अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१३

Submitted by चंबू on 5 July, 2012 - 20:40

'अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१३' हे सिडनी येथे मार्च २०१३ मधे संपन्न होत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड मधील मराठी मंडळी मोठ्या संखेने एकत्र येतात. नवीन-जूना मित्रपरीवार, मनसोक्त गप्पाटप्पा, बहारदार सांस्कॄतीक कार्यक्रम यांची तर रेलचेल असतेच पण त्याबरोबर असते अस्सल मराठमोळं जेवण; आपल्या माबोच्या भाषेत 'खादाडी'!

हौसेनौसेनं मग तयारी चालू होते. बायकांची एकमेकांत फोनाफोनी होते, अन कपाटात जीन्सच्या गठ्याखालील नऊवारी गालात हसते. कुणाकडून नथेचा आकडा मागवला जातो तर कुणाकडून आंबाड्याची जाळी. पुरूषमंडळी झब्यासाठी कोल्हापूरी चपला वा मोजेडीचा बंदोबस्त करतात. पोट्यासोट्यांसाठी धोती वा परकर-पोलकं येतं आणि बघता बघता मनामनांत 'मराठी वारं' वाहू लागतं.

संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस थोरामोठ्यांसाठी भरगच्च कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहेत ज्यात चर्चासत्रे, साहित्य, संगीत, नाटक ई. चे सादरीकरण होईल. भारताबाहेर ज्या ज्या देशात अश्याप्रकारचे कार्यक्रम होतात तेथील आपले अनूभव व त्याबाबत चर्चा या धाग्यावर करू या. एखाद्या लक्षात राहीलेल्या कार्यक्रमाबद्दल येथे जरूर लिहा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संमेलन अगदी दणक्यात झाल. अगदी पदोपदि जाणवत होत हे सगळ कशासाठी तर फक्त आपल्या मराठी साठी....
दाद नि म्हणल्याप्रमाणे छोट्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमणातल्या सहभागासाठी खरच कौतिक वाटल आई-वाडिलांच ,एकही कार्यक्रम छोट्यांशिवाय झाला नाही.
चंबू त्रिवार अनूमोदान मागचे दोन महिने कसे आणि कुठे गेले काही कळल नाहीय. वीक डेज़ आणि वीक एण्ड यात फारसा फरक नसायचा फक्त वीक डेज़ मधे ऑफीस आणि वीक एण्ड ला प्रॅक्टीस Happy
मायबोली वर सतत वाचन चालू असत पण लिहण्याचा आळस करते मी पण स्ंमेलनाने ईतक काही दिलाय की थोडस तरी शब्दात मांडलच पाहिजे अस झाल

शनिवार संध्याकाळचा शेवट अभिमान गीताने झाला, भरून आल नाही असा एकही प्रेक्षक नव्हता...
या गण्यासाठी घेतलेली मेहनत मी पाहिली आहे. दाद आणि केदार चे live संगीत आणि मेधाताईचे गाण्यातले कष्ट. तो एक साठवणीतला अनुभव आहे.
आणि व्यक्तिश: माझ्या साठी आनंदाचा ठेवा, माझी दीड वर्षाची मुलगी सतत "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" गुनगुणते.
मातीची नाळ राहील की नाही याची शंका आज तरी माझ्या मनात राहिली नाहीय.

शेवगा, सॉरी गं. भेटायला आलीस... पण अवजारं गुंडाळून पुढच्यांना जागा मोकळी करून देण्याच्या फंदात तुझ्याशी काहीच बोलता आलं नाही.
किरण... लिही गं. तू छान लिहिशील वृत्तांत.
तुम्हा पति-पत्नींनं ते छोटं गोडुलं, घराचं शिफ्टिंग (काय मुहुर्तं काढतात ... कठीणै) सगळं संभाळत कित्ती कार्यक्रमांतून भाग घेतलात. मानलं तुम्हाला.

चंबूभाय, तुझ्या पिल्लाचा कधी नाच होता रे?... मी सगळं बघितलं पण... मी जाम चकलेय. इतकं काही झालय त्या दोन दिवसांत...
कोळीगीत म्हटलं की डोक्यात सुरुच होतय... टॅ टॅ टॅटॅटॅ... मी हाय कोली...
किरण, लिहायला घेच तू वृत्तांत.

अरे व्वा! मस्तच झालेल दिसतय सम्मेलने Happy काही आरणाने मला नाही येता आले त्याचे खुप वाईट वाटत्येय Sad

किरण आणि चंबू, तुम्ही दोघांनी प्लिजच सचित्र वृत्तांत टाका .. निदान तसे तरी सम्मेलन अनुभवायला मिळेल.

