Switzerland - माझ्या कल्पनेतील स्वर्ग

Submitted by यशस्विनी on 1 July, 2012 - 23:31

गेल्या महिन्यात युरोप टुरवर गेले होते , त्यातील Switzerland म्हणजे मनात बाळगलेली एक सुंदर इच्छा ....... ही स्वप्नमयी दुनिया बघताना खुप आनंद मिळाला....... अंत्यत देखणे निसर्ग सौंदर्य न्याहळताना मिळालेली प्रसन्नता अजुनही मनात तशीच आहे .......

हा खालील फोटो पॅरीस ते Switzerland असा प्रवास करताना गाडीतुन घेतला, हा फोटो बघताना खरोखर एखादे चित्र आहे असेच वाटते........

1V.jpg

प्रवासात टी-ब्रेकच्यावेळी एका दुकानासमोरील टेबलजवळ घुटमळणारा हा नाजुकसा पक्षी........

2V.jpg

DDLJ चित्रपटाची आठवन करुन देणारा हा फोटो........

3V.jpg

आम्ही ज्या होटेलमध्ये राहीलो होतो , त्याच्यासमोरील ही शांत आणि निवांत जागा.........

4V.jpg

खालील फोटो हे प्रवासादरम्यान गाडीत बसुन काढले.........जसे जमतील तसे , त्यामुळे काही फोटोंमध्ये गाडीच्या काचेचे प्रतिबिंब दिसत आहे..........

5V.jpg6V.jpg7V.jpg8V.jpg9V.jpg

माउंट तितलिस पर्वतरांगामधील बर्फात स्केटिंगची मजा लुटणारया या काही व्यक्ती.......

10V.jpg11V.jpg

माउंट तितलिस पर्वतांच्या सर्वात वरच्या भागातुन घेतलेले हे काही फोटो.........

12V.jpg13V.jpg

Switzerland च्या रस्त्यावरुन धावणारी ही छोटी ट्राम गाडी...........

14V.jpg

The Lion Monument in Lucerne, Switzerland.............
Th​e sculpture of a mortally-wounded Lion as "the most mournful and moving piece of stone in the world." It commemorates the Swiss Guards who were massacred in 1792 during the French Revolution..............

15V.jpg

आवडीने घेतलेल्या या स्विस बेल - झाली का पुन्हा DDLJ ची आठवन........

16V.jpg

Switzerland मध्ये पहिल्या दिवशी वातावरण अंत्यत स्वच्छ व सुर्यप्रकाशाने युक्त असे उबदार होते तर दुसर्या दिवशी बर्फाचा पाउसदेखिल बघायला मिळाला....... नाही नाही खालील फोटो हा black-white नाही आहे, बर्फ पडल्यामुळे सगळीकडे फक्त काळ्या-पांढरया रंगाचीच उधळण झाली होती

17V.jpg

हिरव्यागार कुरणात निवांत रवंथ करणारया या गाई, यांच्या दुधापासुन बनविलेले अंत्यत अप्रतिम दर्जाचे चोकोलेटस म्हणजे Switzerland ची मोठी खासियत.............

18V.jpg19V.jpg20V.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

 

अरे हो , फोटो खुपच लहान वाटत आहेत, मला वाटले कि प्रोफाइल फोटो सारखे यालादेखिल साइजचे बंधन असेल म्हणुन मी फोटोची साइज लहान केली तर हे खुपच लहान झाले, मी पुन्हा टाकते मोठे करुन...... जास्तीत जास्त किती फोटो आपण अपलोड करु शकतो व किती साइजचे ?

मस्त फोटो. मोठे पाहायला आवडतील. तसेच तेथील ट्रेन्सचे ही असतील तर.

त्या सिंहाचा फोटो बघून 'केसरी' मधे कायम वाचलेली ती संस्कृत वाक्ये आठवली.

छान...
गेल्या महिन्यात युरोप टुरवर गेले होते >> हाम्म !! आपण एकत्र फिरत तर नव्हतो ना ? Happy
१७ ते २० मे ला आम्ही होतो स्विसमधे.

लुझर्नमधल्या त्या मेलेल्या सिंहाचा फोटो नाही काढवला माझ्याच्याने. Sad

दुसर्‍या फोटोतला पक्षी छान टिपलाय. गेले वर्षभर मी बघतोय याला. ऑफिसमधुन रोज दिसतो. फोटो काढायला नाही जमलं.

मनःपुर्वक धन्यवाद वरील प्रतिकियांना व दिलेल्या लिंक्स्ना ............ Happy

@ चारुदत्त

रुमाल ????

@ आबासाहेब , मोनालीपि , मामी , शापित गंधर्व

फोटो मोठे केले आहेत व जमले तसे थोडेफार वर्णन देखिल केले आहे.......

@ मीत्_डिपी

तुला देखिल लवकरच तुझ्या "Dream Destination" ला जायचा योग जुळुन येउ दे Happy

@ ग्रेट थिंकर

नक्किच अॅंगलचा विचार करेन, यातील बहुतेक फोटो हे धावत्या गाडीत बसुन पटापट क्लिक केले आहेत, कारण सभोवताली बघण्यासारखे इतके काही होते की, काय बघु अन काय नको असे झाले होते Happy

@ लक्ष्मिकांत धुळे

नाही हो, स्विस भेटिच्या माझ्या तारखा दुसरया आहेत ......

.

@ मी वर्षा

अहो रूमाल टाकला म्हणजे --> चांगल्या धाग्यावर पहिला नंबर (१ला प्रतिसाद)
आणी दुसरे म्हणजे धागा वर येतो आणि परत एकदा निट, पोट्भर (या धाग्याविषयी - डोळेभर) बघायचे असते ते लक्शात रहाते . .

वर्षा

मायबोलीवर स्वागत. सर्व प्रचि सुंदर आलेली आहेत.
( स्वित्झर्लंडमधे शाकाहारी जेवणाची सोय आहे का ? परदेशात हाल होतात Sad )

धन्यवाद किरण, मी ज्या टुरिस्ट कंपनीतर्फे गेले होते त्यांनीच सर्व जेवणाखाण्याची उत्तम व्यवस्था ठेवली होती. मी स्वत: पुर्ण शाकाहारी आहे आणि प्रवासादरम्यान मला सर्व ठिकाणी शाकाहारी जेवण मिळाले, माझ्या बरोबर इतर काही जैन कुंटुबे होती त्यांनाही हवे तसे विना कांदा-लसणीचे शाकाहारी जेवण मिळाले. फक्त ज्यांना आपल्या भारतीय पद्धतीचा उकळुन दुध घालुन केलेला चहा आवडतो त्यांना तेथील गरम पाण्यात डीप केलेली चहापत्ती,स्किम मिल्क व साखर घालुन केलेला चहा आवडत नाही. परंतु त्यासाठी देखिल आमच्या टुरिस्ट कंपनीने आम्हाला मुंबई विमानतळावर निघण्याअगोदर पाणी गरम करायची इलेक्ट्रिक किटली व भारतीय चहाच्या चवीची इन्स्टंट करता येतील अश्या पावडरीची छोटी छोटी पॅकेट्स दिली होती. मी देखील खुप सारी गिरणार चहाची वेगवेगळ्या चवीची इन्स्टंट मिक्स घेतली होती. त्यामुळे तिकडच्या थंडीत आम्हाला त्याचा खुप उपयोग झाला Happy

Pages