देवकण - गॉड्स पार्टिकल

Submitted by बेफ़िकीर on 5 July, 2012 - 00:33

माणसाच्या दैनंदिन जीवनात तात्काळ फरक पडणार नसला तरी शास्त्रज्ञांच्या जगात उंच उंच उड्या माराव्याश्या वाटतील असे संशोधन पार पाडण्यात मानवाला यश मिळाले.

आज आपल्या शरीरात असलेले कॅल्शियम, पोटॅशियम , लोह व सर्वच्या सर्व घटक हे सूर्यापासून आलेले असून सूर्य हा केवळेक दुय्यम (उद्यानदीप - सेकंडरी - इतर तार्‍यांपासून झालेला) तारा आहे. सूर्यात हे घटक त्याच्या मूळ राक्षसी तार्‍यामधून आलेले आहेत. त्या तार्‍यात ते विश्वाच्या महास्फोटापासून. हा इतिहास चौदा ते वीस अब्ज वर्षे मागे मागे जात राहतो.

प्रश्न असा येतो की उर्जा (एनर्जी) असताना वस्तूमान (मॅटर ) कसे आले? या प्रशाचे तर्कशास्त्रीय दृष्ट्या योग्य उत्तर देण्याचे अनेक प्रयत झाले त्यातील हिग्ज यांची थिअरी सर्वमान्य होण्यात अडचणी आल्या नाहीत.

अनेक दशकांनी ही थिअरी प्रत्यक्षात कशी कार्यरत होईल याचे डेमो जीनिव्हात झाले आणि जल्लोष झाला.

यातून देवकणाचे अस्तित्व मान्य होईल इतपत पुरावे मिळाले.

निसर्गानेच मानवाला दिलेल्या बुद्धीतून मानवाने पार केलेले हे अफाट बौद्धिक विकासाचे टप्पे पाहून स्तिमित व्हायला होते.

उर्जा व वस्तूमान यांच्या अस्तित्वामागच्या अनेक जादूमय बाबी हळूहळू समजू लागतील. दृष्टिकोन पालटू लागतील. अधिक 'वेल इन्फॉर्म्ड' मानवजात यातून निर्माण होईल.

आम्हा सर्वसामान्यांना हे आधुनिक व अद्भुत जग प्रदान करणार्‍या शास्त्रज्ञांना नमन!

==========================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे शास्त्रज्ञ देवाचे अस्तित्व नाकारत होते. त्यांनी केलेल्या संशोधानातुन त्यांनाच गवसलेले नवे दालन शेवटी दैवी शक्ति आहे हे आता शास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे.
संबंधीतांचे अभिनंदन !

त्यांनी केलेल्या संशोधानातुन त्यांनाच गवसलेले नवे दालन शेवटी दैवी शक्ति आहे हे आता शास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे. >>> असं कुठे म्हटलंय?? Uhoh

शास्त्रज्ञ देवाचे अस्तित्व नाकारत नाहीत मुक्तेश्वर, खरे तर ते त्या अस्तित्वाचा शोध तर्काधिष्ठित शैलीने घ्यायचा प्रयत्न करत असतात Happy

हे सगळे चालु होते ते विश्व कसे निर्माण झाले याचा शोध घेण्यासाठी..
आधी असे समजुन चालत होते की रेणु हे मुलतत्वे आहेत... त्यांनंतर अणु चा शोध लागला..मग त्याला विघटन करण्यात यश आले ..त्यातुन प्रोटॉन आणि इलेक्ट्रोन कळाले........परंतु समस्या एक अशी होती की हे सगळे कण स्व निर्मित तर नव्हते. हे कण कुठुन निर्माण होतात ते माहीत होत नव्हते..उदा. मुल जन्माला आले पण त्यामुलाला जन्म कुणी दिला ....असे कोणते घटक होते ज्यात ती प्रजनन शक्ती होती...ते या हिग्ज बॉसन कणांमधे गुणधर्म दिसुन आलेत.. हे कण आपल्यामधुनच अजुन कणांची निर्मिती करत होते.. म्हणजे एक समान सृष्टी निर्माण करत होते...त्यामुळे त्यांना गॉड प्रोटोकॉल म्हणु लागले...

शास्त्रज्ञ देवाचे अस्तित्व नाकारत नाहीत मुक्तेश्वर, खरे तर ते त्या अस्तित्वाचा शोध तर्काधिष्ठित शैलीने घ्यायचा प्रयत्न करत असतात>> मान्य आहे. परंतु बर्‍याच शास्त्रज्ञांनी दैवी शक्ति असते असे नाकारले आहे.

सगळं डोक्याच्या बाहेरचं आहे. प्रयोग काय आहे ? टेस्ट सेट अप कशा प्रकारचा आहे ? कॅपॅसिटी काय ? प्रयोग नेमका कसा केला गेला हे कळतच नाहीये. एकदम अनभिज्ञ आहे याबद्दल. कुणी माहिती दिली तर बरंच होईल.

