देवकण - गॉड्स पार्टिकल

Submitted by बेफ़िकीर on 5 July, 2012 - 00:33

माणसाच्या दैनंदिन जीवनात तात्काळ फरक पडणार नसला तरी शास्त्रज्ञांच्या जगात उंच उंच उड्या माराव्याश्या वाटतील असे संशोधन पार पाडण्यात मानवाला यश मिळाले.

आज आपल्या शरीरात असलेले कॅल्शियम, पोटॅशियम , लोह व सर्वच्या सर्व घटक हे सूर्यापासून आलेले असून सूर्य हा केवळेक दुय्यम (उद्यानदीप - सेकंडरी - इतर तार्‍यांपासून झालेला) तारा आहे. सूर्यात हे घटक त्याच्या मूळ राक्षसी तार्‍यामधून आलेले आहेत. त्या तार्‍यात ते विश्वाच्या महास्फोटापासून. हा इतिहास चौदा ते वीस अब्ज वर्षे मागे मागे जात राहतो.

प्रश्न असा येतो की उर्जा (एनर्जी) असताना वस्तूमान (मॅटर ) कसे आले? या प्रशाचे तर्कशास्त्रीय दृष्ट्या योग्य उत्तर देण्याचे अनेक प्रयत झाले त्यातील हिग्ज यांची थिअरी सर्वमान्य होण्यात अडचणी आल्या नाहीत.

अनेक दशकांनी ही थिअरी प्रत्यक्षात कशी कार्यरत होईल याचे डेमो जीनिव्हात झाले आणि जल्लोष झाला.

यातून देवकणाचे अस्तित्व मान्य होईल इतपत पुरावे मिळाले.

निसर्गानेच मानवाला दिलेल्या बुद्धीतून मानवाने पार केलेले हे अफाट बौद्धिक विकासाचे टप्पे पाहून स्तिमित व्हायला होते.

उर्जा व वस्तूमान यांच्या अस्तित्वामागच्या अनेक जादूमय बाबी हळूहळू समजू लागतील. दृष्टिकोन पालटू लागतील. अधिक 'वेल इन्फॉर्म्ड' मानवजात यातून निर्माण होईल.

आम्हा सर्वसामान्यांना हे आधुनिक व अद्भुत जग प्रदान करणार्‍या शास्त्रज्ञांना नमन!

==========================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठे गेले कणाहीन अध्यात्मवादी ? पोपटपंची करायला जमते ,ईथे प्रतिवाद करायला फिरकणार देखील नाहीत

फिरकू नये!
दोन्ही शाखांनी आपापले सिद्धांत वेगळे ठेवावेत. नि आपापल्या क्षेत्रात प्रगति करावी.
दोन्ही शाखा अत्यंत भिन्न आहेत, कुठली गोष्ट बरोबर समजायची नि कुठली नाही याबद्दल दोन्ही क्षेत्रात निरनिराळे निकष! अध्यात्माचे निकष भौतिक शास्त्रात मान्य नाहीत
निदान भौतिक शास्त्रात मूलभूत, गणित इ. सिद्धांत असल्याने फर्मियॉनचे गणित वेगळे नि बोसॉनचे वेगळे हे मान्य करून प्रश्न सुटतो. उगाच फर्मियॉनचेच बरोबर नि बोसॉनचे नाही असा वाद घालण्याचा प्रश्नच नाही!

पण अध्यात्म नि भौतिक शास्त्र यांचे तसे नाही! त्यांचे मूलभूत सिद्धांत जर एकच असते तर तुलना करता आली असती, पण तसे नाही ना!

बेफिकीर, येऊ द्यात याचा अर्थ इथे कोणीतरी समजावून सांगा असाही होऊ शकतो.>>>

त्यांच्या आधीच्या पोस्ट्स, त्यातील टोन, या वरील (मी) कॉपी पेस्ट केलेल्या वाक्यातील टोन हा एकंदर 'प्रयोगात दम नाही आणि ते लोक आपल्याला यडे बनवत आहेत' असा आहे.

असो. तसे काही नसले तर माझा गैरसमज म्हणायचा.

