Switzerland - माझ्या कल्पनेतील स्वर्ग

Submitted by यशस्विनी on 1 July, 2012 - 23:31

गेल्या महिन्यात युरोप टुरवर गेले होते , त्यातील Switzerland म्हणजे मनात बाळगलेली एक सुंदर इच्छा ....... ही स्वप्नमयी दुनिया बघताना खुप आनंद मिळाला....... अंत्यत देखणे निसर्ग सौंदर्य न्याहळताना मिळालेली प्रसन्नता अजुनही मनात तशीच आहे .......

हा खालील फोटो पॅरीस ते Switzerland असा प्रवास करताना गाडीतुन घेतला, हा फोटो बघताना खरोखर एखादे चित्र आहे असेच वाटते........

1V.jpg

प्रवासात टी-ब्रेकच्यावेळी एका दुकानासमोरील टेबलजवळ घुटमळणारा हा नाजुकसा पक्षी........

2V.jpg

DDLJ चित्रपटाची आठवन करुन देणारा हा फोटो........

3V.jpg

आम्ही ज्या होटेलमध्ये राहीलो होतो , त्याच्यासमोरील ही शांत आणि निवांत जागा.........

4V.jpg

खालील फोटो हे प्रवासादरम्यान गाडीत बसुन काढले.........जसे जमतील तसे , त्यामुळे काही फोटोंमध्ये गाडीच्या काचेचे प्रतिबिंब दिसत आहे..........

5V.jpg6V.jpg7V.jpg8V.jpg9V.jpg

माउंट तितलिस पर्वतरांगामधील बर्फात स्केटिंगची मजा लुटणारया या काही व्यक्ती.......

10V.jpg11V.jpg

माउंट तितलिस पर्वतांच्या सर्वात वरच्या भागातुन घेतलेले हे काही फोटो.........

12V.jpg13V.jpg

Switzerland च्या रस्त्यावरुन धावणारी ही छोटी ट्राम गाडी...........

14V.jpg

The Lion Monument in Lucerne, Switzerland.............
Th​e sculpture of a mortally-wounded Lion as "the most mournful and moving piece of stone in the world." It commemorates the Swiss Guards who were massacred in 1792 during the French Revolution..............

15V.jpg

आवडीने घेतलेल्या या स्विस बेल - झाली का पुन्हा DDLJ ची आठवन........

16V.jpg

Switzerland मध्ये पहिल्या दिवशी वातावरण अंत्यत स्वच्छ व सुर्यप्रकाशाने युक्त असे उबदार होते तर दुसर्या दिवशी बर्फाचा पाउसदेखिल बघायला मिळाला....... नाही नाही खालील फोटो हा black-white नाही आहे, बर्फ पडल्यामुळे सगळीकडे फक्त काळ्या-पांढरया रंगाचीच उधळण झाली होती

17V.jpg

हिरव्यागार कुरणात निवांत रवंथ करणारया या गाई, यांच्या दुधापासुन बनविलेले अंत्यत अप्रतिम दर्जाचे चोकोलेटस म्हणजे Switzerland ची मोठी खासियत.............

18V.jpg19V.jpg20V.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त आलेत फोटु !
>>>DDLJ चित्रपटाची आठवन करुन देणारा हा फोटो.....>>>अगदी अगदी... युरोपमध्ये फिरतांना हे फिलिंग फार येतं. Happy

पहिला फोटो खरच अगदी चित्रासारखा दिसतोय! मी ३-४ वेळा बघितलं त्यानंतर लक्षात आलं की फोटो काढलाय ते.
फारच सुंदर! Happy

धन्यवाद सर्वांना ......... पहिल्या फोटोची छोटी फ्रेम बनवुन घेणार आहे अभ्यासिकेत ठेवायला...... मस्त वाटेल...... Happy

@ मानस

बर्फाची भरपुर मजा घेतली , भरपुर जाड जॅकेट व हातमोजे घातले तरी बर्फ फारवेळ हातात धरवत नव्हता.......... हिंदी चित्रपटातील नायक-नायिका साध्या कपड्यात बर्फात गाण्यांचे shots कसे देतात काय माहीत Uhoh

किंवा कदाचित आम्ही माउंट तितलिसच्या एकदम टोकावर असल्यामुळे आम्हाला थंडी जास्त जाणवली, त्या मानाने पर्वताच्या पायथ्याशी थंडी भारतीय माणसाला झेपेल अशी होती...... फक्त बारीक बारीक पाउस व वारा सुरु झाला की पुन्हा जास्त थंडी जाणवायची व कधी एकदा गाडीमधील हिटर मध्ये जाउन बसतो असे वाटायचे

जळफळाट होतो असं काही पाहीलं की Wink
आम्ही कधी जाणार स्वित्झर्लंडला कोण जाणे?
मस्तच फोटो वर्षू.., मजा आली Happy

धन्यवाद वरील सर्व प्रतिक्रियांना .......

@ विशाल कुलकर्णी

तुम्हालाही लवकरात लवकर स्वित्झर्लंडला जायची सुवर्णसंधी चालुन येवो , हि सदिच्छा Happy

खूप मस्त फोटो..पहिला फोटो अगदी चित्रच वाटतो आहे.. टेबलावरचा पक्षी पण सुरेख बंदिस्त केला आहे....

सुंदर चित्रे. हो चित्रेच !
मला परत जायला हवे आता. एकंदर ९ वेळा जाऊन आलो, पण अजून परत जायला आवडेल. तेही खास फोटोसाठी जायचेच. ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी डिजीटल कॅमेरा नव्हता माझ्याकडे.

धन्यवाद वरील प्रतिक्रियांना........... Happy

@ दिनेशदा

नक्की जाउन या.......व यावेळी स्विसच्या प्रचिंची मेजवानी द्या Happy

<<<<हा फोटो बघताना खरोखर एखादे चित्र आहे असेच वाटते........>>>>>अगदी अगदी असच वाटत.बाकी प्रचि पण छान आहेत.

Pages