रच्याकए

देवकण नावाचा कुठलाही प्रकार नसावा असं वृत्तपत्रातल्या बातम्यांवरून कळालं. Goddamn Particles बद्दलचा सिद्धांत प्रकाशित होताना संपादकाने त्याचं बारसं गॉड्स पार्टिकल्स असं केलं आणि तो शब्द पॉप्युलर झाला असं दिसतंय. वैज्ञानिक जगताने हा शब्द मिसलीडिंग असल्याचं म्हटलंय.

http://www.huffingtonpost.com/tony-phillips/theres-no-god-damn-partic_b_...

बिग बँग थिअरीचे प्रोटोटाईप केले गेले. हे जमीनीखाली करण्यात आले. त्यामध्ये प्रकाशाच्या वेगाच्या ९९.९९९९ वगैरे टक्के वेगाने प्रोटॉन्स एका बोगद्यातून चलित करून धडकवण्यात आले. ते धडकवण्यात आल्यावर देवकणांचे अस्तित्व अल्पकाळ सदृश झाले व त्याच्या स्वतःच्या गुणधर्मानुसार ते अल्पकाळच टिकून नष्ट होत गेले.

हे सर्व म्हणजे फसवेगिरी नकीच नाही.

माणसासमोरचा प्रश्न हा होता की अणूचे विभाजन प्रोटॉन, न्युट्रॉन व इलेक्ट्रॉनमध्य होते हे ठीक , पण या तिघांचे विभाज कशात होते? ते कसे निर्माण होतात?

प्रकाशाच्या वेगाइतका वेग अ‍ॅचिव्ह करून ही मानवनिर्मीत धडक झाल्याशिवाय हे कोडे उलगडलेच नसते

Happy

बिग बँग थिअरीला देखील विरोधक आहेत पण सध्या ते शांत आहेत. कारण त्यांची अशी थिअरी नाही.
बिग बँग थिअरीच्या आधी काय होते ? हा प्रश्न मात्र कुणालाच आवडत नाही.
( फसवेगिरी आहे असं कुणी म्हणत नाही. हे सगळं एकदा डिट्टेलमधे वाचावं लागेल )

बेफी मुख्य प्रश्न असाही होता की वस्तुमान कसे मिळते त्यांना कारण उर्जेला वस्तुमान नसते...... उर्जेचे वजन नसते.....फक्त वेग असतो... ब्रम्हांड निर्माण होण्यासाठी वस्तुमान ची गरज होती...जी उर्जेचे कण अणु मधे कसे येते...कारण अणु चे विघटन केल्यावर प्रोटोनच मिळते...आणि प्रचंड उर्जा..... प्रोटोन मधे विघटन केल्यावर सुध्दा उर्जाच निर्माण होत होती...परंतु जसे अणु मधुन वस्तुमान असणारे प्रोटोन चे अस्तित्व सापडले तसे काहीच सापडत नव्हते.. म्हणुन या शोधाला महत्व मिळाले आहे Happy

धयवाद उदयन, या माहितीसाठी Happy

किरण- बिग बँगच्या आधी काय होते हा प्रश्न बहुधा 'आवडत नाही' असे नसेल, तर तितकी बुद्धीची पहूंच नसावी. जेमतेम बिग बँग ही थिअरी मांडणे इतपत मानवी बुद्धीचा विकास झालेला असावा Happy

मुक्तेश्वर कुळकर्णी | 5 July, 2012 - 00:44 नवीन
जे शास्त्रज्ञ देवाचे अस्तित्व नाकारत होते. त्यांनी केलेल्या संशोधानातुन त्यांनाच गवसलेले नवे दालन शेवटी दैवी शक्ति आहे हे आता शास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे.
संबंधीतांचे अभिनंदन !>>>>> झ्यॅक, लई भारी बोल्लात राव तुमी, देवाबिगर हाय कोण....
आम्च्या देशामधी लई आधीच आमच्या दाढीवाल्या साधुबाबांनी ब्रम्ह हुडकुन काढलं व्हतं.
ती गोरी बेणी यडीच हायती ,काय बी करत्यात. हिकडं आली असती तर कव्हाच त्यांना द्येवकण घावला असता Proud

डॅन ब्राऊनच्या "एंजल्स अ‍ॅण्ड डेव्हिल्स" या कादंबरीत अगदी अशाच प्रयोगाचे वर्णन आहे. त्याही प्रयोगात हे "देवकण्"सापडतात असा उल्लेख आहे.

भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस आणि ब्रिटीश शास्त्रज्ञ पीटर हिग्स यांच्या नावावरून या "हिग्स बोसोन" कण (देव कण) असे नाव देण्यात आले ..

सविस्तर वृत्त इथे उपलब्ध ..

http://www.thehindu.com/sci-tech/science/article3602468.ece

मास्तुरे | 5 July, 2012 - 03:36
डॅन ब्राऊनच्या "एंजल्स अ‍ॅण्ड डेव्हिल्स" या कादंबरीत अगदी अशाच प्रयोगाचे वर्णन आहे. त्याही प्रयोगात हे"देवकण्"सापडतात असा उल्लेख आहे.
>>>>>डॅन ब्राऊनच्या कादंबरीचे नाव एंजल्स अ‍ॅण्ड डीमन्स आहे .मास्तुरे, तुमची माहीती नेहमी अर्धवट असते.