जमल्यास अभिमान गीताचा व्हिडिओ / ऑडिओ पण टाका.

"किरण... लिही गं. तू छान लिहिशील वृत्तांत ".... +१

किरण ... दादची फर्माईश.. आता लिहाच थोडंसतरी..

शेवगा.. कुठे होतीस.. आपली तर भेटच नाही...

दाद.. माझा एका गाण्यात ( मळ्याच्या मळ्यामंदी) छोटा रोल होता.
मुलीची छोटी विनोदी नाटीका बसवली होती, तेच ते सर ! (that is that sir!). बॉस आणि त्याची सेक्रेटरी मधला संवाद..

सहीच! सचित्र वृत्तांत येऊ द्या आता! Happy
फेसबुकवर काही लोकांचे फोटो बघितले. बरीच धमाल केलेली दिसतेय!

खरच कुणीतरी संमेलनाचा वृत्तांत टाका, आमच्या सारखे जे येऊ शकले नाही त्यांना पण आनंद घेता येइल.

अरेवा, संमेलन उत्तम रीत्या पार पडल्याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन.

दाद, तूच अजून थोडेसे लिही बघू. अजून कुणीतरी सविस्तर वृत्तांत आणि फोटो पण अवश्य द्या.

सॉरी गं. भेटायला आलीस... पण अवजारं गुंडाळून पुढच्यांना जागा मोकळी करून देण्याच्या फंदात तुझ्याशी काहीच बोलता आलं नाही. >>>>>>>>>> सॉरी कशाला ग ??? अग मी तुला बघितल नव्हंत ना कधी म्हणून मला अस वाटंल की तबला वाजवणारी तुच का ? म्हणून जरा जवळून बघायला आले Proud
आणि हो सागांयच राहीलच तु खरंच खुप छान तबला वाजवतेस.

शेवगा.. कुठे होतीस.. आपली तर भेटच नाही... >>>>> अरे होते मी पण जरा येऊन जाऊन होते.. माझ्या पिल्लामुळे Happy

खरच सगळ्यांच कौतुक करावं तेवढ कमी आहे, खुपच सुरेख झाला प्रोग्राम Happy

अयायी... चंब्या अरे कस्लं सुंदर बसवलं होतं ते नाटक. तुझी लेक होय ती सेक्रेटरी?... जीव घेतला तिनं अन तिच्या बॉस नं. सर्जेराव पाटलांचे चिरंजीव ना... बॉस?
कसला फ्लो होता त्या संवादांना.. आणि किती लिलया फेकत होती पोरं संवाद... भले.
माळ्याच्या मळ्यामंदी ची कोरिओग्राफी छान केली होती... अगदी कल्पक. आता तू त्यात कुठे नाचून गेलास आठवत नाहीये रे... डीव्हिडी आल्या की पुन्हा एकदा आवर्जून बघेन... मजा येईल.
किरण... झक्कास. आता वाट बघतोच आम्ही.

ती छोट्यांची नाटिका अगदी अगदी डोक्यावर घेतली सगळ्यांनी. काहीतरी थातुरमातुर इंग्रजी बोलता येणारी सेक्रेटरी... नटवी Happy
...सर तुम्ही मुळ्ळीच टॉयलेट करू नका (तिला टोलरेट म्हणायचय)....
...तेच ते सssssर
.... तुम्ही रागवू नका ना सssssर
... तुमची नुक्तीच प्लास्टिक सर्जरी झालीये ना... (तिला एन्जोप्लास्टी म्हणायचय)
...तेच ते सssssर

त्या बॉसला फक्तं वेड लागायचं बाकी ठेवते, ती बया. सगळ्यांनीच मस्तं काम केलं होतं. एकामागे एक रिअ‍ॅक्शनसारखे संवाद होते. इतक्या लहान मुलांनी ते इतक्या सहजपणे सादर करणं... केवळ अप्रतिम.

नाही गं लाजो! ख्रिसमसच्या वेळी गेलो होतो तेव्हां चंबु आनि फॅमिलीची भेट झाली होती त्या वेळच्या फोटोंबद्दल वर लिहीले आहे! Happy

ओके Happy

अत्ता लिंक वरचे फोटो पाहिले.... भारीच धम्माल केलेली दिसत्येय पब्लिक ने.

आता तुम्ही सगळ्यांनी काढलेले तुमचे, मुलांचे फोटो पाठवा Happy

Pages