प्रयोगाचे फाईंडिंग येऊद्यात. गृहीतकं काय होत्या, सिद्धता काय झाल्या, मेथड काय होती, हिग्ज बोसॉनचं अस्तित्व कसं कळालं, उपकरणं काय वापरली हे समजूद्यात.>>>>kiran...
प्रोटॉनची टक्कर घडवुन आणली गेली, काही प्रोटोन फेस टु फेस धडकले, प्रोटॉनला तयार करणारे हिग्ज कण काहि काळा पुरते अस्तित्वात आले. एक हिग्ज कण तत्काळ दोन फोटॉनमध्ये रुपांतरीत होतो.
हिग्ज जरी डिटेक्ट करता येत नसले ,तरी फोटॉन डिटेक्ट करतात येतात. प्रोटोन टकरीनंतर CMS डीटेक्टरने फोटोन डीटेक्ट केले आणि यातुनच हिग्जचे अस्तित्व सिद्ध झाले.
particle physicsमध्ये circumstancial evidenceला महत्व असते .पारंपारिक पद्धतीने मुलकण 'बघता' येत नाहीत.

ते हजारो संशोधक यडे आणि तुम्ही महान, बास?

बेफिकीर
एखादे वाक्यं समजून घेताना जडणघडणीचा खूप मोठा रोल असतो Wink

त्यांच्या आधीच्या पोस्ट्स, त्यातील टोन, या वरील (मी) कॉपी पेस्ट केलेल्या वाक्यातील टोन हा एकंदर 'प्रयोगात दम नाही आणि ते लोक आपल्याला यडे बनवत आहेत' असा आहे.

नो कमेंटस. प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार अर्थ लावण्यास मुखत्यार असतोच.

ग्रेटथिंकर थँक्स !

इथे जे प्रश्न विचारलेत असेच एकदा ऑर्कुटवर विचारले असतांना क्वांटम फिजिक्सच्या एका प्रोफेसरने खूप छान पद्धतीने समजावलं होतं. हा धागा अनेकजण वाचत असतील. त्यात या विषयावरचे तज्ञ असतील असा त्याचा अर्थ घ्यायचा असतो.

एखादा मुलभूत सिद्धांत जेव्हां मांडला जातो तेव्हां अर्थातच तो शंभर टक्के स्विकारला जात नाही. तो जेव्हां सिद्ध होतो तेव्हां आपोआपच विरोध मावळतो. बिग बँग थिअरीला विरोधक आहेत आणि ते ही सायंटिफिक कम्युनिटीचेच आहेत.

http://www.conservapedia.com/Big_Bang_theory#Scientific_Criticism

म्हणूनच समर्थकांनी चालवलेल्या या प्रयोगानंतर त्यांचीही प्रतिक्रिया मोलाची असणार आहे. जो प्रयोग सध्या चालू आहे तो माझ्यासारख्याच्या बुद्धीपलिकडचा आहे. हेग्ज बोसॉन कसा शोधतात, कुठल्या उपकरणावर शोधतात असे प्रश्न एक सामान्य मनुष्य म्हणून पडतात.

दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकावे असं मात्र पहिल्यापासून वाटतं. विरोधकांच्या म्हणण्यात तथ्य आहे किंवा कसं हे मला समजत नाही. हा विषय वरवर मांडण्यासारखा नाही असं वाटतं. आज तरी बिग बँग थिअरी निर्विवाद आहे असं मला वाटत नाही.

या पोस्टचा टोन कसा आहे यावरच्या कमेंटस फाट्यावर मारण्यात येतील. फक्त जाणून घेण्याची इच्छा आहे इतकंच...

सामान्य माणसाच्या बुद्धी पलीकडचा हा विषय आहे .पण त्याचे फायदे प्रचंड आहेत ,असे आयबीएन लोकमत वर समजले,,उदा. या प्रयोगामुळे इंटरनेट चा स्पीड वाढेल, nano-technology मध्ये उत्क्रांती कारक शोध लागतील ,तसेच अन्य काही महत्त्वाचे उपयोग होतील असे सांगितले होते .मला वाटते त्या शोधाचे फायदे काय आहेत ,हे अतिशय महत्त्वाचे असून इतर बाबी तितक्याशा महत्त्वाच्या नाहीत ...

जे लोक रेकी किंवा तत्सम साधना करतात ,ते लोक ईथर नावाच्या द्रव्याचा उल्लेख करतात .म्हणजे दैविक किंवा वैश्विक ईश्वरी शक्ती ही ईथर च्या माध्यमातून कार्य करते असे काहीसे ऐकल्याचे स्मरणात आहे .त्याचा या "देव-कणा "शी काही संबंध असू शकतो का? एक भाबडा प्रश्न .............................................

