराकाष्ठा चालू आहे. एक बदललेला मतला पाठवला आहे. कृपया बघून सांगा की कसा वाटतोय.. आतापर्यंत दाखवलेल्या पेशन्स बद्दल धन्स.. Happy

कार्यशाळा सगळ्याणा दिवी देत आहे असेच वाटते शेवटच्या अगरबत्तीमुळे! Happy

गिर्‍या तुला कधी नव्हे ते मोदक! संयोजक सहीमधला 'दिवा' आम्हा पामरांसाठीच असून महागाई आणि bankrupcy मुळे त्याला मेणबत्तीचे स्वरूप प्राप्त झाले की काय असे वाटते! Light 1

जळणारी मेणबत्ती ठेवण्यामागचा उद्देश असा आहे की पुर्वीच्या काळी दरबारात गझल पेश करताना त्या गझलकारापुढे सन्मानार्थ मेणबत्ती ठेवली जायची. त्याची गझल झाली की ती मेणबत्ती उचलून दुसर्‍या गझलकाराकडे ठेवली जायची.

म्हणजे अंधारात व मिणमिणत्या मेणबत्तीत हे चालायचं? इथे लख्ख उजेडात गजल वाचवत नाहिये तर अंधारात काय उजेड पाडणार आहे Proud

अश्विनी, बी, लिम्बूटींबू, नंदिनी....

व्वा.. किती सहज भाषेत तुम्ही सर्वांनी गझल लिहिण्याचं तंत्र सांगितलयं..आता माझा सप्ताहांत नक्कीचं चांगला जाईल..:)

कार्यशाळा,
अ. अ. धन्यवाद..
खूप परीश्रम आपण घेत आहात्..त्याचे नक्कीचं चीज होईल..

"आमची पणती वा मेणबत्ती मात्र अजून पेटली नाही
म्हणता येईल ज्याला 'गझल' ती अजून जमली नाही "

Pages