कमोदिनी काय जाणे ...

Submitted by माधव on 9 July, 2012 - 02:57

कमळ!

भारतीय साहित्यात, शिल्पकलेत आणि अगदी नृत्यातही खूप महत्वाचे असलेले हे फूल. शाळेत जाणारे मूलही बहुदा चित्रकलेत पहिले फूल कमळाचेच शिकत असेल. पण आज आपल्याला जे फूल कमळ म्हणून दिसते ते असते कुमुद - वॉटर लिली. पण त्याचेही सौंदर्य काही कमी नसते.

अशीच काही कुमुद:

१.

२.

३.

४.

५.

६.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान!!!

WOW

विशाल तिथलेच असणार हे. मागच्याच रविवारी माधव यांनी सगुणाबागेला भेट दिली. बाकी सगुणाबागेची वाट तुम्हीच दाखवलेली आधी सगुणाबागेचा धागा टाकून. त्याबद्दल धन्स.

मस्त. Happy

शेवटून दुसर्‍या फोटोत फुलामागे असलेल्या पानांचं मोझाईक भारी दिसतंय. तसंच वरून तिसर्‍या फोटोतली फुलामागची रंगसंगती आणि टेश्चरमधली विविधता फारच लोभस दिसतेय.

किती देखणी फुले आहेत..... ही कमळे नाहीत ???? मग खरे कमळ कसे असते, तुमच्याकडे आहेत का कमळाच्या प्रचि तर प्लिज शेयर करा.........

वर्षा, हे आहे कमळ (नेटवरून साभार)

कमळ आणि वॉटर लिलीतले काही फरकः

१. कमळाच्या मध्यभागी एक शंकूच्या आकाराचा भाग असतो यात कमळाच्या बिया तयार होतात. वॉटर लिलीत हा भाग नसतो.

२. कमळाच्या पाकळ्या वॉटर लिलीपेक्षा रुंद असतात.

३. कमळाचे फूल पाण्याच्या पातळीच्या बरेच वरती असते (साधारण दोन ते अडीच फूट) वॉटर लिलीचे फूल तितके उंचावर नसते. पण सगळ्यात सोपा फरक म्हणजे कमळाची पाने पाण्याच्या पातळीपेक्षा वरती असतात पण वॉटर लिलीची पाने मात्र पाण्यावर तरंगत असतात (पाण्याला लागूनच असतात)

धन्यवाद माधव , छान माहीती दिलीत , पण तुम्ही अपलोड केलेला कमळाचा फोटो दिसत नाही आहे............ पुन्हा अपलोड करता का प्लिज.............

धन्यवाद माधव , छान माहीती दिलीत , पण तुम्ही अपलोड केलेला कमळाचा फोटो दिसत नाही आहे............ पुन्हा अपलोड करता का प्लिज.............
>>>

हेच लिहायला आलेले
कुमुदाचे प्रचि मस्तच Happy

Pages