हिग्जचा मुख्य संबंध आहे स्टँडर्ड मॉडेलशी - यात असलेल्या लेप्टॉन्सना (वगैरे) हिग्जमुळे वस्तुमान मिळते. बिगबँगमधे उर्जेची आणि वस्तुमानहीन कणांची निर्मिती झाली. लगोलग हिग्ज फिल्डची निर्मिती झाली (ग्रॅव्हिटेशनल फिल्ड, इलेक्ट्रोमॅगनेटीक फिल्ड प्रमाणे हे सर्वत्र असते). वेगवेगळ्या कणांना हे फिल्ड कमी जास्त प्रमाणात जाणवते व त्यांना कमीजास्त वस्तुमान 'प्राप्त' होते. प्रत्येक फिल्डशी संलग्न एक कण असतो (बोसॉन प्रकारचा). एक प्रकारे हे कण म्हणजे त्या फिल्डची एक्साईटेड स्थिती असते. इथे आहे हिग्ज बोसॉन. यांना बनवायला खूप जास्त उर्जा लागणार होती (त्यांच्या वस्तुमानामुळे). म्हणून इतकी वर्षे वाट पहावी लागली. अर्थात हे कण सुद्धा विघटीत होतात. त्यांच्या डिके पार्टीकल्समुळेच त्यांचा सुगावा लागला. देवाचा आणि यांचा काहिही संबंध अर्थातच नाही.

आश्चिग
धन्यवाद या माहितीसाठी.

हिग्ज फिल्डची निर्मिती कशी झाली याची माहिती शक्य असल्यास इथं द्याल का ? ( लिंक दिली तरी चालेल )

> हिग्ज फिल्डची निर्मिती कशी झाली याची माहिती शक्य असल्यास इथं द्याल का ?
ही माहिती आपल्याला अजुन नाही. ती निर्मिती बिग बँग नंतरच झाली असेल असेही नाही (अ‍ॅज अ‍ॅन आफ्टरथॉट).
खरंतर बिग बँगचा तसे पाहता हिग्ज कणाशी काही संबंध नाही.

कालच्या डिस्कव्हरीने येवढेच सिद्ध झाले की हिग्ज फिल्डचे बेसीक एक्सायटेशन जिथे वाटत होते (स्टँडर्ड मॉडेलला) तिथे ते आहे. त्यामुळे स्टँडर्ड मॉडेल सिद्ध झाले हे जास्त बरोबर वाक्य असेल (पण पुर्णपणे बरोबर असेलच असे नाही - कारण एकच हिग्ज कण आहे की जास्त आहेत हेही अजुन नक्की नाही).

आशिष
पुन्हा एकदा धन्यवाद.. Happy

बिग बँगचा आणि हिग्ज बोसॉन कणांचा संबंध या प्रयोगाशी जोडण्यात येऊ नये हे थोडक्यात आणि चांगलं सांगितलंत. Happy

हिग्ज फिल्ड अस्तित्वात आहे, सगळीकडे आहे (तोच अर्थ फिल्ड या शब्दाचा असतो - सगळीकडे असणे). हिग्ज फिल्डची एक खासियत ही की त्याची किंमत (व्हॅल्यु) शुन्य नसते. हिग्ज बोसॉन पेक्षा हिग्ज फिल्ड हेच महत्वाचे आहे - फिल्ड म्हंटले की त्याचा बोसॉन असणारच. हिग्ज फिल्डच नसते तर कणांना वस्तुमान प्राप्त न होता अणु-रेणु, पृथ्वि, मानव काही बनलेच नसते. हे एकच फिल्ड आहे की असे अनेक आहेत ते आपल्याला अजुन माहीत नाही. ते कसे (आणि का) बनले ते ही माहीत नाही. पण एका वेळी एक एक पायरी.