वरच्या हिंदूच्या लेखात खालील वाक्य आहे ते फारसं बरोबर नाही.
>> It is Bose after whom the sub-atomic particle boson is named.
बोझॉन नावाचा कण नाही तर बोझॉन हे कणांचे वर्गीकरण आहे. सर्व कणांचे संख्याशास्त्रानुसार (क्वांटम स्टॅटिस्टिक्स) फर्मिऑन्स व बोझॉन्स असे वर्गीकरण होते. फर्मिऑन्स म्हणजे ज्यांचा स्पिन क्वांटम नंबर १/२, ३/२ इ. आहेत असे कण.. यात इलेक्ट्रॉन हा एक मूलभूत कण आहे. ज्यांचा स्पिन क्वांटम नंबर ०, १ इ. असे आहेत ते बोझॉन. प्रकाशाचा कण फोटॉन किंवा मेझॉन हे बोझॉन आहेत.

सर्व फर्मिऑन्स फर्मी आणि डिरॅक यांच्या स्टॅटिस्टिक्स प्रमाणे वागतात तर आईन्स्टाईन आणि बोस यांच्या स्टॅटिस्टिक्स प्रमाणे बोझॉन्स!

'देवकण' नावामुळे दैवीशक्ती वर (अंध)विश्वास असणारे लोकं आधिकाधिक स्तोम वाजवणारेत अशी भीती (माझ्यासारख्या) atheist लोकांना वाटतेय.. नेट वर पाहिलं कोणीतरी सो कॉल्ड साधू खूश होऊन म्हणत होता ,कि शेवटी परदेशी लोकांनाही देवाचे अस्तित्व मान्य झालंय Uhoh
उदयन्,किरण, बेफी... माहितीसाठी धन्यवाद!!

देवकण.............................................
.
.
इथे देवाचे अस्तित्व वगैरे मान्य अमान्य वगैरे काहीच नाही आहे...त्यांना देवकण यासाठी म्हणाले आहेत..ते स्वयंनिर्मित आहेत..ते निर्माण करणारे आहेत..म्हणुन हे नाव दिले गेले... असे समजण्यात येते की देवांनी आपल्याला निर्माण केलेले आहे.. म्हणुन हे देवकण........
.
.
.बस इतकेच काय ते देवाचे नाव वापरले गेले आहे........................... Happy

@उदयन..वरती किरण ने सांगितल्याप्रमाणे,'देवकण नावाचा कुठलाही प्रकार नसावा असं वृत्तपत्रातल्या बातम्यांवरून कळालं. Goddamn Particles बद्दलचा सिद्धांत प्रकाशित होताना संपादकाने त्याचं बारसं गॉड्स पार्टिकल्स असं केलं आणि तो शब्द पॉप्युलर झाला असं दिसतंय. वैज्ञानिक जगताने हा शब्द मिसलीडिंग असल्याचं म्हटलंय." हे जास्त पटलं..(मला!!)

त्या कणांच्या शीर्षकामुळे अस्तिक नास्तिक चर्चा इग्नाईट व्हावी असे कल्पनेत नव्हते.

शंकर नाव असलेला माणूस साप बाळगत नाही तसेच या पार्टिकल्सना आपण नुसते देवकण म्हणायला हरकत नसावी Happy

हा शोध लागला हे महान आहे इतके मला तरी नक्की समजले

Goddamn Uhoh

हे नविनच वाचले. संदर्भ द्याल का?>>>

हेच नवीन वाचलेत? मग बाकी काय वाचले आहेत ते लक्षात आले नाही. Happy

हाच तर शोध लागला.

Happy

माधव...............मी वर लिंक दिलेल्या आहे............त्याचप्रमाणे महाराष्ट्रटाईम्स च्या साईट वर सुध्दा वाचता येईल...........
.
.
.
.आणि जे काही तुम्ही वाचले त्याचाच शोध लावला गेलेला आहे नव्याने. Happy माहीती असलेली माहीतीचा नव्याने शोध नाही लावु शकत ....;)

उदयनच्याच ११:११ च्या पोस्टमधे जी माहिती आहे ती वाचली होती, बीग बँगनंतर काही निमिषार्धातच हे कण बनले आणि नंतर ह्या कणांपासून इतर कण बनले हे वाचले होते.

पण हे कण सर्वप्रथम बनले किंवा ते अविभाज्य आहेत हे नव्हते वाचले.

अजुन हे माहीती नाही झाले आहे की ते अविभाज्य आहेत की नाही........फक्त अस्तित्व आणि माहीती मिळाली मुख्यतः त्यांना वस्तुमान आहे हे नव्याने कळाले...कित्येक काळ आपण रेणु अविभाज्य आहे हेच मानत आलेलो नंतर अणु........ म्हणुन अविभाज्य म्हणु शकत नाहीत...अजुन पर्यंत तरी....:)

Pages