याचा प्रॅक्टीकल उपयोग काही आहे का, तर नाही. आज तरी नाही. इंटरनेट वगैरेशी याचा मुळीच संबंध नाही.
पण या शोधामुळे वैज्ञानीक दृष्टीकोनाला पाठबळ मिळते. LHC मधे कोट्यावधी प्रोटॉन्सची टक्कर झाली की काही हिग्ज कण मिळतात. ते डिके होतांना जे इतर कण प्राप्त होतात त्यांच्यावर शास्त्रज्ञांचा डोळा होता. तेही सहजी शोधणे शक्य नाही कारण इतरही कण तयार होत होते, आणि त्यांच्यातील काही कणांचे डिके पार्टीकल्स पण हिग्ज कणांच्या डिके प्रॉडक्ट्सशी साधर्म्य असणारे असतात. या सर्वातून त्या कणांची सिग्नेचर शोधणे महा कठीण होते. पुढील २-४ वर्षात अजुनही चमत्कृतीपुर्ण कण मिळु शकतील. उदा. अजुनही काही थोडे वेगळे हिग्ज कण आहेत का ते समजेल.

हिग्ज फिल्डची निर्मिती कशी झाली याची माहिती शक्य असल्यास इथं द्याल का ?>>>>>kiran...
हिग्ज फिल्ड म्हणजे काहितरी 'stuff' आहे, ही कल्पना डोक्यातुन काढुन टाका. हिग्ज फिल्ड हे quantum wave function आहे, ते तरंगस्वरुपात आहे आणि EM radiation सारखे मेडीयम शिवाय अस्तित्वात आहे.e.g. आवाजाची पातळी आपण मोजु शकतो ,ध्वनीतरंगातुन उर्जेचे वहन होत असते .ध्वनी हा काही 'stuff' नाही, तो effect आहे.अगदि तसचं हिग्जफिल्डचे आहे ,फक्त ते माध्यमाशिवाय अस्तित्वात आहे. quantum लेव्हलचा विचार करताना, matter itself is not materialistic असा प्रवाद आहे.संपुर्ण विश्व तरंगस्वरुप असुन ,ते प्रोबॅबलिस्टीक आहे. पुंजसिद्धांतात काहिच ABSOLUTE नाही अगदी काळ (time)सुद्धा.
source-'ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम' या पुस्तकातुन समजले तेवढे.

मटा मधे दिलेली सोप्पी माहीती :-
.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ ज्याच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा ध्यास माणसाने घेतला होता , त्या ' हिग्ज बोसन ' या कणांच्या अस्तित्वावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. सुमारे १४ अब्ज वर्षांपूर्वी एका महास्फोटातून या विश्वाचा जन्म झाला. आपल्या पृथ्वीचा जन्म त्यानंतरचा , म्हणजे आजपासून सुमारे ४६० कोटी वर्षांपूर्वीचा. अर्थात ते वर्ष नक्की करण्यासाठी १९५०चे दशक उजाडावे लागले होते. त्यानंतर ही पृथ्वी चैतन्यशील होऊन तिथे जीवसृष्टी अवतरण्यासही दीर्घकाळ जावा लागला. सुरुवातीला पाण्यामधून अगदीच प्राथमिक स्वरूपाची जीवसृष्टी आकार घेऊ लागली आणि नंतर याच जीवसृष्टीने पृथ्वीला बहुविधा बनविली. माणसाचा जन्म हा त्यामानाने अलीकडचा. परंतु त्याच माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःच्या अस्त्वित्वाचा जसा शोध घेणे सुरू केले , तसेच हे विश्व नेमके कसे आकाराला आले असावे , याचाही धांडोळा तो घेऊ लागला. आता लागलेला ' हिग्ज बोसन ' कणांचा शोध हा त्यातलाच एक महत्त्वाचा टप्पा आहे.

अशा कणांच्या अस्तित्वाची चाहूल १९६०च्या दशकामध्ये किबल , गुरलनिक , हेगन , एनग्लर्ट , ब्राऊट आणि हिग्ज या सहा शास्त्रज्ञांना लागली होती. परंतु त्यावेळी ती सैद्धांतिक पातळीवर होती. मात्र सैद्धांतिक पातळीवर ज्यांचे अस्तित्व जाणवते आहे , ते प्रत्यक्षात असायला पाहिजेत , या विचाराने त्यांचा शोध घेणे सुरूच राहिले. एकविसाव्या शतकामध्ये या प्रयत्नांना अधिक जोरदारपणे सुरुवात झाली. २००८ सालामध्ये ' सर्न ' ( युरोपीयन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च) या संस्थेने त्याबाबतचा एक प्रयोग सुरू केला. या प्रयोगाची कल्पना सुचली , ती १९८०च्या दशकामध्ये. १९९४ सालामध्ये सर्न या संस्थेने त्यासाठी प्रत्यक्ष काम करण्याची परवानगी दिली. त्यानुसार २७ किमी लांबीचा एक लांबच लांब मार्ग जमिनीखाली खोदण्यात आला. सुमारे ८५ देशांतील सात हजार शास्त्रज्ञ या प्रयोगात सहभागी झाले. अब्जावधी डॉलर या प्रयोगासाठी खर्च करण्यात आले. या लांबच लांब निर्वात पोकळीमध्ये प्रोटान्स कणांचे झोत सोडण्यात आले. प्रोटॉन्स म्हणजे हायड्रोजन अणूच्या धन विद्युतभारित केंद्रक. या केंद्रकाला प्रोटॉन्स हे नाव अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी दिले. तर प्रोटॉन्स कणांचे हे झोत चार वेगवेगळ्या ठिकाणांहून येऊन परस्परांवर आदळतील आणि महास्फोटाच्या वेळी होती , तशी स्थिती आपल्याला ' पाहता ' येईल , अशी शास्त्रज्ञांची अटकळ होती. महास्फोट झाल्यानंतर निर्माण झालेल्या कणांना वस्तुमान नव्हते. त्यामुळे ते प्रकाशाच्या वेगाने इतस्ततः भरकटत होते. परंतु महास्फोटानंतरच्या काही निमिषांतच आज ज्यांना आपण ' हिग्ज ' कण म्हणत आहोत , ते अवतरले आणि सर्वच कणांना वस्तुमान बहाल केले. त्यामुळे त्यांचे सैराटपणे भटकणे बंद झाले. संपूर्ण विश्वाला एक ' आकार ' प्राप्त झाला. त्यांना ' देवकण ' म्हणणे म्हणूनच सार्थ आहे.

आज आपण ज्या गोष्टी पाहू शकतो , त्या एकंदर विश्वाच्या चारच टक्के आहेत. उर्वरित ९६ टक्के भाग हा कृष्णपदार्थ किंवा कृष्णऊर्जा आहे. सर्नने हाती घेतलेल्या प्रयोगातून या कृष्णपदार्थांचा अभ्यास करता येऊ शकणार आहे. अर्थात ती पुढची गोष्ट आहे. आज मात्र गेली चार दशकांहून ज्याच्या शोधाचा ध्यास घेतला होता , त्याच्या पाऊलखुणा दृष्टिपथात आल्या आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजूनही शास्त्रज्ञांच्या मनात आपण ज्यांना हिग्ज कण म्हणतो , ते खरोखरच हिग्ज कणच आहेत काय याबाबत काहीसा संभ्रम आहे. त्याचे ठाम उत्तर देण्यासाठी काही काळ जावा लागेल. मात्र ज्यांनी या कणांच्या अस्तित्वाबाबत भाकित केले होते , ते हिग्ज याबाबत ठाम आहेत. आपण सैद्धांतिक पातळीवर मांडलेल्या प्रमेयाची सिद्धता झाल्याचे समाधान त्यांना मिळाले आहे. अर्थात हे यश त्यांचे एकट्याचे नाही ; तर सामूहिक आहे. या प्रयोगासाठी ज्यांनी चिकाटीने प्रयत्न केले , त्या सर्वांचे आहेच ; परंतु एका अर्थाने हा समस्त माणसाच्या प्रज्ञेचा , अथक शोध घेण्याच्या ध्यासाचा , कल्पकतेचा , प्रतिभेचा विजय आहे. अशा शोधांतूनच विज्ञान पुढे जात राहिले आहे. या नव्या शोधामुळे भौतिकशास्त्रालाच एक नवा आयाम प्राप्त होणार आहे. विज्ञान अधिक पुढे झेपावणार आहे आणि आज आपल्याला अनुत्तरित असणाऱ्या किंवा कोड्यात टाकणाऱ्या प्रश्नांची उकल करण्याची संधी मिळवून देणार आहे. माणसाच्या प्रज्ञेस मिळालेले हे यश म्हणूनच अनमोल आहे

आशिष, ग्रेटथिंकर आणि मटाच्या लिखाणातून उत्तम माहिती मिळाली. काही नवीन गोष्टी समजल्या.
धन्यवाद !
सर्नच्या शास्त्रज्ञांना सलाम. मानवी वंशाला ही आणि अशीच लोक खर्‍या अर्थाने 'पुढे' नेतात असे म्हणावेसे वाटते.

-------------------

मिडीआने निर्माण आणि प्रचार केलेल्या 'गॉड पार्टिकल' या शब्दांमुळे भारतासारख्या देशात नेटवर आणि इतर माध्यमांतही सध्या धमाल होते आहे. आस्तिक आणि नास्तिक दोघांनाही या कणांमुळे आपली बाजू बळकट झाल्यासारखे वाटते आहे, हे विशेष ! Happy

उदयन

बिग बँगचा आणि हिग्ज बोसॉनचा संबंध मेडीया लावतो आहे त्यांना तो तसा लावू द्यावा. इथे आश्चिग काय म्हणतो आहे ते समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूयात. हिग्ज बोसॉन चं अस्तित्त्व सिद्ध झालं आहे असं म्हटलं गेलं असलं तरी तो त्याच्याशी मिळताजुळता कण आहे का हे स्पष्ट व्हायचंय असं इथं म्हटलं गेलंय. या कणांचं अस्तित्व सिद्ध झालं तरी त्यावरून बिग बँग च्या प्रयोगाला बळकटी कशी मिळते, मिळते कि नाही.... हे जाणून घ्यायला उत्सुक आहेच. पण आश्चिगच्या पोस्ट पाहिल्या तर असा संबंध सिद्ध होईलच असं नाही असं दिसतंय.

काही असो "देवकण" हा अत्यंत सुंदर शब्द सापडला बुवा मला तर .....!!
आता देवसराना सांगून एखाद्या डिक्शनरीत घालून टाकायला हवा म्हणजे गझलेत वापरता येईल ना मला ...........!!:D

वजन नाही हो झक्की साहेब...गझलेत देवपण येईल.....देवपण ह्या शब्दात श्लेष लपलाय. Wink

किरण ....
ही फक्त अजुन ही शक्यताच आहे... कारण कुणालाही माहीती नाही आहे की जे मीटरवर आलेले आहे ते नेमके काय आहे..अजुन मुख्यशोध चालुच असल्याने..या वर अजुन संशोधन चालु झाले नसेल..काही दिवसांनी यावर संशोधन केल्यावर मग कळेल हे नेमके काय निर्माण झाले आहे..प्रोटोन ची टक्कर झाल्यावर नक्कीच काही ना काही तरी बाहेर पडणारच आहे.. मुळात काही तरी ठोस वस्तुमान असायलाच हवे.त्याशिवाय कण निर्माण होने शक्यच नाही आहे..यावरच जर प्रकाश टाकला गेला..तर काही .कळु शकेल..
.
.
आश्चिग.. कृपया सोप्प्या भाषेत समजावुन सांगाल का ??

हिग्ज बोसॉन नक्कीच सापडला आहे, पण तो 'द हिग्ज बोसॉन' आहे का ते नक्की नाही.
'द हिग्ज बोसॉन' हा 'द स्टँडर्ड मॉडेल' नी दावा केलेला कण.
डिके चॅनल्सच्या नॉन-युनिफॉर्मिटी व हेवी बॉसॉन्सच्या थोड्याफार विचीत्र वागणुकीमुळे शंकेला वाव आहे.

विश्वाच्या उत्पत्तीचा आणि या मॉडेल्सचा तसा काही संबंध नाही.

अजुन माहिती हवी असेल तर बरेच खोलात शिरावे लागेल. विकीवर बरीच माहिती टाकल्या जाते आहे.
खालील काही शब्द शोधल्यास जास्त कल्पना येईलः
standard model
theory of everything
grand unified theory
supersymmetry

गम्मत म्हणून हे ही पहा:
http://en.wikipedia.org/wiki/Technicolor_(physics)
http://en.wikipedia.org/wiki/Little_Higgs

हिग्ज फिल्ड अस्तित्वात आहे, सगळीकडे आहे

पण अमेरिकेत खूप जास्त प्रमाणात आहे, म्हणून इथे कमालीच्या बाहेर जाडे लोक दिसतात! Proud

गझलेत देवपण येईल..
हे हिग्ज बोसॉन वाले बरेचसे लोक देव बीव मानत नाहीत, वजन मात्र मानतात, तेंव्हा वजन नक्कीच येईल, देव ऑप्शनला.

Pages